मटका भरके सूरज उल्टा
लेखनविषय:
नानबाच्या स्वाक्षरीत गुलजार च्या ओळी वाचलेल्या-
तुम बोल रही थीं होंठ तुम्हारे चाँद की काशें काट रहे थे ! मैं हैरां... हैरां हैरां ...वाचल्या क्षणापासून मनात रुंजी घालत होत्या. जरा गुगलून पाहिलं तर समजलं की गुलजारच्या 'पंधरह पाँच पचहत्तर' या पुस्तकात एक नज्म आहे- 'मटका भरके सूरज उल्टा' , त्यातल्या या ओळी आहेत. अहाहा....कय सुंदर नज्म - मटका भरके सूरज उल्टा शाम ने दूर समंदर की दहलीज पे जाकर रातका पश्मीना पह्नकर तुम आईं थी ! रात तुम्हारे जिस्मसे फिसली पडती थी जिस्म तुम्हारा एक जलते सय्यारे सा दूध और धूप से गूंधी मिट्टी एक फलकभर खुशबू थी आवाज तुम्हारी ! तुम बोल रही थीं होंठ तुम्हारे चाँद की काशें काट रहे थे ! मैं हैरां... हैरां हैरां ... मटका भर के सूरज का, एक और सहर निकली पानी से ऊंगली थामके सुबह की तुम पानी पर चलते चलते एक और उफक को लौट गयी वक्त के पुरईसरार किसी 'कॉमेट' की तरह कायनात से आईं तुम और कायनात में लौट गयी ! अत्यंत ह्ळुवार भावना, ताकदीची शब्दरचना आणि त्यांना मिळालेला गुलजार स्पेश्शल टच. क्या बात! विचार करत होतो की हे रत्न मराठीत आणूयात का? आणि मग हा प्रयत्न केला. अगदी तंतोतंत / शब्दाला प्रतिशब्द असा अनुवाद नाही केला कारण तसा ब-याचदा नीरस होतो असं मला वाटतं. शिवाय प्रत्येक भाषेचा आपला एक लहेजा असतो. त्यामुळे मूळ भावनेशी प्रामाणिक राहून केलेला हा भावनुवाद - दूर.... कुठेतरी लांब ओल्या क्षितिजावर सूर्याच्या तांबड्या गोळ्याने भरलेला घडा रिकामा करत होती ती संध्याकाळ आणि त्याच वेळी मखमली रात्र अंगाभोवती लपेटून तू येत होतीस....हळुवार पावलांनी रात्रही मखमली होती..अणि तूही कशी बरं ठरावी ती तुझ्या अंगावर? .....नव्हतीच ठरत तुझं ते आरस्पानी सौंदर्य कुठल्याश्या दैवी साच्यातून घडवलेलं आणि त्याला साजेसा तुझा तो आवाज जणू एक मंद सुगंध आसमंतात भरून राहिलेला तू बोलत होतीस आणि तुझे ओठ सतारीच्या तारा छेडाव्यात तसे चांद्रकिरण छेडत होते मी थक्क होऊन नुसता पाहत होतो....कितीतरी वेळ...नुसता पाह्त होतो सूर्याच्या लाल गोळ्याने भरलेला घडा घेऊन मग अजून एक सकाळ निघाली पाण्यातून तिचंच बोट धरून तूही निघून गेलीस दुस-या एका क्षितिजाकडे काळाच्या नियमांबरहुकून प्रवास करणा-या एखाद्या धूमकेतू सारखी अज्ञातातून आली होतीस .......अज्ञातात निघून गेलीस धन्यवाद गुलजार...ईतकी छान रचना दिल्याबद्द्ल
वाचने
3799
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
चांगला प्रयत्न.
सुंदर.
काय सुंदर कविता आहे ही !!!!!
कविता ?
मूळ रचना मला समजली नसती (
In reply to मूळ रचना मला समजली नसती ( by इन्दुसुता
एकदम सहमत
अतिशय सुंदर भावानुवाद!!!
क्या बात
मूळ कविता आवडली अनुवाद वाचून
चांगला प्रयत्न.
तरल रचना. भन्नाट आहे.
In reply to तरल रचना. भन्नाट आहे. by प्यारे१
अगदी अगदी
.
वाह व्वा! क्या बात है!!