Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by mohite jeevan on Sun, 11/10/2013 - 16:05
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
मी आँफीसमधुन घरी जात होतो,पुढे काही आतंरावर ट्राफीक जाम होते,मी माझ्या बाईकचा वेग़ कमी केला आणि माझी बाईक एका फोर व्हीलर ग़ाडी माग़े थाबवली. तेथे प्रत्येकजण त्या ट्राफीक मधुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता,ग़ाडीचा आवाज,लोकांच्या बोलण्याचा आवाज येत होता.त्यातुनच एक आवाज येत होता,तेथे जवळच्याच एका मशीदीत नमाजचा आवाज येत होता.त्या थांबलेल्या जागेवरच मी विचार केला,'प्रत्येक लोकांचा देव वेग़ळा आसतो,मला ते काय म्हणतात याचा आभ्यास करुन जाणुन घ्यायची इच्छा झाली,'त्यावेळी आनेक विचार मनात येत होते. शेवटी त्या ट्राफीकमधुन मी बाहेर पडलो व त्या विचारात आसल्याने सहजच माझे लक्ष नेहमीच्या मार्गा वरील त्या चर्चवरील क्राँसवर लक्ष ग़ेले. मग़ माझ्या मनात विचार आला,' लोक येशु क्राँसवर आसताना त्याचे स्मरण कसे करु शकतात?कारण येशुतर वेदनेत आसतो,' मनात त्या धर्माचा ही आभ्यास करावयाचा वाटला,मी काही वेळातच घरी आलो.समोरच श्री रामचा फोटो पाहिला आणि समाधान पावलो.कारण मी रामायण भग़वतनेग़ीता वाचली होती, आता मला कुराण,बायबल वाचण्याची इच्छा झाली. बायको माहेरी ग़ेली होती,मी कपडे बदलून,चेहराधुण्यासाठी बेसवाँश कडे ग़ेलो,चेहरा धुण्या अग़ोदर एक नजर चेहरा आरशात पाहीला,आज चेहरा माझा वेग़ळाच दिसत होता. त्या चेहर्यात मला साई बाबा दिसत होते,मग़ मला जाणवले,'हे तर साई बाबाच आहे,ती दाढी ते डोळे सर्व काही मी साई बाबा आसल्याचे सांग़त होते,मग़ मीच डोळे मिटवले व डोके त्या आरशाला टेकवले,' मी विचार करत होतो की,'साई बाबा माझ्यात का आले?,काय तो भ्रम होता की काही कारण होते,' मग़ सग़ळ्यात त्रासदायक प्रश्न होता की,'आसे मला का वाटावे?काय मी भारतातील नविन देव किंवा संत बनणार आहे का?,' मग़ मला वाटु लाग़ले,'भारताची दशा पाहता भारताला एखाद्या संताची ग़रज आहे, काय मी त्यासाठी लायक आहे?,' आणि मी आपले डोळे हाळु हाळु उघडले व आरशात माझा चेहरा पाहु लाग़लो, आता तो साईचा चेहरा दिसत नव्हता.मी चेहरा बेसवाँश मध्ये धुतला व पुन्हा चेहर्याचे निरक्षण केले आणि वाटले आपला चेहरा साई बाबा सारखा तर आहे, डोळे,ओठ,कान व दाढी. मग़ मी साई बाबा विषयी वाचण्यास सुरवात केली,त्यावरुन मनात विचार आला की,साई बाबांचा कोणताही धर्म नव्हता,त्याच्याकडे सर्व धर्माचे लोक येत आसत,आणि त्याच्या दरबारात आजुन ही येतात,ते म्हणत 'सबका मालिक एक है,' रात्री खुप उशीरा मी