Skip to main content

पुखेत-पट्टाया-बँकॉक टुर - दिवस सहावा

लेखक दिपक.कुवेत यांनी गुरुवार, 26/12/2013 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज पटटायाला बाय बाय करुन मेन सीटि आणि टुर मधला शेवटचा थांबा बँकॉक कडे प्रयाण करायचं होतं. ड्रायव्हर दुपारी १२:३० ला येणार होता. ब्रेकफास्ट करता करता कळलं कि पट्टाया बीच ईबीस हॉटेलच्या पाठिच आहे. मग काय चेक आउट करुन बॅगा रीसेप्शन काउंटरवर ठेवल्या आणि आम्हि उरलेला वेळ सत्कारणी लावण्यासाठि बाहेर पडलो. १.

आमच्या पण अंधश्रद्धा......

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 26/12/2013 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाची प्रेरणा....http://misalpav.com/node/26546 १. मोठे झालो की, नौकरी लागते आणि मग आपल्याला काय हवे ते खाता येते. २. लग्न झाले, की बायको पाय चेपते,डोक्याचे मॉलीश करते. ३. ताजा पेपर वाचायला मिळतो. आणि सगळ्यात महत्वाचे... ४. रविवारी सकाळी ११ पर्यंत झोपायला मिळते. (अतिसामान्य माणूस असल्याने, ह्यापेक्षा जास्त काही मागणे न्हवते हो..पण....जावू दे...घरोघर तीच कहाणी आणि तेच रडगाणे)

आधुनिक अंधश्रद्धा

लेखक arunjoshi123 यांनी गुरुवार, 26/12/2013 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
काही लोक खरोखरीचे पुरोगामी असतात. काही नसतात. काही दिशा भरकटलेले असतात. म्हणजे त्यांची इच्छा शुद्ध पुरोगामी असायची असते पण त्यांना पुरोगामीत्वाची दुसरी बाजू माहितच नसते. त्यांचे मते 'पारंपारिकतेला बदडणे' हीच काय ती पुरोगामीता. भारताच्या दृष्टीकोनातून पाहता अशा बर्‍याच गोष्टी आहेत ज्या पारंपारिक नाहीत, पण प्रतिगामी आहेत. मी इथे त्यांची यादी बनवायचा प्रयत्न करत आहे. सखोल विश्लेषण अर्थातच मी दिलेले नाही. १. घटना. आपल्याला 'घटनेने' अधिकार दिलेले आहेत असे मानणे. मग एका राजामधे आणि घटनेत फरक काय? राजाच्या बोलण्यात किमान थोडी फ्लेक्सिबिलिटी असू शकते, घटना एकादा लिहिली कि फिक्स.

अनाहिता ठाणे कट्टा

लेखक भावना कल्लोळ यांनी गुरुवार, 26/12/2013 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आजच्या ठळक बातम्या ……… तर दिनांक २२ डिसेंबर २०१३ रोजी अतिचर्चित आणि दर वेळे प्रमाणे फाटे न फुटता खूप वेळेपासून गाजत असलेला अनाहिताचा पहिला वाहिला कट्टा हा ठाणे येथील स्वाद उपहारगृहामध्ये नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा का होईना पार पडला. परदेशी वास्तव्यास असलेल्या आमच्या काही मिपा अनाहिता अनाहुतपणे भारतवारी करण्यास आल्या होत्या आणि त्या आपसुकच या आमच्या कट्ट्या मध्ये गवसल्या. या कट्ट्याचे सर्वेसर्वा लिमाउजेट उर्फ माऊ यांनी अनाहितावर धागा काढला आणि बाकी सर्वं अनाहिताना पिंगवले.

हे आणि ते - १: पाहुणचार

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी गुरुवार, 26/12/2013 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात एक गंमतीदार अनुभव आला. माझी एक आजी तिच्या भाचीच्या मुलाच्या लग्नानिमित्त तिच्याकडे उतरली होती. लग्नघर असल्याने आणि अर्थातच वार्धक्यामुळे आजीला माझ्या घरी येणं शक्य नसल्याने तिनेच सुचवल्याप्रमाणे तिला भेटायला मी तिथे गेलो. तिच्या माहेरच्या मंडळींशी ख्यालीखुशाली विचारणार्‍या गप्पा झाल्या. त्यांचा आधीपासून परिचय होताच, त्यामुळे गप्पांना वैयक्तिक संदर्भही लाभला. पण त्या बोलण्याला गप्पा असं म्हणणं म्हणजे विंदू दारा सिंगला अभिनेता म्हणण्यासारखं आहे. मी बहुतेक अत्यंत चुकीच्या वेळेला तिथे पोहोचलो होतो.

हिंदु पुरुषांना एका पेक्षा अधिक विवाह करण्यास प्रतिबंध नसावा !

