Skip to main content

दिवस आठवले आपल्या जुन्या मैफिलीचे.....

लेखक पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे यांनी शुक्रवार, 20/12/2013 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
सुर पडता कानावर बासरीचे ढवळुन निघते भावविश्व अंतरीचे लेखणीतुनी मांडतो दु।ख मनीचे आठवती दिवस आपुल्या मैफिलीचे....... नवखे होतो आपण सारेच येथे धडपडत होतो आपण सारेच येथे नवनिर्मीतीची होती कास मनी खुप यश मिलवण्याचा ध्यास मनी कधी भेट झाली कधी मित्र झालो कधी सुर जुळले कधी एक झालो काही होते खास तुझ्यात काही मझ्यात काही होते खास आपल्यात रियाज झाले, बैठका झाल्या कागदावरी काही कविता आल्या सुराला शब्द शब्दाला सुर भेटले पहिल्या मैफिलीचे तेथेच ठरले पहिला कार्यक्रम, दुसरा कार्यक्रम बोलता बोलता तीन कार्यक्रम झाले नुसते झाले नव्हे यशस्वी झाले नाहि!

सोने : बघावे, घ्यावे की -----

लेखक प्रसाद भागवत यांनी शुक्रवार, 20/12/2013 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल च्या मध्यास लिहिलेला हा पोस्ट अधिक विचारमंथनाच्या अपेक्षेने मिपाच्या वाचकांबरोबर शेअर करतो आहे.- आमच्या १५ हुन अधिक वर्षांच्या वैवाहिक वाटचालीत काल प्रथमच सौ. ने माझ्या व्यावसायिक बुद्धीमत्तेवर थोडासा विश्वास दाखवत असल्याचे दाखवुन स्वतःच्या बुद्धीमत्तेची चुणुक दाखवली. "सोने खुप खाली आले आहे म्हणे, लोकं घेतायत, तुझे काय मत आहे??" ह्या तिच्या 'लाखामोलाच्या' प्रश्नाने मी गडबडलो. याशिवाय अपेक्षे्प्रमाणे क्लायंट्सच्या जवळ्पास प्रत्येक फोनमध्येही हा विषय येत् होताच.

आयुष्य

लेखक हेमान्गी यांनी शुक्रवार, 20/12/2013 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या वाटा थोडे खळगे थोड्या लाटा जपून चालावे तर लाटांबरोबर वाहत जाण्याची भीती धावत जावे तर खळग्यात पडण्याची भीती तरीही मन होते फुलपाखरू स्वप्नगंधी फुलांनी लागते बहरू आसमन्ताच्या जादूने रंगांची उधळण अंगणात जणू प्राजक्ताची पखरण वृक्षवल्लींना चढतो फुलांचा साज कधी गंभीर होते मन ऐकून समुद्राची गाज बहर ओसरू लागताच तुटतात स्वप्न साखळ्या कागदावर उतरू लागतात शब्द चारोळ्या

बालस्नेहसंमेलन

लेखक मितान यांनी शुक्रवार, 20/12/2013 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी झाली की शाळांना स्नेहसंमेलनाचे वेध लागतात. त्यात चिमुकल्यांच्या आनंदाला तर उधाण येतं. शिशुवर्ग आणि बालवर्गाची तर ही पहिलीवाहिली संमेलनं. पहिल्यांदाच नेहमीपेक्षा वेगळा पोषाख, नाटकात काम, गाण्यावर नाच, फॅन्सी ड्रेस, पाठांतर, गोष्ट सांगणं, लिंबू चमचा नि बेडूक उड्या ! शाळा कोणतीही असो, कोणत्याही गावातली, कोणत्याही माध्यमाची नि बोर्डाची, गरिबीतली किंवा श्रीमंतीतली ; छोट्या वर्गांच्या स्नेहसंमेलनाची धमाल सगळेकडे सारखीच ! अशाच काही संमेलनातील निरीक्षणे. एका शाळेच्या क्रीडास्पर्धा. बेडुक उड्या. भल्या सकाळी ७:३० वाजता आपापल्या चिमुकल्यांना मैदानावर घेऊन आलेले पालक.