झोपलो,दुसर्यादिवशी रविवार होता,त्यामुळे काही वाटले नाही. रात्री मला एक स्वप्न पडले,एका घोड्यावर हात फिरवत साई बाबा उभे आहेत,त्याच्या चेहर्यावर हास्य होते. त्यावरुन मला त्याची चुकलेल्या घोडीची कथा आठवली व मला तोच घोडा आसेल वाटले. मी स्वप्नात पाहिले की तो घोडा साई बाबा पासून दुर जात आहे,व तो काही अतंरावर उभा राहुन साईना पाहत आहे. साई बाबा दोन्ही हात पसरुन त्या घोड्याला बोलवत आहेत,पण घोडा त्याना पाहुन ओरडत आहे,मोठ मोठ्याने किंकाळ्या फोडत आहे. पण आचानक वार्याचे वादळ निर्माण होऊ लाग़ते.आता घोडा आणखिन जोरात किंकाळ्या फोडत आसतो. अचानक मला जाणवले की, तेथे कोणि ही साई बाबा नव्हते की,वार्याचे ते वादळ होते.पण त्या घोड्याचा आवाज मात्र येत होता.आचानक मी उठलो व डोळे उघडले,खिडकीतुन त्या घोड्याचा आवाज येत होता.मी खिडकी जवळ ग़ेलो, खिडकीतुन पाहीले, स्वप्नातील त्या साई बाबा जवळील त्या घोड्यासारखा घोडा, त्याचे पाय एका ग़टारीच्या लोखंडी सळीच्या जाळीत आडकलेला होता,त्याच्या पायातुन रक्त वाहत होते, जस जसे घोडा पाय ओढत आसे तस तसे त्याच्या वेदना वाढत होत्या,त्याच्या आवाज माझे ह्रदय हालवुन टाकत होते. मी रोडवर खिडकीतुन पाहिले सकाळी सकाळी काही लोक ये जा करत होते पण त्या घोडयाच्या वेदनेकडे कोणि ही पाहत नव्हते.मी चौथ्या मजल्यावर होतो. मग़ मीच विचार केला की,'मीच त्या घोड्याला बाहेर काढतो,पण नाही,मला तसे करताना कोणि विचारले तर?त्या घोड्याचा मालक आला तर?मी त्या घोड्याला सोडविताना लोक काय म्हणतील?लोकांनी विचारले तर?आणि मी काय सांग़ु?आजकाल कोणि कोणाची मदत करतो का?आजकाल जर एखादा प्रयत्न जर करत आसेल तर त्याच्यामाग़े सुद्धा लोक कारण शोधत आसतात? आसे विचार येऊ लाग़ले,' पण माझ्या डोक्यात विचार आला,साई बाबानी जर आसा विचार केला आसता तर लोकांची मदत केली नसती.मग़ मीच विचार केला,'लोकांची परवा न करता त्या घोड्याला सोडीवले पाहिजे व मी ही नाही ग़ेलो तर त्या लोकांत व माझ्यात काय फरक आसणार.माझ्या मनात एक वादळ निर्माण झाले, मला कधी एकदा त्या घोड्याला सोडवितो आसे वाटु लाग़ले.म्हणुन मी खाली जाण्यासाठी पँट घालु लाग़लो,चप्पल घातले व बाहेर पडणार तेवढ्याच त्या घोड्याचा आवाज बंद झाला. मी खिडकीतुन पाहिले तर खांद्यावर चाबूक आसलेला त्या घोड्याच्या मालकाने त्याला काढले होते.मग़ मला समाधान वाटले. मग़ मी आकाशाकडे पाहिले मला त्या आकाशात साई बाबाचा चेहरा दिसत होता. आणि माझ्या ह्रदयातुन एक आवाज आला ,'तु तुझे मन फक्त स्वच्छ ठेव,बाकी देवावर सोड.' *ओम साई बाबा*
  • Log in or register to post comments
  • 23413 views

