आमचा खंड्या
‘पोपट घेता का पोपट’ आसे म्हणत एक पोपट विकणारा तो पोपटवाला आमच्या दारात उभा राहुन ओरडत होता,उन्हाळ्याच्याचे दिवस होते, त्याने आमच्या दारात येऊन पिण्यास पाणि माग़ितले, त्याने पोपट आणणारी ती जाळी आमच्या कट्ट्यावर ठेवली. ते पाहुन मी आणि माझी बहीन ग़ीता त्या पिंजर्यातील पोपट पाहु लाग़लो,आम्ही आईवडीलांना ही पोपट दाखवायला बाहेर बोलवले. ते ही आनंदाने पोपट पाहु लाग़ले,पण त्यातील एका पोपटाच्या डोळ्याला इजा झाली होती, तो पोपट इतरापेक्षा ग़प्प होता.
हे शाश्वत ज्ञान नव्हे !
आजच्या मटाच्या "वाचकांची पत्रे" विभागातील एका पत्राने लक्ष वेधून घेतले. पत्राचे शिर्षक होते, "हे शाश्वत ज्ञान नव्हे !". पत्राचे लेखक आहेत य. ना. वालावलकर. पत्र छोटेखानी असल्यामुळे इथे टंकतो:
'मानवतेचे तारणहार' हे स्फुट (मटा, ९ ऑक्टोबर) वाचले. त्यात म्हटले आहे, की अमेरिकेने आजवर जगाला सर्वाधिक नोबेल विजेते दिले. त्यांच्या शतांशानेही भारतीय नाहीत. नोबेल पारितोषिकाचा हा आनंद क्षणभंगुर आहे. खरा शाश्वत, चिरंतन, ब्रम्हानंद मोक्षप्राप्तीत असतो. तो अध्यात्मवादयांनाच लाभू शकतो.
कोजागिरी स्पेशल
आज आमचे येथे कोजागिरी निमित्त्य मसाला दूध प्राशनाचा कार्यक्रम आयोजित केला असून प्रतेकानं आपापल्या घरुन २-२ लिटर दूध (आमच्या प्रोव्हिजन स्टोअरमधूनच. आज म्हणून म्हैस : चौरेचाळीस रुपये लिटर )
तशेच पाव किलो साखर प्रतेकी आणि
दूध मसाला (२५ रुपये तोळा)
(स्पेशल आलाय आमच्या कडे तोच घ्या)
संध्या़ काळी चार वाजेपर्यंत आणून द्यावे.
कार्यक्रम बिल्डींगच्या टेरेस वर ठीक ९.३० वाजता (रात्री) सुरु होऊन ११.४५ (रात्रीच) ला संपेल.
दूध तापवताना वेगळे काही घडत नसल्याने दूध कसे तापत आहे हे पाहण्यासाठी गर्दी करु नये.
बसायची व्यवस्था आपली आपण करायची आहे.
एक धाव पोटासाठी
आज सकाळी लवकर जाग आली म्हणून सहज फिरायला म्हणून गेलो होतो . थंड हवेचा आस्वाद घेत असताना समोर २ वेगवेगळ्या घटना दिसल्या .
एक स्त्री सायकलवरून जाताना दिसली . एकंदरीत पेहरावावरून गरीब घरातली असावी . सायकलला पुढे एक थोडीशी मलिन झालेली पिशवी होती . बहुधा जेवणाचा डबा असावा त्यात . धापा टाकत , हळुवारपणे , सावध गिरीने रस्त्यावरील इतर वाहनांचा अंदाज घेत ती सायकल चालवत होती . प्रचंड घामाघूम झालेली .
दुसरी घटना म्हणजे थोड्याच वेळाने तिथून आणखी एक लट्ठ अशी स्त्री मॉर्निंग वॉक साठी जाताना दिसली . तीही प्रचंड घामाघूम झालेली, रस्त्याचा अंदाज घेत चालत होती अधून मधून पळत होती .
हान्का सरोवरावरचे बर्फाचे वादळ व देरसूचा निरोप........भाग ६
भाग-१ - निशाचर
भाग-२ - डुकराची शिकार
भाग-३ - कोरियन गाव
भाग-४ - लेफू नदीतून
भाग-५ - दलदलीत
६
हान्का तलावावरचे वर्फाचे वादळ.
देरसू हान्का लेकला केन्का लेक म्हणतो. याला तलाव म्हणणे धाडसाचे होईल. याचा आकार एखाद्या अंड्यासारखा असून वर तो ३७ मैल आहे तर निमुळत्या भागात तो जवळजवळ याच्या अर्धा आहे.
न्यायव्यवस्थेत लोकांचा सहभाग.
न्यायव्यवस्थेत लोकांचा सहभाग.
अमेरिकेत काम करत असताना, माझा एक अमेरिकन सहकारी मला म्हणाला कि तो उद्या ज्युरी ड्युटीवर आहे. मी त्याला विचारले कि ज्युरी ड्युटी म्हणजे काय? तर त्याने सांगितलेली माहीती खालील प्रमाणे.
अमेरिकेत प्रत्येक मतदात्यास तेथील न्यायव्यवस्थेत सहभागी होण्याची एक दिवस संधी मिळते, त्या दिवसाला ते ज्युरी ड्युटी असे म्हणतात.
शासनाकडून प्रत्येकास एक पत्र येते कि तुमची निवड ज्युरी ड्युटी करता झाली आहे. आणि या या दिवशी अमुक न्यायालयात तुम्हाला हजर राहायचे आहे.
सधारण ५० लोकांना एका दिवशी बोलावले जाते. मुख्य न्यायाधीश त्यातून १२ लोकांची ज्युरी म्हणून नीवड करतात.
देरसूचा निरोप............भाग-५ ......... दलदलीत......
भाग-१ - निशाचर
भाग-२ - डुकराची शिकार
भाग-३ - कोरियन गाव
भाग-४ - लेफू नदीतून
५-दलदल.
संध्याकाळी मी व देरसू नेहमीप्रमाणे गप्पा मारत असताना ऑलेन्टिएव्ह व मार्चेंको परत आले. धगधगत्या आगीवर किटली बारीक शीळ घालत होती. देरसूने ती जरा हलवली पण त्यातून येणारा आवाज काही कमी झाला नाही. त्याने ती अजून सरकविली.
‘कसा रडतोय बघ ! वाईट माणूस’
‘देरसू, हा माणूस कसा ?’’ मी विचारले.
‘तो रडतो, गातो व खेळतो सुद्धा’.
मिसळपाव
