विलयखुणा जन्मावरती; मन उलगडते ती अनुप्रीती
चिरंजीव; खडकावरही असते प्रेमाची अनुभूती
काळ युगे हतबल शरणागत कली कळा निष्प्रभ भवती
हरित वाण अंकूर सदा; ऋतु वयातीत जणु वावरती
ओलांडे यातना पर्व वेदना पर्वतांच्या भिंती
खळे अवखळे फ़ेसाळे निर्झर निर्मळतम ध्येयगती
तमा ना कुणाची वा भीती लाघव सरिता ओघवती
काठ किनारे तृप्त; सुप्त समृद्ध क्षणांची ही भरती
…………………………. अज्ञात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1737
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख!
सुरेख!
सुरेख. अप्रतिम शब्दरचना.
सुरेख. अप्रतिम शब्दरचना. एखाद्या पेंटिंग सारखे वाटले.
सुंदर.
सुंदर.
छानच.
छानच.