प्रतिक्रिया

Submitted by मुक्त विहारि on Sun, 11/10/2013 - 17:25

Permalink

मी पहिला...

ढ्यांट ट ढ्यांट आता लेख वाचतो.... (फॅन ऑफ जीवन भाउ) मुवि
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Mon, 11/11/2013 - 04:14

In reply to मी पहिला... by मुक्त विहारि

Permalink

काय? काल रात्रीच पाह्यली अन

काय? काल रात्रीच पाह्यली अन वाचली होती. पण जीवन्रावांच्या लेखाचा पहिला प्रतिसाद तुमचा ही परंपरा राखायची म्हणुन गप्प बसले.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 11/11/2013 - 08:45

In reply to काय? काल रात्रीच पाह्यली अन by स्पंदना

Permalink

@ अपर्णाताई.....

धन्यवाद...
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Tue, 11/12/2013 - 17:22

In reply to काय? काल रात्रीच पाह्यली अन by स्पंदना

Permalink

"काल रात्रीच पाह्यली"

"काल रात्रीच पाह्यली" हे ठिकाय पण "अन वाचली होती" :)
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Tue, 11/12/2013 - 09:41

In reply to मी पहिला... by मुक्त विहारि

Permalink

मुवि

एक विनंती(नम्र) पुढ च्या वेळेस मला पहिला प्रतिसाद देता यावा यास्तव आपण मला मदत कराल.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Sun, 11/10/2013 - 17:27

Permalink

**

शुद्धलेखनात सुधारणा , एक पण आगाऊ प्रतिसाद(आतापर्यंत ) नाही . साईची क्रुपा का ? =))
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 11/10/2013 - 17:31

Permalink

भगवान mohite jeevan, ____

भगवान mohite jeevan, ____/\____
  • Log in or register to post comments

Submitted by mohite jeevan on Sun, 11/10/2013 - 18:54

Permalink

धन्यवाद

धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Tue, 11/12/2013 - 20:57

In reply to धन्यवाद by mohite jeevan

Permalink

ईक तुम्ही होSS.. बस तुम्ही हो...

मग़ मला वाटु लाग़ले,'भारताची दशा पाहता भारताला एखाद्या संताची ग़रज आहे, काय मी त्यासाठी लायक आहे?,'
लायक आहे म्हणजे? अरे आहेच..वादच नाही. कोण न्हाई म्हंतय बघतुच म्या. १ च फाईट वातावरण टाईट करुन टाकू.हाकानाका? जीवनभौ आगे बढो.. हम तुम्हारे साथ है.. --------- शिरियस्ली.. जाहीर पाठींबा कोंकोण देनार? ---------
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sun, 11/10/2013 - 19:01

Permalink

हे काय आहे?

हे काय आहे? :(
  • Log in or register to post comments

Submitted by mohite jeevan on Sun, 11/10/2013 - 19:18

In reply to हे काय आहे? by प्यारे१

Permalink

?

?
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Sun, 11/10/2013 - 19:44

In reply to हे काय आहे? by प्यारे१

Permalink

मुक्तपिठीय लेख.

.
  • Log in or register to post comments

Submitted by निवेदिता-ताई on Sun, 11/10/2013 - 19:06

Permalink

छान

छान
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sun, 11/10/2013 - 20:17

Permalink

मनासारखा राजा, राजासारखं मन!!

मनासारखा राजा, राजासारखं मन!! जीवणभौ तुमच्यासाठी कायपण!!! म्हागाई वाहाडली तरीपण!!
  • Log in or register to post comments

Submitted by हरवलेला on Tue, 11/12/2013 - 17:22

In reply to मनासारखा राजा, राजासारखं मन!! by बॅटमॅन

Permalink

म्हागाई वाहाडली तरीपण!!

होऊ दे खर्च !!!
  • Log in or register to post comments

Submitted by देवांग on Tue, 11/19/2013 - 16:55

In reply to म्हागाई वाहाडली तरीपण!! by हरवलेला

Permalink

आली लहर केला कहर

होऊ दे खर्च !!! नाही …तर आली जीवनला लहर आणि केला साई बाबाची गोष्ट लिहून कहर … पृथ्वी गोल आहे कारण जीवन भाईचे विचार खोल आहेत ….
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on Sun, 11/10/2013 - 20:50

Permalink

म्हणजे तो घोड्याचा मालक देव

म्हणजे तो घोड्याचा मालक देव होता, असं का ? की त्याला त्या वेळी तिथे येण्याची बुद्धी देणारा देव? का त्या घोड्याला वाचवायला पाहिजे असे त्याला सूचविणारी बुद्धी म्हणजेच देव? काही कळत नाहीये ओम साई राम ||
  • Log in or register to post comments

