Skip to main content

जरा सांगा कुठे जाऊ !

लेखक आनंदराव यांनी सोमवार, 09/12/2013 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रनो आणि मैत्रिनिनो , ४ दिवस मी आणि बायको फिरायला जाईन म्हणतोय. लग्नाचा वाढदिवस जवळ आलाय हो. आम्हाला स्वताच्या गाडीने फिरण्याची फार हौस अहे. ( खाज?) आणि कोकण किनारपट्टी ला आमचे जाऊन झाले अहे. कोस्टल कर्नाटक पण झाले अहे. केरळ ४ दिवसात जाऊन होणार नहि. आणि कोलकत्ता वगैरे तर फारच लांब हो. म्हणजे आम्हाला कसे पाहिजे कि ट्रीप तर ४ दिवसाचीच झाली पाहिजे, पण ठिकाण पण बघून झाले पहिजे. मध्य प्रदेश - म्हणजे इंदोर वगैरे …. काय ? जरा कुठे जाऊ ते ठरवायला मदत करा कि. हक्काची विनंती आहे तुम्हाला .

जत्रा

लेखक विनय_६६७ यांनी सोमवार, 09/12/2013 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ कविता, कवी ,सर्वांची माफी मागून जत्रा -भारनियमनाची हा भार सोसंना जनता झालीय हैराण गावात लाईट नाई बंद पडलीय गिरण , सांग तू माझ्या राजा कस आणू मी दळण , दिवाळी आली हि दारात पर नाई नाई लाईट हि घरात बोंब बोंब बोंब बोंब बोंब . . . . . . -------------विनय गदो

अश्वत्थामा, व्यासांचा आणि जीएंचा!

लेखक Atul Thakur यांनी सोमवार, 09/12/2013 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
जीएंना महाभारताचे खुप आकर्षण होते हे आता सर्वश्रुत आहे. प्रतिभावंताचा विषय निघाला की जीए हटकुन व्यासांचे नाव घेत. जीएंच्या कथांमध्ये काही ठिकाणी महाभारताचे संदर्भ आलेले आढळतात. त्या उपमांनी, संदर्भांनी जीएंच्या कथांना एक वेगळीच श्रीमंती बहाल केलेली दिसते. त्यादृष्टीने जीएंची पत्रे महत्वाची आहेत. विशेषतः सुनिताबाईंना लिहिलेल्या जीएंच्या पत्रांत त्यांनी महाभारतावर, त्यातील व्यक्तीरेखांवर चर्चा केली आहे. ज्या तर्‍हेने जीए या विषयावर लिहितात त्यावरुन हे जाणवते की महाभारत हा त्यांच्या सततच्या चिंतनाचा विषय असावा.

'आणि मिळवा एक चित्र' चा निकाल

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 09/12/2013 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भः http://www.misalpav.com/node/26057 निकालास बराच उशीर होत असल्याबद्दल क्षमस्व. आमच्या विनंतीस मान देऊन मिपाकरांनी प्रेमाने उतमोत्तम, अभ्यासपूर्ण प्रतिदाद दिले, त्याबद्दल सर्वांचे आभार. सर्वच प्रतिसाद मननीय आहेत, त्यात डावे उजवे ठरवणे अवघड. तरी त्यातल्या त्यात निवड करणे क्रमप्राप्त असल्याने (एकाच्या ऐवजी) तीन विजेत्यांना मी चित्र देणार आहे: वल्ली, पैसा आणि प्रसाद गोडबोले. वल्ली यांनी तात्कालीन राजकारण, शत्रु-मित्र राज्ये, भूगोल इ.

सखे ..........

लेखक विनय_६६७ यांनी सोमवार, 09/12/2013 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
सखे , खर सांगू , आता न खूप हलके वाटतेय! खर तू परत आलीस, यावर विश्वास बसतच नव्हता. का कुणास ठाऊक, तुझ्यात ती पूर्वीची तू दिसत नव्हतीस, आणि ते तू कबुल हि केलेस. एरव्ही माझ्या एका शब्दाला तुझे १० शब्द असायचे पण आज ? चक्क तू ? तूच होतीस ती ? कदाचित माझ्या जागी तू जरी असतीस तरी विश्वास ठेवला नसतास यावर. शांतपणे म्हणालीस तू ‘’ .... मी आता तिला ( माझ्या त्या पूर्वीच्या ) ..... मारून टाकलेय. आतापर्यंत हळवी, मनमिळाऊ. भावनाप्रधान, पाहिलीस तू मला, पण आज मी त्या माझ्या रुपाला तिलांजली दिलीय .......किती धक्कादायक सुखद धक्का होता तो? तुझा विश्वास बसणार नाही पण मला तू अशीच हवी होतिस.

