Skip to main content

सण म्हटलं की निसर्गाला त्रास द्यायलाच हवा का?

लेखक वडापाव यांनी मंगळवार, 14/01/2014 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
याविषयावर खूप आधीपासून लिहायची इच्छा होती, पण आज मकर संक्रांतीचं निमित्त मिळालं. आपण वर्षभरात एवढे छोटे-मोठे सण साजरे करतो, पण त्यातल्या देशाभरात मोठ्या प्रमाणावर साज-या होणा-या जवळ जवळ प्रत्येक सणामध्ये आपण कोणत्या न कोणत्या स्वरूपात निसर्गाचं नुकसान करत असतो. लेखनामागचा आशय शीर्षकावरून स्पष्ट होत नसेल तर - 'आक्षेप सण साजरे करण्याला नसून साजरे करण्याच्या पद्धतीला आहे.' असा आहे. सुरुवात मकर संक्रातीपासून करूया. हल्ली चायनीज नायलॉनचा मांजा मिळतो जो धारदार आणि सहजासहजी न तुटणारा असतो. आकाशात खेळल्या जाणा-या चढाओढीमध्ये आपला पतंग काटला जाऊ नये म्हणून हल्ली बरेच जण हा नायलॉनचा मांजा वापरतात.

माझे पंतप्रधान[पदाच्या मुख्य इछुकां(भाग: ३/३)]वरील आक्षेप

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 14/01/2014 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीच्या दोन भागांत आपण मावळते पंतप्रधान श्री मनमोहन सिंग (भाग १), भाजपा/एन्डीएचे पंतप्रधानपदाचे अधिकृत उमेदवार श्री नरेंद्र मोदी व काँग्रेस उपाध्यक्ष व त्या पक्षाचे संभाव्य उमेदवार श्री राहुल गांधी (भाग २) यांच्यावरील माझ्या आक्षेपांचे विवेचन वाचले. या शेवटच्या भागात पंतप्रधानपदाच्या उर्वरित इच्छुक व काही प्रमाणात संभाव्यता असणार्‍या पक्षनेत्यांवरील माझे आक्षेप विशद करणार आहे.

प्रिय विद्या बालन हिस

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 14/01/2014 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय विद्या बालन हिस, काल तुझी खूप खूप आठवण झाली आणि तुला खूप मिस केले. तुला ‘देड’ या शब्दाचा नेमका अर्थ ठाऊक होता का गं? बंबैय्या भाषेत ‘देड’ ह्या शब्दाच्या अर्थाला एक वेगळीच छटा आहे, ती ही तुला माहिती होती का गं? असावीच, नक्की माहिती असावी कारण तसे नसते तर तू ‘देड इश्किया’ मध्येही दिसली असतीस. पडद्यामागच्या खबरी काही मला माहिती नाहीत; त्यामुळे तू देड इश्किया नाकारलास की तुला देड इश्कियासाठी नाकारले गेले ते काही नेमके माहिती नाही, पण ‘जो होता है वो अच्छे के लिये होता है’ असे म्हणतात ते एकदम सत्यात उतरले आहे.

भिगवण....

लेखक किल्लेदार यांनी मंगळवार, 14/01/2014 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
भिगवण ला पक्षी येऊ घातले आहेत....तरी हौशी पर्यटकांनी जाऊन यावे . Spoon copy Moorhen1 copy

किती बार बोला मत पी, मत पी.. ऐकताइच नई ये...

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 14/01/2014 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
किती बार बोला - मत पी, मत पी.. ऐकताइच नई है... "खाना खाना के बाद आधा घंटा रुकने को बोला बुढ्ढा लोगने... बादमें पानी पीने का... ये सुनताईच नहीं।" "पेट में बैठा लोग को तकलीप होता भाय... हररोज नया हाटेल में मेनू कार्ड पकडकर साला उलटा सीधा खाता है... हज़म कैसा करायेंगे हम लोक... दो घास के बाद पानी पीता, कोक मूं लगाता, फिर पिझा के टुकडे मूं में ढकलताए... ठीकसे चबाता भी नही...फिर पीता ए... अपनके साथ अब नही जमता... जूस बनाना फिर मिक्स मार के डायजष्ट कराना पडता .. डॉक्टर के पास भी भेजा, हार्टभाई को भी मंजूर नही पडेला है...

आनंद मरते नहीं . . .

लेखक मन यांनी मंगळवार, 14/01/2014 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
"मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने ..." हे गाणं आवडतं? "जिंदगी कैसी है पहेली हाये...कभी ये हसाये .... कभी ये रुलाये...." हे गाणं ऐकलत? "कहीं दूर जब दिन ढल जाये...." ह्यातलं भावपूर्ण वातावरण भिडतं मनाला? मग तुम्हाला "आनंद " माहिती नसणं कठीण आहे. मुळात तुमच्यापैकी कुणी आनंद पाहिलेला नसणं हेच मुळी अवघड आहे. माझ्यासारखा एक ना एक आनंद प्रेमी तुमच्या परिचयाचा असेलच. त्यानं आग्रहानं आनंद दाखवला असेलच. . . राजेश खन्नाचा "आनंद" माझा अत्यंत आवडता. खरं तर त्यात राजेश खन्ना नाहिच. त्यात "आनंद"च आहे.

विचीत्र आणि दु:खद वर्तन

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 14/01/2014 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
ठाण्यात प्लेग्रूप (बालगट) शाळेच्या बसची एका कुत्र्यास धडक बसली म्हणे. त्या नंतर कुत्र्यास धडक बसल्याने संतप्त झालेल्या युवकांनी म्हणे शाळेच्या बसची मोडतोड केली म्हणे. प्रत्येक वृत्तपत्रा गणिक वृत्तात जरासा फरक आहे.एका वृत्तात बस रिकामी नुसती थांबलेली असताना मोडतोड झाल्याचे म्ह्टले आहे तर एका वृत्तात मुलांना खाली उतरवून बसची मोडतोड केल्याचे म्हटले आहे. दुर्दैवाने कुत्र्याचे मालक अबकड राजकीय पक्षाचे आहेत आणि स्कुलच्या मुख्याध्यापिका हळक्षज्ञ विरोधी राजकीय पक्षाच्या आहेत असे काही वृत्तात म्हटले आहे. झाल्या गोष्टीचा राजकीय संबंध असावयास नको.

चारोळी: तीळ अन् गुळाची नाती !!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 14/01/2014 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
विचारांची जुळणी गुळाची असावी.. शब्दांत पेरणी साखरेची असावी.. विचार अन् वाणी यांची मैत्री अतूट राहावी.. तीळ अन् गुळाची नाती प्रेरणा देत राहावी.. संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा....॥
काव्यरस

लहसूनी दाल / लसणीचं वरण

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 13/01/2014 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः छोटी १/२ वाटी तूरीची डाळ छोटी १/२ वाटी मुगाची डाळ ५-६ लसूण पाकळया (जरा जास्तं घेतले तरी चालेल, इथे पाकळ्या मोठ्या असतात) १/२ टीस्पून मोहरी १/२ टीस्पून जीरे २-३ लाल सुक्या बोर मिरच्या (साध्या मिरच्या वापरल्या तरी चालतील) ३-४ कढीपत्ता पाव टीस्पून हिंग १/२ टीस्पून हळद १/२ टीस्पून लाल तिखट मीठ चवीनुसार बारीक चिरलेली कोथींबीर . पाकृ: तूरीची

विवेकसिंधु, मुकुंदराज, आणि राजा जैतपाळाचे तळे

लेखक माहितगार यांनी सोमवार, 13/01/2014 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
विवेकसिंधु हा कवी मुकुंदराज यांनी लिहिलेला ग्रंथ मराठी भाषेतील आद्य काव्यग्रंथ समजला जातो.विवेकसिंधु ग्रंथाबद्दलच्या मराठी विकिपीडियाव्रील लेख अद्ययावत करताना विवेकसिंधूचे लेखन अंबेजोगाई, आंभोरा, फलटण,पैकी नेमके कुठे झाले हि चर्चा सध्या पुढे आली आहे.