Submitted by mohite jeevan on Sun, 11/10/2013 - 21:18

Permalink

मनिषाजी तुम्हाला जे चांगले

मनिषाजी तुम्हाला जे चांगले सुचले ते देव
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Sun, 11/10/2013 - 21:30

Permalink

बाकी

कायपणा मना जीवनभाऊच्या सयंमाच कौतुका आहे आमाला . कौतीक ठाले तथास्तु
  • Log in or register to post comments

Submitted by चावटमेला on Sun, 11/10/2013 - 22:34

Permalink

आख्खया मिपाचा दावा आहे,

आख्खया मिपाचा दावा आहे, जीवनभौ छावा आहे
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Mon, 11/11/2013 - 01:08

Permalink

हा लेख वाचून ¨बेसवाँश¨ वर

हा लेख वाचून ¨बेसवाँश¨ वर ताँड धुवून आलो...
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 11/11/2013 - 01:21

In reply to हा लेख वाचून ¨बेसवाँश¨ वर by आदूबाळ

Permalink

आम्हीपण!!! बेसवाँशवर तोंड

आम्हीपण!!! बेसवाँशवर तोंड धुतल्यावर मग़ वॉचबे पाहिले अंमळ ;) (उपसागर-निरीक्षक प्रेमी) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Mon, 11/11/2013 - 01:22

In reply to हा लेख वाचून ¨बेसवाँश¨ वर by आदूबाळ

Permalink

स्वच्छ धुतलं का?

स्वच्छ धुतलं का? आता क्राँसवर लक्ष द्या. येशू दिसेल. साईबाबा दिसणार नाहीत. त्यासाठी आरशात पहावं लागतं..
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Tue, 11/12/2013 - 17:16

In reply to स्वच्छ धुतलं का? by कवितानागेश

Permalink

(हे 'गारवा' च्या चालीत

:D (हे 'गारवा' च्या चालीत वाचायचं हां).. ताँड स्वच्छ धुऊन घे.. क्रॉसकडे बघ.. येशू दिसणार नाही.. तु संत नाहीस हे लक्षात ठेव..आता आरशात पहा.. चप्पल, पँट, घोडा सSगळं विसरुन जा.. बघ साईबाबा दिसतात का.. (आजीवन-जीवन-पंखा..)
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 11/11/2013 - 01:19

Permalink

प्रत्येक संवेदनेनं मनात असंख्य विचार आणि

असंबद्ध कल्पना उमटत जाणं मनाच्या सैरभैर अवस्थेचं लक्षण आहे. ते लेखनातून प्रकट होतयं. वेळीच सावरा.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 11/11/2013 - 01:22

In reply to प्रत्येक संवेदनेनं मनात असंख्य विचार आणि by संजय क्षीरसागर

Permalink

हे आले जज्ज!!!! एक तरी धाग़ा

हे आले जज्ज!!!! एक तरी धाग़ा धड सोडला तर शपथ =)) (संक्षीफ्यान) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 11/11/2013 - 02:08

In reply to हे आले जज्ज!!!! एक तरी धाग़ा by बॅटमॅन

Permalink

हा वड तो वड झपाटतो वडं

=)) हा वड तो वड झपाटतो वडं अचाटं प्रतिसाद हवे विळ्या भो-पळ्या वैरात केवळ नाते शोधू नवे। =))
  • Log in or register to post comments

Submitted by mohite jeevan on Mon, 11/11/2013 - 05:37

In reply to प्रत्येक संवेदनेनं मनात असंख्य विचार आणि by संजय क्षीरसागर

Permalink

सल्ले देणारे खुप आसतात.......

सल्ले देणारे खुप आसतात....... त्यातला तुमचा एक ... धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 11/11/2013 - 09:59

In reply to सल्ले देणारे खुप आसतात....... by mohite jeevan

Permalink

तुमची इच्छा!

