मोरया!
त्यावेळी आम्ही कोल्हापूरात नागराज गल्लीमध्ये राह्त होतो, मंडळाचा सुकाळ व माझा नवीन पोपट हा इत्यादी गाणी अजून तयार झाली नव्हती त्याच्या आधीची गोष्ट.
लहानपणापासून मला विविध देवदेवतांचे जरा खासं आकर्षण होते, त्यांची चित्रविचित्र नावे, त्यांची वाहने, त्यांच्या अफाट अश्या विविध स्तरावरील निसर्गाला आपल्या ताब्यात ठेवणार्या शक्ती याचे मला अप्रुप होते. पण हे सगळे जाणत्या वयानंतर.. जेव्हा मला काही समजत देखील नसे तेव्हा पासून गणपती या देवतेच्या खूप प्रेमात आहे.
विशेष
मिसळपाव