Skip to main content

डॉक्टर तुम्हीच सांगा

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 28/07/2013 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एका लग्नाला गेलो होतो त्यानंतर आमच्या मित्राचे सासर शेजारच्या बिल्डींग मध्ये आहे म्हणून त्यांच्या घरी( तिसर्या -पुण्याच्या भाषेत चौथ्या मजल्यावर) गेलो होतो. मित्राचे सासरे बुवा म्हणाले कि डॉक्टर आजकाल जरा काही खाल्ले कि पोटाला तडस लागते. एकंदर त्यांच्या पोटाचा आकार पाहून ते "जरा काही" खात असतिल असे वाटत नव्हते. म्हणून मी त्यांना विचारले कि साहेब तुम्ही आता धावत जिना चढता का ? त्यावर ते म्हणाले कि अहो मी रिटायर झालो तिसरा मजल धावत चढणे कसे शक्य आहे? मग मी विचारले तुम्ही चष्मा का लावता? ते म्हणाले चाळीशीचा चष्मा आहे. मी परत विचारले कि तुमचे अर्धे केस गेले आणि उरले अर्धे पांढरे का झाले?

रंजनभ्रमरी

लेखक अज्ञातकुल यांनी शनिवार, 27/07/2013 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजक्त मनाने झुरलो मी झरल्यात कळा अनुबंध तळी मदनाची बाधा भवभोळी गंधात न्हाइली मूक कळी चाहूलक्षणांची पागोळी दंवस्पर्शकोवळ्या अंघोळी अंगणी श्वेत केशर ओळी मातीवर ओल्या; रांगोळी अलवार स्पर्श हळुवार उरी दरवळ परिमळ मन गाभारी गोकुळी रास रंजनभ्रमरी वेदना जरा विरल्या दारी ……………. अज्ञात
काव्यरस

वाटते मजला भिती - (गझल)

लेखक विदेश यांनी शनिवार, 27/07/2013 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनाची सांगता ही वाटते मजला भिती ऐकण्याला कोणि नाही वाटते मजला भिती सागरावर का उसळती जीवघेणी वादळे हा किनारा एकटा ही वाटते मजला भिती ढोलताशा ऐकुनी मज खूप होतो त्रास हा देवळातिल शांततेची वाटते मजला भिती वाटले घ्यावा विसावा टेकुनी खांद्यावरी वाट ती अडवील कोणी वाटते मजला भिती माजलो पैशात लोळत चेहरा सुजला किती ओळखेना आरसाही वाटते मजला भिती जागणे अन् झोपणे का फरक नाही राहिला जीवनाची ओढ नुरली वाटते मजला भिती .
काव्यरस

एक लिंक शोधायला मदत करा

लेखक सुहासदवन यांनी शनिवार, 27/07/2013 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
मी मिसळपाव, मनोगत, मायबोली तसेच ऐसीअक्षरे या मराठी संस्थळांचा वाचक आणि जबरदस्त चाहता आहे. या संस्थळापैकी एकावर काही दिवसांपूर्वी मी अनेक जुने लेख आणि चर्चा वाचत असताना मला एक लिंक मिळाली होती - अमानवीय अनुभव. ते नेमके कोणत्या संस्थळावर होते ते मला आठवत नाही. कृपया आपणांपैकी कोणीतरी मला ती लिंक देऊ शकाल काय. धन्यवाद.

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०६ : दुसरी महाआपत्ती आणि पुढच्या प्रवासाची सुरुवात (७४,००० ते ५२,००० वर्षांपूर्वी)

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 27/07/2013 02:44 या दिवशी प्रकाशित केले.
===================================================================== पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८...

फुलांच्या रांगोळ्या-काहि तंत्र...!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 27/07/2013 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी आपल्या समोर सादर करणार आहे-फुलांच्या रांगोळ्या कश्या काढाव्या? याच्या काहि व्हिडिओ क्लिपिंग्ज आणी माहिती.होतं काय,की खूपजण ह्या रांगोळ्या बघतात.त्यांना त्या अवडतात,आणी ''गुर्जी आंम्हाला पण थोडं शिकवा की टेक्निक!'' अशी विचारणा सुरू होते. मग मी असा विचार केला की इथे मिपावरपण मी माझ्या फुलांच्या रांगोळ्या दाखवल्या आहेत.

काही अठवणी...!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 26/07/2013 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
काही अठवणी...उन्हातल्या काही अठवणी...पावसातल्या काही नुसत्या...तालातल्या काही गुलाबी...गालातल्या काही आनंदी...सुखाच्या काही त्रासिक...दु:खाच्या काही केवळ..जनातल्या कित्येकांच्या..मनातल्या! काही..हसर्‍या मुलांच्या काही..गळल्या फुलांच्या देठांनाही सोडून गेल्या.. उमलणार्‍या कळ्यांच्या! काही माझ्या गावाच्या काहि..तर,नुसत्या नावाच्या काही...दूरं देशांच्या तळहातांवरिल..रेशांच्या! काही..मंद वासांच्या काही..धूंद श्वासांच्या तिच्या माझ्या मिठितल्या कूंद मोहक स्पर्शांच्या!!! बेबंदिच्या अठवणी काही.. मुक्त मोकळ्या वाटांच्या फुलांनिही बहरून यावे अश्या गोजिर्‍या क्षणांच्या अठवणींच्या प्रदेशा बा घ्यावा
काव्यरस

एक प्रेमपत्र लिहले होते

लेखक वैभव कुलकर्नि यांनी शुक्रवार, 26/07/2013 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रेमपत्र लिहले होते,शब्दाऐवजी प्राणच ओतला होता त्यात. संदभ्र होते तिचे नि माझे आणि ईंद्रधनुचे सप्तरंग होते त्यात सात लिहताना काने-मात्रे एकसलग येत नव्हते, हाथ थोडा थरथरत होता नि तुझे नाव कोरले कि डावा डोळा नुसता फरफरत होता..... मध्येच एखादा अश्रू ठीबकात , माझ्या नावाला पुसायचा प्रयत्न करत होता तर कोरलेला तो बाण ह्रधयाभोवती कसला तरी यज्ञ करत होता.

बाकी काही नाही.............. माझी ८वन काढतंय कुणीतरी

लेखक वैभव कुलकर्नि यांनी शुक्रवार, 26/07/2013 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
काहूर का साचंलया आज मनी पाखरासंग फिरतया रानभरी पापनीभी फरफरतीया परापरी १ घास अडकतुया गळ्यापरी कुरणं भी खुलल्याती मळ्यापरी ठसका भी लागतुया कधीतरी बाकी काही नाही.............. माझी ८वन काढतंय कुणीतरी डावी कुशी बदलतुया कधीतरी झोप उसनी द्याहो कुणीतरी जागा राहतुया एका निश्याच्यापरी भास होतुया एका पिश्याच्यापरी सरळ रस्त्यावरून जाता कधीतरी बीना दगडाची ठेच लागतीया मधीतरी बाकी काही नाही..............

रेषा आणि लढाया

लेखक प्रसाद साळवी यांनी शुक्रवार, 26/07/2013 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
त्वेषाने त्या भांडत होत्या रेघोट्यांच्या मधल्या जागा एकसंध धरतीला तोडीत जशा उन्हाळी सलत्या भेगा पुन्हा एक त्यांना होण्याला दोनच रस्ते आता उरती पाऊस पडून चिखल होणे किंवा उन्हाने होणे रेती