मागे एक सदस्य असंच अनर्गल लिहीत असे. पब्लिक त्याच्या लेखनात गहन अर्थ असल्यासारखे प्रतिसाद द्यायचं. आणि माझ्या प्रत्येक लेखावर कंपू येऊन धडकायचा. वास्तविकात स्वच्छ मन म्हणजे क्लॅरिटी - समोर आहे ते सुस्पष्ट दिसणं आणि आजूबाजूला चाललेलं व्यवस्थित ऐकू येणं. याला कृष्णमूर्ती That which is म्हणतात. ती मनाची शांत आणि स्थिर अवस्था आहे. या उप्पर तुमची मर्जी.
  • Log in or register to post comments

Submitted by mohite jeevan on Mon, 11/11/2013 - 10:43

In reply to तुमची इच्छा! by संजय क्षीरसागर

Permalink

साहेब,तुमचा सल्ला चांगला आहे

साहेब,तुमचा सल्ला चांगला आहे ...... धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by देवांग on Tue, 11/19/2013 - 16:59

In reply to प्रत्येक संवेदनेनं मनात असंख्य विचार आणि by संजय क्षीरसागर

Permalink

खी खी खी खी

खी खी खी :प
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक.कुवेत on Mon, 11/11/2013 - 19:02

Permalink

अरेच्चा हि कथा

वाचायचीच राहिली. बहुतेक माझ्या स्व्च्छ मनाला दिसलीच नसेल! आजपासुन मी पण बेसवाँश मध्ये धुवुन आरशात पाहणार (चेहरा!). कथा डिट्टेल कशी लिहावि ह्याचं उत्तम उदाहरण......."म्हणुन मी खाली जाण्यासाठी पँट घालु लाग़लो,चप्पल घातले व ....." जीवनभौ अहो खाली जाताना तुम्हि काय काय घालता निदान ते तरी वगळत चला हो. बाकि कथा मनाला भीडली. शी बॉ आपल्याला असं कधी (च) लिहिता येणार नाय ह्याचा प्रचंड न्युनगंड आलाय!
  • Log in or register to post comments

Submitted by mohite jeevan on Tue, 11/12/2013 - 05:56

In reply to अरेच्चा हि कथा by दिपक.कुवेत

Permalink

दिपकराव धन्यवाद..........

दिपकराव धन्यवाद..........
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 11/12/2013 - 22:03

In reply to अरेच्चा हि कथा by दिपक.कुवेत

Permalink

@जीवनभौ अहो खाली जाताना

@जीवनभौ अहो खाली जाताना तुम्हि काय काय घालता निदान ते तरी वगळत चला हो>>> =)) ह्या ह्या ह्या =)) पूर्णपणे वारल्या गेलो आहे! =))
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on Tue, 11/12/2013 - 09:10

Permalink

आपल्या कथा नेहमीच आवडल्या आहेत...

परंतु ही कथा मात्र नो स्मोकिंग बघून लिहली काय असा संशय आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by mohite jeevan on Tue, 11/12/2013 - 10:16

In reply to आपल्या कथा नेहमीच आवडल्या आहेत... by अग्निकोल्हा

Permalink

नो स्मोकिग़ हे काय आहे?मुव्ही

नो स्मोकिग़ हे काय आहे?मुव्ही का?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on Tue, 11/12/2013 - 16:36

In reply to नो स्मोकिग़ हे काय आहे?मुव्ही by mohite jeevan

Permalink

होय

थोटचा शॉट देणारा चित्रपट. श्हाण्याना आवडात नाय, येड्यान्ना समजत नाय... ना मला आवडला ना समजला... एका कोलसेंटर मधे फक्त बुरखा घातलेल्या स्त्रियाच फोन घेत असतात /काम करत असतात असा प्रसंग आहे. त्यामधून सरकार कसे अल्पसंख्यांकाना हाताशी धरून जनतेला वेठीस धरते हे सिम्बोलिक्पने दाखवायचे होते असे अनुराग म्हणाला होता.(या नंतर आमची काय अवस्था जाली असेल समजू शकता, निम्या लोकांनी वेडाचा झटका येउ नये म्हणून चित्रपट मध्यात सोडला होता अन आम्ही मात्र झटका आलाहोता म्हणून बघायला गेलो होतो) असा प्रत्येक प्रत्येक प्रसंग सिम्बोलिक बनवलेला व् देर इज नो एस्केप असा संदेश देणारा हा चित्रपट आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 11/12/2013 - 17:13

