Skip to main content

चारोळी...

लेखक रसिका तिलेकर यांनी शुक्रवार, 12/07/2013 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
हळूवार पावसाची सर .. मनाला वेड लावून जाते... तूझी गोड आठवण.. उरी ठेवून जाते...

माझा बाप आणिक माझ्या बापाचा मुलगा (आषाढस्य प्रथम दिवसे)

लेखक मूखदूर्बळ यांनी शुक्रवार, 12/07/2013 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
परवा माझा बाप गेला. आणि मग माझ्या बापाचा मुलगा खुप खुप रडला. डोळे फुटे पर्यंत रडला. अजूनही रडतोय. आयुष्यभर रडेल. रडतच राहील अगदी त्याच्यासाठी कुणीतरी रडे पर्यंत रडेल. बाहेर पाऊस पण रडतोय. कूणीतरी म्हणाल आषाढ लागलाय. मग माझ्या बापाच्या मुलाला आठवल कालीदासाने 'आषाढस्य प्रथम दिवसे' अस काहीस काव्य लिहीलय. त्यात आषाढातल्या मेघा बद्दल काहीस लिहीलय अस ऐकलय माझ्या बापाच्या मुलाने. तो मेघ आता माझ्या बापाच्या मुलाच्या डोळ्यात राहतो. आषाढ महिना फार वाईटय. आषाढ लागताना तो माझ्या बापाला घेऊन गेला आणिक संपताना माझ्या आईला. नंतर कधीतरी माझ्या बापाच्या मुलालाही घेऊन जाईल अलगद.

दिंड्या, पताका..

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 12/07/2013 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे पालखीचा काही खास नेम नाही, कोणतीही दिंडी येत नाही, पालखी, वारकरी, माळकरी कोणासाठीच आम्ही काही करत नाही. वेळ कोणाला हो? आम्ही लय बिझी माणसं बघा. मध्यमवर्गीय आम्ही. आमच्या नोकर्‍या, शिक्षणं, रोजच्या आयुष्यातले लहान मोठे प्रश्न.. काय कमी व्याप आहेत आमच्या मागे? ते सोडवायलाच आयुष्य पुरत नाही हो आम्हांला, कुठे पालखीच्या फंदात पडतोय ! आम्ही भले, आमची टिचभर वितीची आयुष्यं भली, त्यातले प्रश्न भले आणि उत्तरं, आणखीनच भले, भले! असो, असो. खरं सांगायचं तर ही पालखीच आम्हांला सोडत नाही बघा! काय सांगायचं... अगदी लहानपणापासून हो.

भिंत

लेखक drsunilahirrao यांनी शुक्रवार, 12/07/2013 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
आधी आपण वाळूवर घर बांधले खेळता खेळता, तू मोडून टाकलेस ! नंतर आपण हवेत स्वप्न बांधले तू हलकेच फुंकर टाकलीस; पत्त्यासारखे कोसळले ! आता तुझ्या माझ्या आकाशाच्या मध्यभागी आपण एक कडेकोट भिंत बांधू ! - डॉ. सुनील अहिरराव http://aaskmed2.blogspot.in/2013/07/blog-post_1956.html

दुष्काळाच्या मरणकळा

लेखक वैभव कुलकर्नि यांनी शुक्रवार, 12/07/2013 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
आस लागली पाण्याची ती कणकण उरात भरली काही पेरलेले जाळून गेले मयत झाली जमीन सारी होरपळलेल्या मयतावरती लाल उन्हाचा कपडा भारी उघडे चोच एखादा दाणा कोरडा घास त्याच्या दारी किती हरपले किती करपले कोण कोणास ना तारी थरथरना-या काळजावरती जमीनीवर आल्या मरणाच्या धाडी उन्मळलेले मूळ उठले हंबरडा फोडी नभाच्या कानी नभानेही मग सूर लावला मरणकळाच्या सोडून तानी

देवा आता हार मान तू

लेखक वैभव कुलकर्नि यांनी शुक्रवार, 12/07/2013 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
देवा आता हार मान तू बघुनी खालचे तांडव सारे दिलास जन्म मानवास तू पण झाले सगळे वानर साले उभा केला तुला देवळात अन उद्बत्तीचे सुवास वारे तुझ्याच पायावरती सजले मांसाचे ते ढेर सारे तुला छीनले दगडातुनी अन तुझे कोरले देह सारे हिरवे-भगवे वस्त्र चढवुनी इथेच ठेवले तुझे नाव रे उद्गाता तू चराचराचा उरी तुझ्या हा विश्व भार रे माणसे माणसा खाण्याअगोदर देवा आता तू खाली धाव रे

