Skip to main content

डॉ. आंबेडकर, बुद्ध आणि मार्क्स

लेखक Atul Thakur यांनी शुक्रवार, 06/12/2013 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या अखेरीला “बुद्ध कि मार्क्स” नावाचा निबंध लिहुन मार्क्सवादाबद्दलचे स्वतःचे विचार नि:संदिग्धपणे स्पष्ट केले. त्यामुळे काहिंची कुचंबणा झाली. विषेशतः दलित मार्क्सवाद्यांची अवस्था कायमस्वरुपी दयनिय झाली. खरंतर तसं होण्याची गरज नाही. ज्या कुठल्या तत्वज्ञानाने तुम्ही भारुन गेला आहात त्यात जगातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत या भ्रमात नसलं, त्यातील उणीवांचं भान असलं, त्या मान्य करण्याइतपत प्रामाणिकपणा तुमच्यात असला तर कसलेही प्रश्न उद्भवण्याची गरज नाही. पण नेमकी समस्या येथे आहे. एका पोथीत सारे काही आहे. संपुर्ण जग बदलण्याची कुवत आहे.

एकमात्र

लेखक जयनीत यांनी शुक्रवार, 06/12/2013 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्गम घाटातील अरुंद वाटा, कठीण चढ अन खडकाळ जमिनी वरून तोल सांभाळत चालतांना जनावरे दमुन जात, सर्वांगातून घामाच्या धारा लागत, अतिश्रमाने जनावरांचे तोंड फेसाळून येई, जनावर अतिशय गलितगात्र होऊन जाई. भूताच्या फे-यावर पोहोचल्या वर मी मी म्हणणा-या निधडया छातीच्या गाडीवानांच्या काळजातही धस्स झाल्याशिवाय रहायचे नाही. घाटातील ह्या दोन वळणात उंचच उंच कड्याकपारीं अन खोल खोल द-या खो-यातून घोंगावणारे वारे, घनदाट झाडीतील पानांची सळसळ, दूरवर कोसळत असलेल्या धबधब्याचा आवाज ह्या सगळ्यांनी अनेक स्पंदने निर्माण होत. अशी स्पंदने आणि छाया प्रकाशाचा खेळ भूताच्या फे-यात जरा जास्तीच गूढरम्य विभ्रम निर्माण करीत असे.

नेताजींचे सहवासात पुस्तक परिचय - भाग २

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 06/12/2013 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक परिचय - नेताजींचे सहवासात भाग २ .. भाग 2 प्रस्तावना - ... पु. ना. ओकांच्या नेताजींचे सहवासात पुस्तकाचा मुकुटमणी आहे प्रकरण १० हे. त्यात बाबत प्रस्तावनेत तिखट उल्लेख आहे. ‘इसापनीती, पंचतंत्र अथवा हितोपदेश इत्यादि ग्रंथ जसे काऊ-चिऊच्या गोष्टी सांगण्याच्या उद्देशाने लिहिलेले नाहीत तद्वत प्रस्तूत ग्रंथही केवळ मनोरंजनासाठी लिहिलेला नाही.

~देवा आता हार मान तू~

लेखक वैभवकुमारन यांनी शुक्रवार, 06/12/2013 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
~देवा आता हार मान तू~ देवा आता हार मान तू बघुनी खालचे तांडव सारे दिलास जन्म मानवास तू पण झाले सगळे वानर साले उभा केला तुला देवळात अन उद्बत्तीचे सुवास वारे तुझ्याच पायावरती सजले मांसाचे ते ढेर सारे तुला छीनले दगडातुनी अन तुझे कोरले देह सारे हाती चिपळ्या नास्तिकांच्या मुखी मात्र तुझे नाव रे उद्गाता तू चराचराचा उरी तुझ्या हा विश्व भार रे तुला जमीनीत गाढण्याआधी देवा आता तू खाली धाव रे देवा आता हार मान तू गेले अस्तित्व राहिले नारे गाभारेही वाहून जातील वाहण्याआधी तू खाली धाव रे ~वैभव कुलकर्णी ~

अधुरि एक कहानी भाग-४

लेखक नॉन रेसिडेन्षियल मराठी यांनी शुक्रवार, 06/12/2013 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्दैवाने पक्याला आपल्या कॉलेज साठी गाव सोडावे लागले.त्यापूर्वी ती आणि पक्या एकदाच भेटले होते,हां पण दोघांच्याही कुटुंबासोबत...पण पक्या जवळ इतके धैर्य नव्हते की तो मनातील तिला बोलू शकेल.तिलाही माहीत होते की याच्या मनात काय आहे आणि यालाही माहीत होते की तिच्या मनात काय आहे !पण कुणी मात्र बोलायला तयार नव्हते. काळ त्याच्या वेगाने पुढे सरकत गेला.गाव सोडल्यावर पक्या चे कशात मन लागेना.सारखी तिची अबोल प्रीत त्याला खूणावत् असे.२ वर्षाच्या गॅप नंतर दोघे ही त्याच शहरात पुन्हा एकदा भेटले.तिचे कुटुंब ही आता तिथेच आले होते राहायला.पक्याला आणि तिलाही बरे वाटले.पण मनातील कुणीच काही बोलेना.अबोल प्रेम तसेच सुर

