Skip to main content

मटका भरके सूरज उल्टा

लेखक चाणक्य यांनी बुधवार, 01/01/2014 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
नानबाच्या स्वाक्षरीत गुलजार च्या ओळी वाचलेल्या-
तुम बोल रही थीं होंठ तुम्हारे चाँद की काशें काट रहे थे ! मैं हैरां... हैरां हैरां ...
वाचल्या क्षणापासून मनात रुंजी घालत होत्या. जरा गुगलून पाहिलं तर समजलं की गुलजारच्या 'पंधरह पाँच पचहत्तर' या पुस्तकात एक नज्म आहे- 'मटका भरके सूरज उल्टा' , त्यातल्या या ओळी आहेत. अहाहा....कय सुंदर नज्म - मटका भरके सूरज उल्टा शाम ने दूर समंदर की दहलीज पे जाकर रातका पश्मीना पह्नकर तुम आईं थी !

पुन्हा सगुणोपासना

लेखक राही यांनी बुधवार, 01/01/2014 01:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथम सर्व मिपाकरांना मिपावर हे वर्ष वाद-संवादाचे आणि बौद्धिक आनंदाचे जावो ही शुभेच्छा. मिपालाही शुभेच्छा. या वर्षी सुद्धा अनेक शतकी-द्विशतकी धागे निघोत, साद-प्रतिसादांनी मिपा समृद्ध होवो. तर पुन्हा सगुणोपासना. ही सगुणोपासना आम्हांला इतकी आवश्यक का वाटते? आत्मभान हा सोपा मार्ग आम्हांला का नको? आत्मज्ञान ह्या शब्दाच्या अर्थाविषयी पारमार्थिक आणि ऐहिक अशा दोन्ही पातळ्यांवर विवेचन करता येइल. सगुणोपासनेच्या आवश्यकतेचीसुद्धा दोन कारणे सांगितली जातात.

भटकंती ४

लेखक इन्ना यांनी मंगळवार, 31/12/2013 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
भटकंती ४ द वॉल द वॉल , द्रविड ? नै हो अजून भेटला . चीनची भिंत? हो त्यावर पण एकदा लिहीन. पण आजची भिंत बर्लिनची आहे. ही पहिल्यांदा ऐकली /वाचली इतिहासाच्या पुस्तकात. दुसर्‍या महायुद्धानंतर चक्क एका मोठ्या शहराचे २ तुकडे करणारी भिंत. मग रिडर्स डायजेस्ट मधे १,२ कथा वाचल्या ग्रेट एस्केप नावाच्या. पुर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत केलेली पलायनं . तेव्हा फार उत्सुकता वाटाली होती या भिंतीबद्दल , इतकी की माझी एक पेन फ्रेंड होती जर्मनीची ,अर्थात पश्चिम जर्मनीची! पण ह्या माझ्या पत्रमैत्रीणीला ती अगदी स्विस बॉर्डर वर असल्यानी भिंतीबद्दल आस्था नव्हती ना खेद.

कॉकटेल लाउंज : बुलफ्रॉग (Bullfrog)

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 31/12/2013 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
२०१३ च्या सरत्या संध्याकाळी २०१४ ह्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कॉकटेल लाउंज मालिकेतील आजचे कॉकटेल आहे बुलफ्रॉग (Bullfrog) पार्श्वभूमी: ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी एक पोटंट आणि तितकेच दिलखेचक व आकर्षक असलेले हे बुलफ्रॉग नावावरून 'बैलाचा आव आणलेली बेडकी' असे वाटणे सहाजिक आहे; पण दिसते तसे नसते ह्या उक्तीला सार्थ करणारे हे कॉकटेल आहे, साहित्यावरून ते किती जहाल असावे ह्याची कल्पना येईल. ह्या वर्षाची आजची शेवटची रात्र एकदम मादक होऊन येणारे इंग्रजी नववर्ष आपणा सर्वांना समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो ही इश्वरचरणी प्रार्थना.
प्रकार

२०१४ चा आशावादी आढावा !!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 31/12/2013 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या वर्षात - रस्त्यावरच्या खड्ड्यांत भ्रष्टाचार पाय घसरून पडावा सच्चाईच्या डांबराने त्याला तेथेच कायमचा गाडावा भारताचा उज्ज्वल इतिहास पुन्हा पुन्हा घडावा भारताचा दुश्मन धाय मोकलून रडावा मनाच्या अंगणात आशादायी स्वप्नांचा सुमंगल सडा पडावा नववर्षाच्या शुभेच्छा !! :-)
काव्यरस

कारण जीवन हे लोणचं आहे...

