मास्टरशेफ संजीव कपुर ह्यांची हि रेसीपी पाहिल्यावर चोको जामुन करुन तर बघीतलेच पण माझा त्यात खारीचा वाटा म्हणजे मी ते व्हॅनीला आईसक्रिम बरोबर सर्व केले. वेल तसहि हलके गरम गुलाबजाम आणि थंड आईसक्रिम हे कॉम्बीनेशन भन्नाट लागतं; एकदा नक्कि ट्राय करा. कधी काळी अचानक पाहुणे टपकलेच तर हे कॉम्बीनेशन पेश करा आणि आवडेल ह्याची खात्री बाळगा. आईसक्रिम तर आपण रेडिमेड आणतोच पण हल्ली गुलाबजाम पण सहज उपलब्ध असतात.
साहित्यः
१. मिल्क पावडर - ५ मोठे चमचे (मुळ पाकॄ मधे खवा वापरलाय)
२. मैदा - १.५ चमचा (बाईंन्डिंग साठि)
३. बेकिंग पावडर - १/४ चमचा
४. कोको पावडर - १ चमचा
५. ड्रिकिंग चॉकलेट पावडर - २ चमचे (हि कॅडबरिची रेडिमेड मिळते)
६. साखर, पाणि - पाक बनवण्यासाठि
७. दुध - गरजेप्रमाणे
८. व्हॅनीला आईसक्रिम किंवा आपल्या फ्लेवर्डच आवडतं (चॉकलेट सोडुन)
कॄती:
१. रेडिमेड गुलाबजाम मिक्स पावडर वापरणार असाल तर मिल्क पावडर वगळा. आता एक मोठं गाळणं घेउन त्यातुन अनुक्रमे मिल्क पावडर, मैदा, बेकिंग पावडर, कोको आणि ड्रिकिंग चॉकलेट पावडर घालुन गाळुन घ्या म्हणजे पीठ मळताना गुठळ्या राहणार नाहित
२. एकिकडे साखरेचा पाक तयार करत ठेवा आणि गुलाबजाम तळण्यासाठि तेल तापत ठेवा
३. आता बाउल मधे गरजेप्रमाणे दुध घालुन गोळा मळा
४. तयार पीठाचे लींबाएवढे गोळे करुन तळुन घ्या. आच मंदच असु द्या म्हणजे गुलाबजाम आतपर्यत तळले जातील
५. झार्याने कढईतील तेल हलक्या हाताने गोलाकार फिरवा म्हणजे गुलाबजाम सर्व बाजुनी सारखे तळले जातील
६. तयार गुलाबजाम साखरेच्या पाकात सोडुन मुरु द्या
७. सर्व करतेवेळि मायक्रोव्हेव मधे हलके गरम करुन नुसतेच किंवा व्हॅनीला आईसक्रिम बरोबर सर्व करा
टिपः
१. आवडत असल्यास ह्यात सुका मेवा (काजु, बदाम, पिस्ते ह्यांचे बारिक तु़कडे), गुलकंद किंवा चॉकलेटचे तुकडे स्टफ करुन शकता

वाचने
8503
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
नं१
खवा वापरायचा झाल्यास
खवा....
In reply to खवा वापरायचा झाल्यास by अनन्न्या
धन्य आहात तुम्ही! फोटू भलताच
मस्त...
मस्तच!
साधे गुलाबजाम आणि आईसक्रीम
इतका खत्री फोटू टाकल्याबद्दल.
खुपच मस्त दिसतायत चॉकोजामुन.
आता गुलाबजाम आणायला
चांगली आयडिया आहे. मला आधी
मस्तं!!!
काही शंका
गुलाबजामचा पाक...
In reply to काही शंका by रुस्तम
आणि गुलाब जाम
In reply to गुलाबजामचा पाक... by दिपक.कुवेत
हल्लीच मलई कुल्फी विथ रबडी
खवा ?
जरा....
In reply to खवा ? by सूड
अर्र !!
In reply to जरा.... by दिपक.कुवेत
हलके गरम गुलाबजाम आणि थंड
असेही माझ्या मोठ्या लेकीला
पण उरण मधे