Skip to main content

मुगाच्या डाळीची पानकी

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 12/08/2013 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
पानकी हा गुजराथी पदार्थ आपल्य मराठमोळ्या पानगी सारखाच आहे. आपण पानगी बनवताना तांदूळाच्या पिठीत चवीपुरते मीठ घालून भाकारीपेक्षा थोडे पातळ पिठ दुध घालून भिजवून घेतो. केळीच्या पानावर थापून, पानासकट तव्यावर टाकून, वरुन दुसरे पान लावून भाजून घेतो.

(गड गड गड)

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 12/08/2013 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
(गड गड गड) पाऊस थांबायचे नाव घेईना खिडकीचे तावदाने थरारत थडथडतायत तावदानावर एक एक नीरओळ लिहून जातोय पाऊस गूढ, अनाकलनीय भाषेत (गड गड गड) ----- धडकी भरवणारा ढगांचा गडगडाट कौलांवरची टीपटीप थेंबांची लय चिंचेच्या पानांवरून सरकणारे ओघळ आणि खालच्या पत्र्याच्या डब्यावर होणारे त्यांचे आघात (गड गड गड) ------ खिडकीतून हे सगळे बिचकत बघणारा मी हातात तुझी आणि माझी लग्नातली तस्बीर त्यात हसणारी तू आणि तुला हसतांना बघून हसणारा मी (गड गड गड) ------ रस्त्यांवरच्या पिवळ्या दिव्यांमध्ये चमचमणारे ते चिंचेचे ओघळ डोळ्यांखाली निसटणारे ओले अश्रु स्स...
काव्यरस

महाबलिपुरम

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 12/08/2013 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
हा लेख कलादालनात टाकावा की जम मध्ये याबद्दल जरा साशंक होतो. अखेर कलादालनात टाकायचे ठरवले कारण लिहिण्यासारखे माझ्याकडे फारसे काही नाही. न मला या इतिहासाबद्दल फारशी माहिती न महाबलिपुरमच्या प्रसिद्धा वास्तुशास्त्राबद्दल. त्यामुळे लिहिण्यासारखे फारसे काही माझ्याकडे नाही. परंतु कलादालनात काही एरर येत असल्याने परत जम मध्ये धागा टाकत आहे त्याबद्दल क्षमस्व. पण ही छायाचित्रे बघण्यापुर्वी थोडी माहिती ही हवीच. म्हणुन हा शब्दप्रपंच. महाबलिपुरम किंवा ममल्लपुरम हे भारतातल्या प्राचीन बंदरांपैकी एक.

घटस्फोट.......संस्कृतीशी

लेखक सार्थबोध यांनी सोमवार, 12/08/2013 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
घटस्फोट.......संस्कृतीशी - गुरुवार. ग्रंथालयातील पुस्तके बदलायचा माझा दिवस. पुस्तके हुडकत होतो. माझ्यामागे तिशीतल्या दोन महिला काही बोलत होत्या- " बघ ना, बिचारीचे खूप वाईट हाल झाले, शेवटी नशिबाचा भाग असतो. आता तिचे आई-वडील नवीन स्थळ बघत आहेत. पण दुसरे लग्न म्हणले कि जरा अडचणी येतातच ना, अगदी सगळ्या अपेक्षा कशा पूर्ण होणार. ए; तुझ्या माहितीत जरी कोण असेल एखादा चांगला मुलगा तर सांग हं. दुसरी महिला म्हणाली -अग हो आणि तुला त्या मंदिराजवळच्या काकू माहित आहेत ना, त्यांना भेट ना, त्या ”घटस्फोट स्पेशियालिस्ट” आहेत, त्या नक्की तुला मदत करतील. एवढे बोलून त्यांचा संवाद संपला आणि माझा विचार चालू झाला.

सर्पमित्र

लेखक चाफा यांनी सोमवार, 12/08/2013 01:56 या दिवशी प्रकाशित केले.
शप्पत, जॅक डी ची थट्टा करण्यासाठी नाही लिहीलेलं, बरंच आधी लिहीलेलं आज आठवलं, ********** " तुमच्या ऑफीसला मघापासून फोन करतेय, कुणीच उचलत नाहीये " " त्या तुम्ही होतात होय ? मला वाटलं परत कुणीतरी मस्करी करतंय, हल्ली लोकांना काही सिरीयसनेसच राहीला नाही. म्हणे "मी मुंगूस बोलतोय मला सापाची भीती वाटतेय", काय पण.. " " बरोबर आहे मुंगूसच बोलत होता फोनवरून " " म्हणजे त्या तुम्ही होतात ? आणि वर तोंड करून परत ऑफीसला येऊन मस्करी करताय ?