लेखक भिकापाटील यांनी मंगळवार, 31/12/2013 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
कधी गोड, कधी तिखट आहे कधी खारट, कधी तुरट आहे कारण जीवन हे लोणचं आहे...||१|| ... लोणचं पूर्ण मुरल्यावर चांगला लागतं खाल्ल्यावर जीवन पूर्ण जगल्यावर टेकतो आपण मरणावर ||२|| लोणचं करण्यासाठी जसे विविध प्रकार जीवनातल्या पैलूंचे हि निरनिराळे प्रकार लोणचं जसं testy लागतं तसच जीवन हे फार कष्टी असतं कारण जीवन हे लोणचं आहे....||३|| लोणच्याला राहायला जशी बरणी लागते तसच जीवन जगायला धरणी लागते लोणचं जसं कधी ना कधी संपतं तसंच आपलं जीवनहि कधी ना कधी संपतं कारण जीवन हे लोणचं आहे....||४|| लोणचं हे खाण्यासाठी असतं पण जीवन हे जगण्यासाठी असतं लोणच्याला जसं स्वाद असतो तसं आपल्या जीवनाला एक आस्वाद असतो कारण जीवन

चोरी झाल्याचा आनंद

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 31/12/2013 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
घरी चोरी झाली तर आपल्याला दु:ख होते. चोरी का झाली? चोरी टाळता आली असती का? आपली लापरवाही अथवा लापरवाहीचे खापर घरातल्या कुणाच्या तरी डोक्यावर आपण फोडतोच. घरच्या सर्वाना चोरीपेक्षा चोरीचमुळे वाव-विवादांचा त्रास जास्त होतो. शिवाय पोलीस, शेजारी, मित्र-मंडळी इत्यादीचा ही त्रास होतोच. शेजार-पाजार्यांना फालतू चर्चे साठी एक विषय मिळतो. पण कधी-कधी असे ही होते, घरी चोरी झाल्याचा त्रास होण्याऐवजी, त्याचा आनंद होतो. असाच, चोरीचा एक किस्सा आहे. गुप्ताजी आणि शर्माजी दोघांचे घरलागून होते.

नोकरी विषयी माहिती पाहिजे

लेखक वासु यांनी मंगळवार, 31/12/2013 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
मला एका सॉफ्ट्वेअर कम्पनी मधे नोकरी पाहिजेल. मी Oracle Database(SQL)मधे नोकरी शोधत आहे. मी नोकरीच्या साईट वर माझा CV टाकला आहे, पण मला जे offer येतात ते सगळे हैदराबाद, चेन्नई नाहितर दिल्ली च्या. काय करावे काही कळत नाही राव. मग मला मिपाची आठवण झाली, मिपा वर खुप सारे मन्डळी आहेत मला नक्की मदत मिळेल हि आशा. मिपा वर जर कोणी सॉफ्ट्वेअर कम्पनी मधे असेल आणि तिथे जर जागा शिल्लक असेल तर जरुर कळवावे हि विनन्ती. आपल्या प्रतिसादान्ची वाट पाहेन. :-) धन्यवाद.

एक चारोळी ... !

लेखक psajid यांनी मंगळवार, 31/12/2013 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
शम्पेनच्या बाटल्या फोडण्यात आनंद नसतो, आपण गोड सण करून संस्कृती जपतो, 'इंग्रजी डे' चं हास्य क्षणभंगुर ठरून जातं अन 'जानेवारी' नव्हे 'पाडव्याला' आपलं नवीन वर्ष सुरु होतं ! - साजीद पठाण