Skip to main content

आनंद - कार्लसन डाव ७

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 18/11/2013 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
४-२ गुणांनी मागे पडलेल्या आनंदसाठी अत्यंत कळीचा डाव! आज त्याला जिंकायलाच हवे. ड्रॉ होणारा प्रत्येक डाव कार्लसनला विजयाच्या जवळ नेतोय अर्ध्या गुणानी. कोणते ओपनिंग? कोणती स्ट्रॅटॅजी? २० कोटी लोक जगभरातून हा गेम फॉलो करताहेत.

~~~ तुझीच मी ~~~

लेखक प्रिया ब यांनी सोमवार, 18/11/2013 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
असशील का तू स्वप्नातला माझ्या? असेन का मी ही मनातली तुझ्या? असतील का आपल्या आवडी सारख्या? जरी नसल्या, तरी त्या आपण स्विकारुया!!! असे… आणि ह्या सारखे अनेक प्रश्न होते डोकावत पहिल्या भेटीनंतरचे माझे अस्वस्थ मन… नव्हते काही कळत अनेक प्रश्नांनी तू देखील गेला असशील भांबावून हीच असेल का "ती"?
काव्यरस

जॉनी मॅड डॉग

लेखक निनाद यांनी सोमवार, 18/11/2013 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
जॉनी मॅड डॉग आफ्रिकेतल्या एका देशात यादवी छेडली गेली आहे. एका गावावर हल्ला होतो आहे. हल्ला करणारे सैनिक हे अगदी १२ ते १५ वर्षांचे दिसताहेत. त्यांचा एक कमांडर मोठा दिसतो आहे. प्रत्येक घरातले सगळे लोक शिव्या घालून बंदुकीच्या जोरावर तुडवून बाहेर काढले जातात. गावाच्या चौकात एकत्र केले जातात. काही लोक दयेची याचना करत असतात. जे जास्त बोलतात ते लक्ष वेधून घेतात. एका क्षणात निवाडा होतो - गोळ्या अगदी सहजतेने चालतात. अशी चौकशी आणि निवाडा चाललेला असतानाच एका लहान दहा वर्षाच्या मुलाला पुढे आणले जाते. त्याचा बाप म्हणतो त्याला सोडा यात मुले कशाला? सैनिकातला एक जण विचारतो तुझा कोण तो?

मांडवाखालून !!

लेखक सूड यांनी सोमवार, 18/11/2013 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
हातातल्या बेसनाच्या लाडवाचा एक घास घेतला असेल तो फोन वाजला. उचलला खरा पण एरवी आपण होऊन कधी फोन न करणार्‍या व्यक्तीचा फोन बघून जरा आश्चर्यानेच कॉल अटेंड केला... तो,"हं, बोल मामी. काय म्हणत्येस." पलिकडून, " मी मजेत तुझं कसं काय चाल्लंय. कशी काय झाली टूर." "झाली बर्‍यापैकी, बाकी काय चाल्लंय." "बाकी रोजचंच, बरं मी काय म्हणत्ये नोकरीचं तुझं व्यवस्थित चाललंच आहे आता पुढचा काय प्लान?" "म्हणजे?" "म्हणजे लग्नाचं वैगरे कसं काय?" "अजून तरी काहीच विचार नाही, बघू कसं काय होतं ते" "बरं बघ हं, माझ्या भाचीसाठी..म्हणजे मोठी बहीण आहे कनई तिच्या मुलीसाठी स्थळ शोधणं चाललंय.

खाद्यसंस्कृती पुणेकरांची

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 18/11/2013 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
"ऐ कंबख्त तुने पेयिच नै " असे वारंवार ऐकवणार्‍या एका मित्राच्या खास आग्रहास्तव एके दिवशी धीर करुन नगरातल्या जगप्रसिद्ध लस्सीच्या दुकानात जाउन पिउन आलो. लस्सी. लस्सी पिउन आलो. उगा भलते संशय नकोत. ऑस्कर वाइल्ड (हा गे होता) एकदा फ्रान्समधल्या एका प्रसिद्ध कुंटणखान्यातुन तोंडात मारल्यासारखा चेहरा करुन बाहेर पडला होता. बरोबर आहे गाढवाला गुळाची चव काय तशी "आदमी हु आदमी से प्यार करता हु" म्हटल्यावर मग बाई ती फ्रान्समधल्या जगप्रसिद्ध वेश्यागृहातली असली तरी काय फरक पडतो. आमचेही तसेच झाले. म्हणजे कुंटणखान्यातुन बाहेर पडुन नाही. लस्सीगृहातुन बाहेर पडुन. तोंड कडु झाले.