लेखक मारवा यांनी गुरुवार, 26/12/2013 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
भारताचे कायदे विचीत्र आहेत इथे समानतेच्या मोठ्या गप्पा मारल्या जातात परंतु प्रत्यक्षात कायदाच समान हक्क देत नाही. या संबधीची एक सर्वात खटकणारी बाब म्हणजे हिंदु पुरुष असेल व त्याची एका पेक्षा अधिक स्त्रीयांशी विवाह करण्याची आकांक्षा/ क्षमता असेल आणि संबंधित स्त्रीयांची ही आनंदाने या विवाहाला संमती/तयारी असेल तरी एका हिंदु पुरुषाला भारताचा कायदा द्विभार्या प्रतिबंधन घालुन हा हक्क नाकारतो. आणि त्याच वेळी इतर धर्मीयांस ही परवानगी देतो. यात कसली आलीय समानता? असा प्रतिबंध नेमका कोणत्या भुमिकेतुन हिंदु प्रुरुषांवर लादण्यात आलेला आहे याची माहीती नाही.

छोटीसी मुलाकात प्यार बन गयी...

लेखक वडापाव यांनी गुरुवार, 26/12/2013 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
अकरावीचं वर्ष. शाळेच्या युनिफॉर्मचा त्याग करून कॉलेजच्या कट्ट्यावर फॅशनेबल कपड्यांत रॅम्पवॉक करायला उत्सुक असलेल्या शेकडो मुलींची चाल; आणि आपल्या सात-आठ जणांच्या घोळक्याला कॉलेज सुरु होऊन तीन-चार महिने उलटले तरी अजुनही एकाही संघभेदिकेचा लाभ का झाला नाही या व्यथेत पडलेल्या माझी नजर यांची सतत पकडापकडी चालायची. पकडापकडी का, झटापटीच म्हणा ना. या सुंदर मुली स्वत:बरोबर त्यांच्यावर जळणा-या, राहणीमानाच्या पद्धतीत त्यांची नक्कल करणा-या किमान एक-दोन मुलींना सोबत घेऊन फिरत असायच्या.

हिवाळ्याची मौज: फुलगोभी मटार पोहे

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 25/12/2013 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
मी रहात असेलेल्या उत्तम नगर भागात डिसेंबर महिना सुरु झाल्या बरोबर भाज्या स्वस्त होऊ लागतात. ४-५ किलोमीटर दूर एक मोठी सब्जीमंडी आहे व दिल्लीचा ग्रामीण भाग ही जवळ आहे. शिवाय येथे दररोज जवळपास (किलोमीटर आतच कुठे न कुठे साप्ताहिक बाजार लागतोच). गेल्या सोमवारच्या बाजारात सर्वच भाज्या पालक, बाथू, सरसों, मुळा, गाजर इत्यादी १० किलो होत्या. फुलगोभी ही १० रुपये किलो आणि कोथिंबीर ५ रुपये पाव, त्यामुळे ३५ रुपये किलो असलेले मटार घेणे परवडण्यासारखे. (मुंबई वाल्यांना जळण तर नाही होत आहे) दररोज संध्याकाळी घरी (७-७/३० मध्ये)पोहचल्या वर चहा बरोबर नाष्टा हा असतोच.

अनुप्रीती

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 25/12/2013 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
विलयखुणा जन्मावरती; मन उलगडते ती अनुप्रीती चिरंजीव; खडकावरही असते प्रेमाची अनुभूती काळ युगे हतबल शरणागत कली कळा निष्प्रभ भवती हरित वाण अंकूर सदा; ऋतु वयातीत जणु वावरती ओलांडे यातना पर्व वेदना पर्वतांच्या भिंती खळे अवखळे फ़ेसाळे निर्झर निर्मळतम ध्येयगती तमा ना कुणाची वा भीती लाघव सरिता ओघवती काठ किनारे तृप्त; सुप्त समृद्ध क्षणांची ही भरती …………………………. अज्ञात
काव्यरस

धर्मांतरे का होतात ?

लेखक सचीन यांनी बुधवार, 25/12/2013 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
जगाच्या इतिहासात अनेक धर्मांतरे घडली आपल्या भारत भूमीत हि अनेक धर्मांतरे घडली ह्याचे काय कारण असावे? लोक धर्मांतर का करत असावेत? माणूस हा आपल्या धर्मावर प्रेम करतो.त्याचा आदर करतो. धर्माने दिलेल्या रिती परंपरा, पाळतो आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे नि दुसर्याचा धर्म कसा टाकावू आहे ह्याबद्दल घसा सुकेपर्यंत चर्चा करतो वाद विवाद करतो प्रसंगी गुद्दागुद्दी हि करतो तरीही धर्मांतरे का होतात?. धर्माबद्दल काही बोलले शंका घेतल्या कि माणूस रागावतो उत्तरादाखल दुसऱ्या धर्मातील चुका दाखवतो. काहीना आपला धर्म हा प्राचीन वाटतो काही जणांना तर तो माणसाने निर्माण केलाय असे वाटतच नाही.