Skip to main content

एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग.

लेखक जॅक डनियल्स यांनी सोमवार, 05/08/2013 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद ! एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला ! एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ ! एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे ! या लेखमालेपासून मी सापांची ओळख करून देतो आहे. विचार केला की, विषारी सापांपासून श्रीगणेशा करू. सापांची पुस्तकी ओळख-त्यांचे निवास स्थान, मादी किती अंडी घालते, रंगाची रेंज, भक्ष इ.

या साध्या घरात माझ्या

लेखक सार्थबोध यांनी सोमवार, 05/08/2013 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
या घरात माझ्या, काही न आलिशान साधेच खोपटाचे, सारवलेले छान ll १ ll नाही नक्षीदार, कौलांनी कसेबसे झाकलेले निजताना नजरेत त्यातून, चांदणे वेचलेले ll २ ll नाहीत भिंती भक्कम, घुमणे वाऱ्याचे चाले निवारा नसता किडा-मुंगी, त्यास आपले समजलेले ll ३ ll पावसाळ्यात बरसुनी तो, घरास नाहवून जातो उन्हाळ्यात तोही घरास, असा तावून सुलाखून जातो ll ४ ll बैठेच स्वयंपाक चाले, नाही सोयी नव्या पूर्ण चुलीवर भाजलेले, आगळेच अन्न ब्रह्मपूर्ण ll ५ ll नाहीत विजेऱ्या दिवे, रात्रीस किर्र अंधार असतो देवाजवळ मिणमिणणारा, हर कोपरा उजाळत असतो ll ६ ll नाही फार बगीचा, नाही फार वनश्री ती मोजकीच फुले अन्, तुळस वृंदावनी ती

थेसियस चे जहाज - पॅरॉडॉक्स

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 05/08/2013 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्लुटार्क ने एक थेअरी मांडली होती. त्यावर अजुनही चर्चाचर्वणे होत असतात. त्याने हा मुद्दा अथेन्सच्या लोकांसमोर मांडली म्हणून त्याला थेसियस च्या जहाजाचा वाद असे उल्लेखले जाते. त्याच्या थेअरी नुसार. एखादे जहाज दुरुस्त करताना त्याचे काही भाग बदलून त्याजागी नवे भाग टाकले जातात. समजा हळूहळू त्या जहजातील सर्वच भाग काढून टाकाएव लागले आणि त्याजागी नवे भाग बसवले. तर त्या जहाजाला जुने जहाज म्हणायचे का? त्या जुन्या जहाजाचे काढून टाकलेले भाग वापरून एखादे नवे जहाज बनवले तर त्या जहाजाला नवे जहाज म्हणायचे का? हे उदाहरण थोडे व्यापक करुया. गृहीत धरुयात की श्री लेले हे एक काटकसरी गृहस्थ आहेत.

भीक न घालता कुत्रे कसे आवरावे ?

लेखक सस्नेह यांनी रविवार, 04/08/2013 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणजे त्याचं असं झालं की हे सगळं त्या कुत्रीनं सुरु केलं. ओ, कुत्री ही शिवी नैये कै ! खरीखुरी कुत्री आहे. ती बघा अजून आमच्या गेटबाहेर उभी आहे. आणि तिनंच दोन महिन्यापूर्वी आमच्या नारळीखाली एक नव्हे दोन नव्हे सात पिल्ली घातली होती. पंधरा दिवस तिनं आम्हाला नारळीच्या पंधरा फुटात पाय तर टाकू दिला नाहीच, वर आणि आमच्याच अंगणात आम्हाला जायची चोरी झाली ! काठी हातात घेतल्याशिवाय घराबाहेर पाय टाकणे जिवावरचे धाडस होऊन बसले. भगीरथ प्रयत्नाने तिची अन तिच्या पिल्लावळीची बोळवण शेजारच्या पडक्या ग्यारेजमध्ये केल्यानंतर सुद्धा तिने आपला दरारा, येत जाता वॉव वॉव करून टिकवून धरला आहे.

