Skip to main content

बाकी काही नाही.............. माझी ८वन काढतंय कुणीतरी

लेखक वैभव कुलकर्नि यांनी शुक्रवार, 26/07/2013 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
काहूर का साचंलया आज मनी पाखरासंग फिरतया रानभरी पापनीभी फरफरतीया परापरी १ घास अडकतुया गळ्यापरी कुरणं भी खुलल्याती मळ्यापरी ठसका भी लागतुया कधीतरी बाकी काही नाही.............. माझी ८वन काढतंय कुणीतरी डावी कुशी बदलतुया कधीतरी झोप उसनी द्याहो कुणीतरी जागा राहतुया एका निश्याच्यापरी भास होतुया एका पिश्याच्यापरी सरळ रस्त्यावरून जाता कधीतरी बीना दगडाची ठेच लागतीया मधीतरी बाकी काही नाही.............. माझी ८वन काढतंय कुणीतरी गुलाब हाती घेता कधीतरी काटा रगात काढतुया लालपरी बिना पाऊसाचं भिजतूया सरीपरी सगळ कस मुलायम जरीपरी असचं हे रडगाणे रोजतरी उचकी पाठ सोडणार नाही मरेपरी बाकी काही नाही.............. माझी ८वन काढतंय कुणीतरी.
लेखनविषय:

वाचने 1011
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया