Skip to main content

नाईट-ओव्हर!!!

लेखक वडापाव यांनी शनिवार, 11/01/2014 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
सुट्टीच्या दिवसात आई-वडील गावाला निघाले की पोरं जाम खुश होतात... लगेच ग्रुपमधल्या सगळ्या मेंबरांना फोनाफोनी होते. प्रत्येकाने किती किती पैसे काढायचे याचा एक अंदाज ठरतो. कोणकोणत्या मुलींना बोलवायचं(किंवा होस्ट मुलगीच असेल तर सोन्याहूनही पिवळं), कोणाला कटवायचं वगैरे बोलणी होते. प्रत्येकाचे आपआपल्या पसंतीनुसार आणि ऐपतीनुसार 'ब्रँड्स' ठरलेले असतात. कोणी नुकतीच भीष्म प्रतिज्ञा करून 'दारू सिगरेटला हात लावणार नाही' असा चारजणांचे ग्लास समोर भरलेले दिसल्यावर आपोआप ढळणारा अढळ निश्चय केलेला असतो.

लिझ्झी.... जगातील सर्वात सुंदर व्यक्ती

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 11/01/2014 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
कोणीतरी सहज म्हणून यू ट्यूब वरची काही एक लिंक शेअर करते. केवळ ती शेअर करणारावर विश्वास असतो म्हणून मी ती लिंक उघडली. आणि आश्चर्याचा धक्का बसवा असा अनुभव येतो. लिझ्झी - एक आगळी वेगळीच व्यक्ती. स्वतःला पूर्णपणे जाणून असलेली. स्वतःच्या कमतरतेवर मात करत ती बरेच काही सांगते. हा अर्थातवाचण्याचा नव्हे तर अनुभवन्याचा भाग आहे. जीला जगातली सर्वात कुरूप व्यक्ती आहेस डोक्यात गोळी मारून आत्महत्या कर असे सल्ले मिळत होते. ती स्वतःची कहाणी सांगते ते देखील कोणतीच सहानुभूती मिळवायला नव्हे तर तुम्हाला जगायचे बळ द्यायला.

देवाचा हात दिसला !

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 10/01/2014 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
२३ जुलै १९९९ साली नासाने अवकाशात पाठवलेली भारतिय वंशाच्या सुब्रम्हण्यम चंद्रशेखर या शात्रज्ञाचे नाव दिलेली "चंद्र एक्स रे वेधशाळा" तिच्यापूर्वीच्या वेधशाळांपेक्षा १०० पट जास्त अंधूक असणार्‍या तारकापूंजांची छायाचित्रे घेऊ शकते. या वेधशाळेने सर्वप्रथम शोध लावलेल्या "देवाच्या हाता"ची (hand of God) अधिकाधिक स्पष्ट छायाचित्रे आता मिळू लागली आहेत.

घन टमी..

लेखक तिमा यांनी शुक्रवार, 10/01/2014 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
पोटावर पँटी घट्ट व्हायला लागल्यावर नैराश्याने हे विडंबन सुचले.संदर्भासाठी,खाली,भा.रा.तांबे यांची मूळ कविता देत आहे. घन टमी,पँट बघ घट्ट करी रे खिन्न मना,मेदवृद्धी ही खरी ये बाहेरी व्यायाम करुनी शुद्ध मोकळ्या हवेत का बसशी,कोचातच रुतुनी रे! मार बैठका जोर तरी जड झाले, अति गोड खादले स्नायु नुरे,बेढब तनु डुले मेद जमे,बघ पोटही सुटले का मरणाशी खेळ चाले मना,वृथा का भीशी जगण्या दार सुखाचे ते निसर्ग भ्रमणा वसुंधरा पाहे वाट मना पसरोनी शेला हिरवा परी मूळ कविता:- घन तमीं शुक्र बघ राज्य करी रे खिन्‍न मना,बघ जरा तरी !
काव्यरस

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-६

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 10/01/2014 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भागः- http://misalpav.com/node/26585 ...पुढे चालू अता यादीच्या मागील सूचना:-सर्व सूचना, हे नियमच असतात. पण नियम हे कधिच पाळण्यासाठी नसतात म्हणून त्यांना सूचना म्हणायच. आणी नियमाच्या त्या यमाला असं नियमीत करायचं! अता ही सूचनांची माहिती नसून प्रत्यक्ष म्हणजे ऑन-फिल्ड त्यांची अंमलबजावणी कशी होते त्याचा हा वृत्तांत.... ============================================== क्रमांक-१) अंघोळ:- धार्मिक कार्यांची सुरवात या घोळापासून होते.म्हणूनच याला अं..घोळ असं म्हटलेलं आहे.

गविकाकाचा सल्ला.

लेखक मन यांनी शुक्रवार, 10/01/2014 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
पेप्रात बरीच सदरं येतात. त्यातली काही "विचारा तुमच्या शंका" किंवा "इथे मिळतील सल्ले" स्टाइल असतात. त्यातील काही टिपिकल प्रश्न गविकाकांना विचारावेत म्हटलं. त्यांचाही झटकन प्रतिसाद आला. तुम्हालाही काही प्रश्न व शंका असल्यास गविकाकांना सल्ला विचारु शकाल. एक टेम्प्लेट केस येथे देत आहे. प्रश्न: काका, मी इयत्ता दहावीत आहे. आमच्या शेजारी एक ताई राहते. तिच्याविषयी माझ्या भावना वेगळ्या आहेत. मला ती खूप आवडते. ती जाता येता माझ्याशी बोलते. नुकतीच ऑफिसला जाताना एकदा ती मला "बाsय" असं म्हणाली. यामुळे तिच्याही मनात फीलिंग्ज आहेत हे मला समजलं. तेव्हापासून माझं तिच्याकडेच लक्ष लागलेलं असतं.

अपेक्षा

लेखक मि मिपाचा मित्रच यांनी शुक्रवार, 10/01/2014 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार माझा मिपा वर हा प्रथमच लिहिण्याचा प्रयत्न .. काय लिहावे असा विचार करत असताना वृद्धाश्रम वरील शतशब्द कथा वाचली आणि खालील कविता - संग्रही असलेली - आठवली ,कविता खूप जुनी आहे, मी लिहिलेली नाहीय - पण भावना पोहचवण्या साठी अश्या गोष्टींची गरज नसते.. स्वतःचे लिखाण नसेल तर ते मीपा वर टंकता येते कि नाही हे माहित नाही, हि कविता या आधी मिपा वर पूर्व-प्रकाशित झाली आहे कि नाही ते पण माहित नाही. जर अशी परवानगी नसेल किंवा पूर्व प्रकाशित असेल तर आधीच क्षमस्व. !! अपेक्षा !!

गुगल आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार

लेखक आयुर्हित यांनी शुक्रवार, 10/01/2014 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात एक छान जाहिरात बघण्यात आली.बघताच त्याच क्षणी आपल्या सन्माननीय तात्यारावांची (स्वातंत्र्यवीर सावरकरांची) प्रकर्षाने आठवण झाली. जाहिरात परत परत बघाविसी वाटली. व्वा! काय उत्तम संदर्भ, हृदयस्पर्शी कथा, संगीत, संकलन व सादरीकरण!!! "एक दौर था ,मन मन मोर था" वरून ही मराठीमाणसाने(संदर्भ: बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला) बनवलेली आहे ह्या विचारावर ठाम झालो. आता लवकरच "अटकेपार" च्या ऐवजी "गुगलवर" हा शब्द प्रयोग येईल असे वाटते.

शतशब्द कथा (वृद्धाश्रम)

लेखक योगी९०० यांनी शुक्रवार, 10/01/2014 08:34 या दिवशी प्रकाशित केले.
अतिवास आणि खेडूत यांच्या लिखाणामुळे प्रेरीत होऊन एक शतशब्द कथा लिहायचा प्रयत्न करतोय...कोठेतरी वाचलेल्या एका संवादाचे हे एक छोटे रुपांतर आहे... चु.भू.द्या.घ्या. --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- "बाबा लवकर उशीर होतोय मला..." सातव्यांदा गुणेश खेकसला..”च्यायला रिक्षा/टॅक्सीचा आजच संप असावा आणि आजच बॉसने लवकर ऑफिसला बोलवावे.?” अरे बाबा, तुला उशीर होतोय तर मी एकटाच जातो. आता जवळच आहे.. नको नको, जड बॅग घेऊन या उन्हात तुम्हाला चालवेल? जमेल रे, हळू हळू जातो….

माया

लेखक नानीचा नाना यांनी गुरुवार, 09/01/2014 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
माया एक दिवस गेलारीत उभा राहून बाहेर होतो . तेवढ्यात एक फाटके कपडे घातलेला मनुष्य एका लहान मुलाला घेऊन पुढील रस्त्यावर बसला . त्यानंतर त्याने त्याच्या पोतडीतून एक तेलाची बाटली काढली व तो मुलाच्या हाता / पायांना लावू लगला .ते पाहून मला वाटले कि तो मनुष्य त्या लहानग्याची किती काळजी घेतो आहे क़दाचित त्या मुलाने व्यवस्थित मोठे होऊन आपल्या म्हातारपणी आपली काळजी घ्यावी असा रेखिला त्याचा हेतू असेल . तो मनुष्य बर्याच आपुलकीने त्याला तेल लावत होता व तो मुलगा देखील शहाण्यासारखा तेल लावून घेत होता .