In reply to होय by अग्निकोल्हा

Permalink

नो स्मोकिंग

अजूनही तो प्रसंग आठवला की मनात धडकी भरते ...हात पाय थर थर कापतात .. त्या रातीच्या काळ्याकुट्ट आठवणी .... मला तर काहीच कळत नव्हता ... मोरपिसे वले बाबा .. लिंबू वाले भगत ..आणि पिचू वाले वैद्य यांनी एकत्र उपाय केले तेव्हा जरा नॉर्मलला आलो होतो .. कोणावर सूड घ्यायचा असेल तर "तो" पिक्चर दाखवा ..
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Wed, 11/13/2013 - 10:11

In reply to होय by अग्निकोल्हा

Permalink

नो स्मोकिंग

मला तर बब्वॉ आवडला होता. पहिला हाफ विशेषतः
  • Log in or register to post comments

Submitted by उदय के'सागर on Tue, 11/12/2013 - 10:00

Permalink

डोळे पाणावले....

डोळे पाणावले.... बाकी कथा वाचून माहेरच्या साडी सिनेमातील किशोरी शहाणेची आठवण झाली...
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on गुरुवार, 11/14/2013 - 16:45

In reply to डोळे पाणावले.... by उदय के'सागर

Permalink

माहेरची साडी सिनेमात किशोरी

माहेरची साडी सिनेमात किशोरी शहाणे होती?
  • Log in or register to post comments

Submitted by mohite jeevan on Tue, 11/12/2013 - 10:17

Permalink

धन्यवाद

धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 11/12/2013 - 14:17

Permalink

माहेरच्या साडीत किशोरी शहाणे?

माहेरच्या साडीत किशोरी शहाणे???????? तुम्हाला अलका कुबल म्हणायचे आहे का? किशोरी शहाणे त्यावेळेस मराठी चित्रपटातून बाहेर पडली होती
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक.कुवेत on Tue, 11/12/2013 - 14:30

Permalink

ओ विजुभाउ

होती कि......अजिंक्यची आयटम होती! "काल सपना मधी माझा सजणा गं माही पप्पी घेउन गेला" हे गाणं पण तिच्यावर चित्रित झालेलं.
  • Log in or register to post comments

Submitted by साती on Tue, 11/12/2013 - 14:32

Permalink

बायको?

माझा जीवनसाहेबांच्या साहित्यसंपदेशी फारसा परिचय नाही त्यामुळे ते नेहमी कसा विचार करतात माहिती नाही. पण वरिल लेखात उल्लेखलेल्या विचारांचा संबंध बायको माहेरी गेलेली असणे या गोष्टीशी आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by mohite jeevan on Tue, 11/12/2013 - 14:47

In reply to बायको? by साती

Permalink

वैचारीक मानसाला बायको आसो

वैचारीक मानसाला बायको आसो किंवा माहेरी ग़ेलेली आसो काही फरक पडत नाही
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 11/12/2013 - 15:38

In reply to वैचारीक मानसाला बायको आसो by mohite jeevan

Permalink

वैचारीक मानसाला बायको आसो

वैचारीक मानसाला बायको आसो किंवा माहेरी ग़ेलेली आसो काही फरक पडत नाही तुम्हाला स्थितप्रज्ञ असे म्हणायचे आहे का? पुलं च्या तुझे आहे तुजपाशी मध्ये स्थितप्रज्ञाबद्दल काकाजी काय बोलतात ते पहा.
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक.कुवेत on Tue, 11/12/2013 - 14:36

Permalink

अजुन एक....

घोडयाची खिंकाळी कि किंकाळी?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 11/12/2013 - 16:52

In reply to अजुन एक.... by दिपक.कुवेत

Permalink

घोडा जो आवाज काढतो ती खिंकाळी

घोडा जो आवाज काढतो ती खिंकाळी. किंकाळी शक्यतोवर मानवी असते.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 11/12/2013 - 17:24

In reply to घोडा जो आवाज काढतो ती खिंकाळी by बॅटमॅन

Permalink

यः खिं खिं करोति सः खिंकरः

यः खिं खिं करोति सः खिंकरः ब्याटम्यानेन सह सहमतास्मि.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com