अर्थक्षेत्र भाग - २ (पहिल्या लॉस नंतरची सुरुवात )

लेखक ज्ञानव यांनी शुक्रवार, 20/12/2013 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================================== अर्थक्षेत्र भाग १ (शेअर मार्केटमधला पहिला लॉस ) =================================================================================== बापट आशेने आले होते. मला माझा पहिला ट्रेड आणि पहिला लॉस आठवला कुणा एका डीलरने मला असेच हिंदुस्तान मोटर्स मध्ये दोन दिवस प्रोफिट करून दिला आणि चटक लागल्यावर गंडवले. पण असे बरेच बापट (बापट ह्या शब्दाचा अर्थ एके काळी अर्धा असा होता.. हल्ली काय आहे माहित नाही.)मी तेव्हा पासुन आज पर्यंत पाहतो आहे.

चिर अनंत

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 20/12/2013 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा सुखे परतून न येती पानांवर जैसे दंव मोती ओघळल्या स्वप्नांचे अंती व्रण कांचेचे उरती परा शरांचे ढंग निराळे छटा उमलुनिया वावरती विमल कोवळे पराग गंधित माल्य फुलांवर लवलवती परम अलौकिक सण नियतीचे दरवळती वाटेवरती क्षणभंगुर वैभव हे पण अस्वाद कुणी घेती ना घेती पसा असू दे याचकसम आमंत्रक सदा नयन भरती आसपास चिर अनंत कोटी अमृतमय कण भिरभिरती धुंद सरोवर कुंद सभोवर शकुनांचे मेणे अवती माया ईश वराची अवघी चराचरावर ओघवती ……………… अज्ञात
काव्यरस

चीनला हवीत मुले

लेखक अमित खोजे यांनी शुक्रवार, 20/12/2013 03:36 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वीपासून आपल्या देशातली घाण आणि भ्रष्टाचार याला आपली लोकसंख्या जबाबदार आहे हा विचार माझ्या डोक्यात अगदी पक्का बसला होता. नेहमी मला वाटायचे कि अमेरिकेत असते तशी स्वच्छता, टापटीपपणा, कमी भ्रष्टाचार, वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी हे सर्व आपल्याकडे का नाही तर जनसंख्या. एवढी लोकं असताना कुणाकुणाला आणि कधी शिस्त लावणार? त्यामुळे आपल्या देशात जर चीन सारखी "हम दो हमारा एक" अशी योजना जर केली तर किती बरे होईल!

नेहमीचंच !

लेखक सुहास.. यांनी शुक्रवार, 20/12/2013 01:34 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी आली की मारवाडी रेशनच्या दुकानासमोर एक पलंग टाकतो, पलंगावर एक सतरंजी, काही फळांची रिकामी झालेली लाकडी खोकी खाली-वर पायर्‍यांसारखी चढण करुन विक्रीसाठी फटाक्याची रास लावतो. संध्याकाळी सात साडे-सातच्या सुमारास लक्ष्मीपुजनाचा तो दिवस, सगळी दुनिया सजलेली असते, सजवलेली असते, सगळ्यांच्या अगांत नवीन कपडे, घरा-घरातुन फराळाचा सुगंध, कुठे धुप तर कुठे दीपमाळ, कुठे लायंटिंग तर कुठे १००० फटाक्याची लड लावलेली !! चैतन्यमय आणि प्रसन्नचित्त वातावरणामध्ये 'ती' मारवाड्याच्या दुकानापुढे उभी रहाते.

चला व्हिएतनामला ०९ : मेकाँगचा त्रिभूज प्रदेश आणि विन् त्रांग पॅगोडा

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 19/12/2013 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...