Skip to main content

चाहूल एका सृजनाची

लेखक BONGALE SANTOSH SHAHU यांनी गुरुवार, 14/11/2013 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
चाहूल एका सृजनाची पाऊस एक आशा - भविष्याची पाऊस एक दिशा -ध्येयाची पाऊस म्हणजे हिरवळ -आनंदाची पाऊस म्हणजे दर्वळ -सुगंधाची पाऊस एक आधार -जीवनाचा पाऊस एक निर्धार -स्वप्नांचा पाऊस म्हणजे रिमझिम-संगीताची पाऊस म्हणजे किलबिल -बालपणाची पाऊस एक देवता -गाभाऱ्याला पाऊस एक पाहुणा -घराला पाऊस म्हणजे नवता -वसुंधरेला पाऊस म्हणजे उधान -सागराला चाहूल एका सृजनाची कथा साऱ्या जीवनाची केवढी रूपे त्या पा

उद्घाटन

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 14/11/2013 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
“नमस्कार” एवढ्या गर्दीत त्या गृहस्थांनी मला नमस्कार केला. प्रतिक्षिप्त क्रियेने मीही नमस्कार करती झाले. “कोण आहेत हे?” मी शेजारी बसलेल्या माणसाला विचारलं. “अरे, तुम्हाला माहिती नाही? सांसद आहेत ते आपले.” त्याने आश्चर्याने मला न्याहाळत सांगितलं. मला लगेच त्यांच्या नमस्काराच कारण समजलं. त्या मंडपात आम्ही दोनच स्त्रिया होतो – एक होत्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी. त्यांना खासदार ओळखत होते. अर्थातच त्या व्यासपीठावर होत्या. दुसरी होते मी. मी बेधडक गर्दीत मिसळून फोटो काढत होते आणि लोकांशी बोलत होते. शिवाय माझ्या हातातल्या वहीत मी अधून मधून लिहित होते. हे सगळं मी नेहमीच करते.

फुंकर

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 14/11/2013 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
वय जवळ करी मज दूर पळे तरुणाई मन आठवते लागते आळवू अंगाई क्रमल्या वाटा पाडियले पथ पण तरी वाटते अस्थाई स्थानक का कोठे अवघडले हरवली दशा नि दिशा दाही किंचित थोडे संचित काही फ़ुंकर घाली शमवी लाही शैशव दूजे नकळत देई स्पर्शाविण ऊर्जा या देही शोधीत सुखे परतून पुन्हा नव जुने बालपण येई विसरून जीर्णपण जन्माचे मउ कुशीत घेई आई ………………… अज्ञात
काव्यरस

तु तुझे मन फक्त गच्च ठेव, बाकी घोड्यावर सोड

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 14/11/2013 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
( स्वच्छ मन या लँडमार्क लेखाचा स्वैर अनुवाद. ) मी ओंफ्फसमधुन घेरीत जात होतो. पुढे काही आंतरावर मेंदू ज्याम होणार होता. मी माझ्या बायकोचा वेग कमी केला आणि तिला सोफ्यावर थांबवली. तशी त्या ज्याम मधून प्रत्येकजण बाहेर येण्याचा प्रयत्न करु लागला. बॉडीचा आवाज, आतल्या गर्दीचा आवाज येत होता. तिथे जवळच एका म्हशीच्या ॐ चा आवाज येत होता. मी विचार केला, आयला, प्रत्येकाचा आवाज वेगळा असतो. मला प्रत्येक आवाज काय सांगतोय ते जाणून घेण्याची इच्छा झाली.

ऊसदर आंदोलन - सरकार आणि कारखानदार

लेखक psajid यांनी गुरुवार, 14/11/2013 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
भारत हा मुख्यत्वे कृषिप्रधान देश आहे. आणि या देशातील बहुतांश लोक शेतीवर आपला उदरनिर्वाह चालवतात. घामाबरोबर रक्त गाळून बळीराजा भारतातील लोकांची दोन वेळची भूक भागवतो. मात्र त्याच्या घामाचे योग्य दाम दिले जात नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला थोडा जास्त भाव मिळाला तर महागाई वाढली याच्या नावाखाली सगळीकडून ओरडा होतो. नोकरदार मध्यम वर्गीय, दुरचित्रवाणीचे प्रतिनिधी नुसता गोंधळ घालून सरकारवर आयातीसाठी दबाव आणतात आणि बळीराजाला त्याच्या मिळणाऱ्या नफ्यापासून वंचित ठेवतात. वास्तविक शेतकरी हा त्याच्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पनावर आपली उपजीविका करत असतो.