एक बटा दो.......दो बटे चार.....

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 12/08/2013 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज तो जीने की तमन्ना है..... http://misalpav.com/node/22730 आज फिर मरने का इरादा है..... http://misalpav.com/node/22799 एक बटा दो.दो बटे चार छोटी छोटी बातो मे बट गया संसार. नही बटेगा नही बटेगा मम्मी डॅडी का प्यार ओ मम्मी डॅडी का प्यार......... एफ एम वर गाणं लागलय. माझं आवडीचं.लहानपणापासून अगदी आवडीचं. प्यार म्हणजे काय हे न कळायच्या वयात कुठल्या तरी पिक्चर मध्ये कोण्या लहान मुलानी म्हंटलेले गाणं. मी समाजाच्या कार्यक्रमात त्यावर डान्स देखील केला होता. बाबाने त्याचे चिक्कार फोटो काढून ठेवले होते..

लादेन ध्यानप्रकार

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 11/08/2013 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
अध्यात्म या विषयावर अनेक गैरसमज आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे अध्यात्म गूढ, अंधूक, धूसर, अगम्य आहे हे नसून अध्यात्माविषयी विचार करणारे बहुतेक लोकं मठ्ठ असतात हे आहे. त्यांचा हा मठ्ठपणा दूर करण्याची जबाबदारी मी नाईलाजाने स्वीकारतो आहे. तशी ती जबाबदारी 'कृपया स्वीकारा, मी तुमच्या पाया पडतो, कृपया ही जबाबदारी स्वीकाराच. नक्की...' अशी विनंती करत काही शेकडो लोकं आले होते असं नाही. मला केवळ तसं वाटतं म्हणून मी स्वीकारतो आहे. सर्वप्रथम तुम्हाला मी सांगतो की जे तुम्ही करत आहात ते ठार चूक आहे.

भरली वांगी.....जरा वेगळया पध्दतीने!

लेखक दिपक.कुवेत यांनी रविवार, 11/08/2013 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या लाडक्या 'अन्न हे पूर्णब्रम्ह' ह्या दालनास एक वर्ष पूर्ण झाल्याबद्द्ल सर्वांचे हार्दिक अभिनंदन! चला तर मग आज लुफ्त घेवुया भरल्या वांग्यांचा! पोकळ वांगी: Pokal wangi सारण/स्टफिंगः Stuffing आणि फायनली भरली वांगी:

गंप्या आणि अजान

लेखक राजा सोव्नी यांनी रविवार, 11/08/2013 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
गंप्या भल्या पहाटे पक्षी निरीक्षणास निघाला ,तो जेव्हा गावाबाहेर पडला तेव्हा त्याला एका झोपडी बाहेरील कोंबड्याच्या दडब्यातून काही आवाज आला ,त्याने तेथे थांबून ऐकण्यास सुरुवात केली,तेथे एक कोंबडी ,कोंबड्यास म्हणत होती ,अहो लवकर उठा ,तुम्हाला आरवायचे नाही का ?तुमच्या शिवाय लोक उठतील कसे?त्यावर कोंबडा आळसावत म्हणाला अग आता माझे काम मशीद वाले कर्णे लावून अजान देवून करतात ,मला मस्त झोपू दे ,गंप्या हसत ह्सत पुढे निघाला थोड्याच वेळात गंप्या जंगलात पोचला ,नुकताच सूर्योदय झाला होता,गंप्या एका झाडा खाली बसून आपल्या दुर्बिणीने पक्षी निरीक्षण करू लागला एवढ्यात त्याच्या कानावर एका पोपटीणीचा आवाज आला ,अहो जर

मदत हवी

लेखक उर्मिला०० यांनी रविवार, 11/08/2013 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर! खूप दिवसांनी लिहीत आहे. मला कोणी मदत करू शकेल का? राज्य नाट्य स्पर्धेसाठी नवीन, छान अशी नाटकाची स्क्रिप्ट हवी आहे. कुणी लेखक असाल किंवा कुणाला चांगले पण फारसे प्रयोग न झालेले नाटक माहित असेल तर कृपया मदत करा. धन्यवाद!