म्हणे चोख्याची महारी

लेखक शरद यांनी शुक्रवार, 12/07/2013 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणे चोख्याची महारी भारतातील सर्वांत जास्त अन्याय झालेला समाजाचा वर्ग कोणता? (टारगटपणा नकोय, "नवरे" कोण म्हणाला तिकडे? आणि तेही इकडेतिकडे बघत, तोंडातल्या तोंडात पुटपुटत? गप बसा! हा धागा गंभिर आहे) अर्थात दलित. त्यांना ना शिक्षणाचा अधिकार, ना आर्थिक सुबत्ता मिळवावयाला वाव, नाही सामाजिक समतेचा वारा आणि नाही ज्या धर्मात त्यांनी जन्म घेतला त्या धर्मातील देवाला बघण्याचीही परवानगी. शेतात राबणारा बैल बरा, त्याला वर्षातून एकदा कां होईना गळ्यात माळा घालून रस्त्याने मिरवत जाता यावयाचे, मोठ्या घरची मालकीण त्याला ओवाळून, पुरणपोळीचा घास भरवावयाची! आणि बैलाचा स्पर्श झाला म्हणून कोणी अंघोळ करत नव्हता.

इष्टुर फाकडा

लेखक श्रीनिवास टिळक यांनी गुरुवार, 11/07/2013 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
Capt James Stewart नावाचा एक ब्रिटीश सैन्याधिकारी 1779 मध्ये वडगाव येथे मारला गेला. त्यानंतर झालेल्या लढाईत महादजी शिंदे यांनी ब्रिटीशांचा मोठा पराभव केला. हे यश नंतर झालेल्या तहात मराठयांनी घालविले हे आपल्याला माहित आहे. माझा प्रश्न आहे James Stewart हा पुढे ‘इष्टुर फाकडा’ या नावाने फार लोकप्रिय झाला. अजूनही वडगाव मावळ मध्ये त्याच्या नावाने दरवर्षी उत्सव किवा जत्रा भरते ती कशी काय? या बद्दल अधिक माहिती मिळाली तर आभारी होईन.

चोको जामुन (चॉकलेट फ्लेवर्ड गुलाबजाम)

लेखक दिपक.कुवेत यांनी गुरुवार, 11/07/2013 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
मास्टरशेफ संजीव कपुर ह्यांची हि रेसीपी पाहिल्यावर चोको जामुन करुन तर बघीतलेच पण माझा त्यात खारीचा वाटा म्हणजे मी ते व्हॅनीला आईसक्रिम बरोबर सर्व केले. वेल तसहि हलके गरम गुलाबजाम आणि थंड आईसक्रिम हे कॉम्बीनेशन भन्नाट लागतं; एकदा नक्कि ट्राय करा. कधी काळी अचानक पाहुणे टपकलेच तर हे कॉम्बीनेशन पेश करा आणि आवडेल ह्याची खात्री बाळगा. आईसक्रिम तर आपण रेडिमेड आणतोच पण हल्ली गुलाबजाम पण सहज उपलब्ध असतात. Gulabjamun साहित्यः १.

माझे चाट जीवन

लेखक देवांग यांनी गुरुवार, 11/07/2013 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ष २०००. .. कसा तरी मेक्यानिकॅल डिप्लोमा झालो. पुढे काय? (हा प्रश्न माझ्या घरच्यांना पडला होता मला नाही). घरच्यांना वाटले होते १० वि मध्ये ८४ % मिळाले म्हणजे पोरगा इंजिनीर वैगेरे होईल.पण मला तेव्हा हि समजत नव्हते आणि खरे सांगायचे तर आजही माहित नाही मला काय पाहिजे, मला काय आवडते, मला काय करायचे आहे. असो .... काही मित्रांनी BE ला admission घेतली, तर काही जन नोकरी करू लागले. मित्रांचे बघून मी पण BIO data बनवला. कुठून तरी application लेटर ढापले आणि जोब साठी apply करू लागलो. पण interview call येवील तर शपथ. . .