बोकुल्या ये ना

लेखक विनय_६६७ यांनी सोमवार, 09/12/2013 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ कवी , कविता , गायक , संगीतकार या सर्वांची माफी मागून एक निरागस प्रयत्न बोकुल्या ये ना , प्रिया जगू कशी तुझ्याविना मी राजा रे कशी ही जिंदगीत आणिबाणी रे ये ना बोकू मी तर प्रेम दिवाणी मनुली दे प्यार जरासा बोकुल्या प्रिया, उगाच मी माणसांत बुडाले तुला सोडून मी छळून गेले रे ये बोकुल्या ! विसर झाले गेले सख्या रे शरण आले बोकुल्या तुला रे मस्त मस्त हि दुधारी हवा दुग्ध गंध हा कसला नवा साथ हि मलाच तुझी हवी एकटा असा छळतो हा tomya मला तुझी माझी जोडी अशी फुले बोकुराजा दुधावर जशी गोड येई सायबाई तू ये ना, तू ये ना ना ना ना ! ये असा बिळात ये बोकुल्या तुझा नवाच ड्रेस घालूनी स्वप्न आज जा

सिंगापुरातील दंगल

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 09/12/2013 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
आज एक महत्वाची बातमी वाचली. महत्वाची मी म्हणतोय कारण ती मला महत्वाची वाटली. सिंगापूर मधे भारतीय वंशाच्या एका कामगाराचा अपघाती मृत्यू आणि त्यानंतर दंगल. त्या दंगलीत अनेक जखमी, लाखोंची वित्तहानी इत्यादी. सिंगापूर हा अतिशय शांत देश आहे, तिथे न्यायव्यवस्था अतिशय कडक आहे आणि त्यामुळे तो एक सेफ देश समजला जातो. हे खरं आहे, तिथे रहाणा-या माझ्या परिचयाच्या व्यक्तींच्या अनुभवावरून मी असं म्हणू शकतो. आता तिथे ही अशी घटना झाली. जी गेल्या ३० वर्षात झाली नव्हती.

शेअर मार्केट आणि मी.

लेखक ज्ञानव यांनी सोमवार, 09/12/2013 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
वास्तविक शेअर मार्केट हा सगळ्यांचा वादाचा, समज - गैरसमजाचा असा विषय आहे. पण मला कळलेले मार्केट (जे प्रत्येकाचे वेगवेगळे असणार कारण ते चक्रधर स्वामींच्या दृष्टांतासारखे आहे. )थोडेसे असे की ज्यात दोन प्रकारचे पैसे कमावण्याचे मार्ग लोक ढोबळपणे अवलंबतात. अत्यंत किचकट ट्रेडिंग प्रणाली पासून लांब राहून मी माझे काही ट्रेडिंग आणि गुंतवणुकीचे साधे प्रयोग केले ते हि मांडतो आहे. तर १) गुंतवणूक योग्य मार्केट २) ट्रेडिंग योग्य मार्केट. दोन्ही पद्धतीच्या मार्केट मध्ये अभ्यास हा अपेक्षित आहे.

बीटकॉईन: डिजीटल वा व्हर्च्युअल करन्सी, सत्य की मिथ्था ??

लेखक प्रसाद भागवत यांनी सोमवार, 09/12/2013 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
मी शाळेंत असताना एकदा तीव्र नाणेटंचाई निर्माण झाली, सुट्ट्या पैशांच्या कमतरतेवर उतारा म्हणुन मुंबईत 'बेस्ट' ने स्वतःची अशी कुपन्स छापली होती ........ मला जाणवलेली ही चलन विषयक पहिली समस्या. नंतर बरीच स्थित्यंतरे झाली, विद्यार्थी दशेंतील स्वप्नवत जगांतुन खर्या जगात येणे झाले आणि अर्थशास्त्राच्या पुस्तकांतुन पिडणार्या चलन फुगवटा आणि व्यवहारांत भेडसावणार्या चलन तुटवडा यांच्यासारख्या गंभीर समस्यांची ओळ्ख झाली. त्यातुन पुढे सरकतो नाही तोच नव्या शतकाच्या उदयाबरोबरच संगणकाच्या क्रुपेमुळे आभासी जगाची अनुभुती येउ लागली.

मेरे सामनेवाली खिडकी मे... २

लेखक वडापाव यांनी रविवार, 08/12/2013 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
मेरे सामनेवाली खिडकी मे ***** ती बसली होती. मी तिच्या समोर बसलो होतो. ती माझ्याकडे बघून हसत होती. मी तिच्याकडे बघून हसत होतो. तिने माझ्याकडे बघत बघत मला हनुवटी खाली करून जवळ बोलावलं. मी हळूच सरकत तिकडे गेलो. माझी छाती धडधड करत होती. मी जवळ गेलो. ती लाजली. हसली. माझ्या छातीतली धडधड वाढली. मग तिनं एक हात माझ्या खांद्यावर ठेवला, आणि दाबला. मी त्यामुळे जरा खाली झालो. तिने माझ्या कानाजवळ दुस-या हाताचा कंस केला आणि तिचे ओठ माझ्या कानाच्या अगदी जवळ आणले. काय सांगेल ही आता मला? खरंच काहीतरी सांगणार आहे की दुसरंच काहीतरी करणार आहे?