"पाऊस येईल"

लेखक अमेय६३७७ यांनी शुक्रवार, 06/12/2013 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
नको फुलवूस श्वास नको हताश होऊस तुझ्या अंगणातही रे आता पडेल पाऊस येता बरसून धारा मेघव्यथेला घेऊन सहवेदनेची दिठी, डोळा जाईल भरून जाणीवाही नवनव्या उरातून वाहतील जे ना आकळले कधी माग त्याचा काढतील असे जगासाठी जुना तुझा पहिला असेल कायामन भिजताना खूप काही गवसेल नको आकांत जिवाचा नको पाण्यामध्ये देव फक्त स्वागतासाठी तू भुई नांगरून ठेव -- अमेय

हिंदु अंत्यसंस्कार आणि दफन

लेखक उद्दाम यांनी शुक्रवार, 06/12/2013 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदु अंत्यसंस्कार आणि दफन हिंदु धर्मात दहन केले जाते. पण एक माणूस जाळायला लाकूड फार लागते. विजेवरची दहन सोय सगळीकडे उपलब्ध नसते. त्यामुळे हिंदु लोकानाही दफनाची सोय करता येईल काय? ( सध्या लिंगायत समाजात अशी पद्धत आहे. ) दफनाला लाकूड लागत नाही. शिवाय ठराविक काळ ८-१० वर्षे वगैरे गेला की त्याच जागेत पुन्हा पुन्हा दफन होऊ शकते. दफन करायचे असेल तर हिंदु धर्मातही एक सोय आहे. मोठा संत होणे आणि समाधी घेणे, पण सामान्याना ते जमणारे नाही. मग सामान्याना अशी सोय आपल्या धर्माने किंवा शासनाने का केली नाही?

अधुरि इक कहानी भाग-३

लेखक नॉन रेसिडेन्षियल मराठी यांनी शुक्रवार, 06/12/2013 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणता म्हणता दिवस जाऊ लागले आणि मग पक्याला हवी ती संधी मिळाली....तिच्या घरी जायची ! संक्रांतीचा तिळ-गुळ द्यायला तेव्हा सगळी मुले-मुली १४जानेवरीच्या सायन्काळी परिचितांच्या आणि गावातील सगल्या शिक्षकांच्या घरी ही जात.पक्याच्या घरीही येत सगळी मुले-मुली.आणि या पेक्षा उत्तम कारण पक्या ला कुठले मिळणार होते? झाले पक्याची सकाळपासूनच तयारी सुरू होती.कुठला ड्रेस आज घालायचा यावर १० वेळा विचार करून झाला होता.केस ही अगदी तेल लावून चोपून कोंबडा बनवून बसवून घेतले होते ठीक ठाक.

बाबासाहेबांना विनम्र अभिवादन

लेखक सचीन यांनी शुक्रवार, 06/12/2013 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. शतकानु शतके धर्माच्या नावाखाली निर्दयी समाजाचा जुलूम अत्याचार सोसणाऱ्या कोट्यावधी अस्पृश समाजाला त्यातून बाहेर काढून मानाचे स्थान देणाऱ्या ह्या खऱ्याखुऱ्या भारताच्या रत्नास त्रिवार अभिवादन.भारतभूमीत धर्माच्या नावाखाली कोट्यावधी लोकांना जनावरासारखे वागवले जात असे त्यांना वाळीत टाकले जात असे त्यांना शिवणे म्हणजे विटाळ झाला असे मानले जात असे. लोक गोमुत्र पीत पण त्यांच्यासारख्याच हाडामासाच्या असलेल्या दलिताच्या हातचे शुद्ध पाणी त्यांना चालत नसे.

अधुरी एक कहानी- भाग-२

लेखक नॉन रेसिडेन्षियल मराठी यांनी शुक्रवार, 06/12/2013 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
पक्या आपल्ल्या कथेचा नायक,तसा १० वीला होता यंदा.वर्गातील नव्हे तर शाळेतील एक हुशार विद्यार्थी म्हणून नावाजलेला होता.आणि का असु नये,अहो शिक्षकाच्या घरात जन्माला आलेले २ रे रत्न होते ते.अगदी सरळ रेषेत जीवन जगणे त्याने लहानपनात शिकून घेतले होते.छोट्याश्या गावात शिक्षकाला खूप आदराने पहिले जाते.साहजिकच पक्याला ही लहानपणीच याची जाणीव पदोपदी होत राहिली आणि मग सरळ रेषेत जीवन जगणे काय असते,याचे चपखल उदाहरण बनून गेला आपला पक्या!त्यामुळे आपल्याला मिळणारा मान हा आपला नसून आपल्या तीर्थरूपानमुळे आहे हे त्याला नेहमी लक्षात ठेवावे लागे. त्यामुळे बालपण कसे अगदी शिस्तीत गेलेले.