मस्करी

लेखक प्रास यांनी रविवार, 17/11/2013 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
"म्हण्टलं, आहात का डॉक्टर?" "अगं, ये ना. काय म्हणतेस? बर्‍याच दिवसांनी येणं केलंस. कशी आहेस?" "खरं तर खूप आधीच येणार होते. क्लिनिक सुरू करतेय. म्हणजे जागा घेतलीय, भाड्यानेच; पण घेतलीय. गरजेपुरतं फर्निचर करतेय, होईल महिन्याभरात. एकदा येऊन जा. आणखी काय लागेल वगैरे, तुझ्या टिप्स महत्त्वाच्या..." "अरे वा! अभिनंदन!! आहे कुठे ही जागा?" "घराजवळच आहे माझ्या, ४-५ बिल्डिंगसोडूनच मिळाली. थोडी महाग आहे पण घेतलीय ३ वर्षांसाठी तरी..." "छानच की!

चार विनोद

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 17/11/2013 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
विनोद: लेखक- निमिष सोनार 1) एक सरदार कामासाठी बँकेत जातो. काम झाल्यावर तो एक सूचना वाचतो, "आपल्याला बँकेबद्दल तक्रार असल्यास या पेटीत टाका " तो हे वाचून एक नवी वही विकत आणतो, एक पान फाडतो त्यावर लिहीतो, "मला या बँकेबद्दल काही तक्रार नाही " पेटीत टाकतो आणि निघून जातो. 2) बागेत बाकड्या जवळ एक सूचना लावली होती, "रंग ओला आहे. हात लावू नका. बसू नका. खात्री नसली तर हात लावाच. रंग निघाल्यास बाकड्याखाली ब्रश आणि रंग ठेवले आहे. रंग द्या आणि जा. " 3) एका रेडीओ वर एकदा घोषणा करतात, "आपण पहात आहात आकाशवाणी " 4) विज महामंडळ प्रायोजीत मालीका, "कटौती बीजली की " प्रसारण समय— लोड शेडींग सुरू झाल्यावर

चला व्हिएतनामला ०१ : पूर्वपीठिका आणि “हा नोई” त पदार्पण

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 17/11/2013 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
==================================================================== चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८...

बरं झालं मी नोकरी करतो

लेखक चाणक्य यांनी रविवार, 17/11/2013 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
बरं झालं मी नोकरी करतो नाहीतर, लोक म्हणाले असतेच की कविता करून काय पोट भरतं का किंवा हसले असते काहीजण कुचेष्टेने मला... मग मी ही दाढी वगैरे वाढवून कवितेने पोट भरायच्या मागे लागलो असतो धडपडत राहीलो असतो नसलेलं काहीतरी सिद्ध करून दाखवायला आणि भेटत राहीलो असतो जगाला एक तकलादू स्वाभिमान खिशात घेवून माझ्या शबनम मधून काढून काढून आल्या गेल्याला दाखवला असता मी माझ्यातला एक 'उपेक्षित कलाकार'.... अगदी मला टाळेपर्यंत ऐकवल्या असत्या लोकांना मी माझ्या कविता आणि गझला आयताकृती घडी केलेला कुठलातरी साप्ताहिक किंवा दिवाळी अंक बनला असता मग माझ्या कवी असण्याचा पुरावा.... पण आज? आज कसंय ना, की माझी नोकरी हाच पुराव

एका शहराची 'खाद्यसंस्कृती'

लेखक सुज्ञ यांनी रविवार, 17/11/2013 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाचे शीर्षक वाचून आपल्या लक्षात आलंच असेल कि लेखाचा विषय किती मोठा आहे . तुम्ही कधी माणूस चरताना बघितलाय का हो ? आणि नुसता गुरासारखा चरत असून परत स्वतःला खवैय्या म्हणताना … लवकर या गावात या … भाई काकांचाच एक वाक्य आहे , खूप गाणी गाणारा गावैय्या नव्हे तसे खूप खाणारा खवैय्या न्हवे.