अमृत वाणी

लेखक राजा सोव्नी यांनी रविवार, 04/08/2013 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
संत राज प.पु अनंत स्वामी ,तासगावकर ,यांची अमृत वाणी शारीरिक मिलन क्षणिक सुख देते,मनोमिलन सदैव सुख देते. मन खंबीर असेल तर गंभीर रोग सुद्धा बरा होतो. देवास कधी मंदिराच्या गाभाऱ्यात शोधू नका ,तो मनाच्या गाभाऱ्यात सापडेल निसर्ग सर्वात मोठा गुरु आहे ,निसर्गाशी जवळीक साधा मनावर ताबा ठेवण्यास शिका,कोणत्याही संकटास सामोरे जाता येईल . भगवी वस्त्र,. जटा ,भस्म लावून काही होत नाही,मनाची निर्मलता असावी लागते . प्रेमानीच प्रेम मिळते ,रुपया पैशांनी नाही मना पासून जोडलेली नाती कायम असतात,रुपया,पैशांची नाती टिकत नाहीत .

कटरले

लेखक त्रिवेणी यांनी रविवार, 04/08/2013 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोक्स, मागच्या आठवड्यातील माझ्या रेसिपी तुम्हाला आवडल्याचा तुम्ही अभिप्राय दिलात, त्यामुळे मला खूप आनंद झाला. (आणि परत एक पाकृ ईथे टाकावी असे वाटले.) कटरले ही तशी डोंगरात उगवणारी भाजी आहे आणि माझ्या आवडीची सुद्धा. ithe ithe पण पुण्यात मला ही भाजी क्वचित दिसली, या वर्षीही ईथे पुण्यात शोधली पण नाही मिळाली.

मरण झाले स्वस्त

लेखक Bhagwanta Wayal यांनी रविवार, 04/08/2013 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
खरे सांगतो मी देवा तेला एक गोष्ट जीवन झाले महाग आणि मरण झाले स्वस्त ॥ धॄ ॥ महागाईचा आलेख किती वर गेला कसे जगावे देवा सांग तुच मला गरीबाच्या दुखाला नाही कुठे अंत..॥१॥ कर्जापाई शेतकरी हवालदिल झाले कितितरी आत्म्हत्या करुनिया मेले देऊनिया जातात अस्वासने फ्क्त...॥२॥ बाँब स्फोट घातपात येथे घडतात निष्पाप लोक त्यात बळी पडतात काही आपल्या घरामध्ये रहातात मस्त...॥३॥ दोन गाड्यांमध्ये जेंव्हा टक्कर होते बघताबघता बस कधी दरीमध्ये जाते पिऊनिया चालवी गाडी नाही त्याल धास्त..॥४॥ पुर आणि भुकंपाने होई नुक्सान रिलीफ फंडामध्ये जमा करतात धन टाळुवरच लोणी खाऊन करतात फस्त...॥५॥ ................बी.डी.वायळ

"केनी" च्या पानांची भजी

लेखक चौकटराजा यांनी शनिवार, 03/08/2013 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मित्रहो , मिपाचे सदस्य झाल्यापासून पाककृती मधे आमचा हा पहिलाच धागा आहे. तो गोड मानून घ्यावा असे म्हणायची सोय नाही. कारण तो पदार्थ तिखट आहे. आपल्या महाराष्ट्र देशी जास्तीत जास्त साधे सोपे पदार्थ तयार करण्याची महान परंपरा आहे. त्यात भजी नावाचा पदार्थ तर महा लोकप्रिय आहे. कांदा,( यात चकती, गोल, लांब काप असे प्रकार ) बटाटा, वांगे, मिरची, घोसाळे( की घोसावळे), केळे, पालक, चाकवत पाने, मायाळू पाने, ओवा पाने, कोबी ई ई वापरून भजी करतात. ती चवीचवीने खातात. बरोबर पावाची , पुदीन्याच्या चटणीची, लसणीच्या चटणीची साथ घेतात. ( ऐला तोंडाला पाणी सुटायला लागले राव !) .तर असे हे भजी महात्म्य !

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं(९)

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 03/08/2013 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(१) http://misalpav.com/node/2158 : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(२) http://misalpav.com/node/2266 :प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(३) http://www.misalpav.com/node/2327 :प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(४) http://www.misalpav.com/node/3153 :प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(५) http://misalpav.com/node/3583

सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग २)

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 03/08/2013 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १) http://www.misalpav.com/node/25292 ------------------------------------------------------------------------------- ४. अभीराणी उवाच : अभीरमन्युशी माझं लग्न झाल्यावर त्यानं माझं आधीचं 'शतगोणी' हे नाव बदलून 'अभीराणी ' ठेवलं.