अद्भुत आविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय

लेखक सुज्ञ माणुस यांनी गुरुवार, 14/11/2013 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
अद्भुत आविष्कार अद्भुत आविष्कार (१): कपारीतील दगडाची चालणारी गाय "कपारीतील दगडाची चालणारी गाय" अश्या नावावरून काहीच संदर्भ लागत नाही ना? मलाही नाही. अगदी याची देही याची डोळा पाहून आलो असलो तरीही नाही. मग असे नाव का? कारण 'सूरदास' म्हणाला म्हणून. "दगडाचा पुतळा दरवर्षी काही गव्हाचे दाणे इतके अंतर पुढे सरकतो" - खरे वाटत नाही ना? मलाही नाही. पण खोटे ठरवायला कारण पण नाही माझ्याकडे. आता हा सूरदास कोण? कसला गायीचा पुतळा ? काय गव्हाचे दाणे ? मागील वर्षी, पावसाळ्याच्या सुरवातीलाच 'धोडप' किल्ला बेत झाला.

मि.पा वर नवीन सोयींबाबत

लेखक निरु यांनी गुरुवार, 14/11/2013 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मि. पा. वर मी तसा नवीनच आहे. भटकंती करता करता मनोगतावरुन इथे आलो आणि इथलाच होतोय हळूहळू. एक दोन सोयी मि. पा. वर असाव्यात असे वाटते. १. शोध: एखादी कथा, कविता, लेख आवडला आणि चुकून वाचनखुणेत घालायचा राहिला तर काही दिवसांनी परत आल्यावर तो पुन्हा सगळ्या पानांवर शोधत बसावा लागतो. त्याऐवजी प्रत्येक विभागात अथवा संपूर्ण मि.पा. वर 'शोध'ची सोय ( Search Functionality) असल्यास त्याचा खूप उपयोग होईल. त्याचप्रमाणे, एखाद्या विषयावर मि.पा. करांनी किती लेख / कविता / चर्चा केल्या आहेत तेही शोधणे शक्य आणि सोपे होऊन जाईल. लेखाप्रमाणेच मि.पा.कराबद्दलही हे करता येईल.

नवे व्यवसाय

लेखक नरेंद्र गोळे यांनी गुरुवार, 14/11/2013 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
शेठ वालचंद हिराचंद ह्यांच्या वडिलोपार्जित बिडी व्यवसायातून, ते वडिलांशी भांडून, निर्धाराने बाहेर पडले आणि साखर उद्योगाची पायाभरणी केली. का? तर समाजविघातक व्यवसायांनी स्वतःचे पोट भरणे त्यांना मंजूर नव्हते. साखरेचा व्यवसाय, त्याकाळी त्यांना समाजोद्धारक वाटला होता. आज; साखर, मीठ, तेल, तूप इत्यादी संहत पदार्थांचा आरोग्यरक्षणातील अपूर्व अडथळा पाहता; साखर व्यवसाय समाजास कितपत हितकर आहे, ह्याविषयीच प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे.

एफर्टलेस मॅगी नूडल्स !

लेखक साळसकर यांनी गुरुवार, 14/11/2013 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
६ नोव्हेंबर २०१३. भारत बनाम वेस्टईंडिज. पहिला कसोटी सामना. सारा प्रकाश झोत सचिन रमेश तेंडुलकर वर. कारण देखील तसेच. क्रिकेटच्या या देवाची अखेरची कसोटी मालिका. कारकिर्दीतली शेवटून दुसरी आणि १९९ वी कसोटी. पहिल्या दिवशी टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणारी वेस्टईंडिज २३४ ला गारद आणि भारत बिनबाद ३७. दुसर्‍यादिवशी सचिन बॅटींगला येणार म्हणून काही जणांनी चक्क सुट्ट्या टाकलेल्या. ज्यात एक मी देखील होतो, जो दुकान सोडून घरी थांबलेलो. सचिन बॅटींगला २ गडी बाद झाल्यावर येतो म्हणून घरी तशी सक्त ताकीदच देऊन ठेवली होती की दुसरी विकेट पडल्यापडल्याच मला उठवा.

कॅसलिंग.......

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 14/11/2013 01:48 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो इथे मिपावर चतुरंग काकांची भन्नाट कॉमेन्ट्री वाचून बुद्धीबळातील एका खेळी बद्दल लहानपणापासून असलेले कुतुहल पुन्हा जागे झाले. तसे आमच्या ग्यांगचे बुद्धीबळाचे ज्ञान तोकडेच. राजा कुठे फक्त एक घर चालु शकतो. उंट तिरका जातो. घोडा अडीच घरे जातो. हत्ती उभ्या आडव्या रेषेत फिरतो. प्यादे सरळ एकच घर फक्त सुरवातीला दोन घरे फक्त मारायला सरळ न जाता तिरके एक घर इतके नियम माहीत असले की झाले . आले बुद्धीबळ. उन्हाळ्यात पत्ते खेळताना विशेषतः गड्ड्या झब्बु च्यालेन्ज किंवा नाटेकाटेठोम खेळताना भरपूर आरडा ओरडा व्हायचा. च्यालेन्ज मधला च्यालेन्ज उचलेन्ज तर फार प्रिय. त्यामानाने बुद्धीबळ फार शांतपणे व्हायचे.