Skip to main content

ड्रिमगर्ल !

लेखक तुमचा अभिषेक यांनी मंगळवार, 21/01/2014 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
गेले तीन दिवस ती ऑफिसला आली नाही. अन आज चौथ्या दिवशी जाणवू लागले की काहीतरी चुकतेयं. पाणवठ्यावर बाटली भरायला जाताना वाटेतले एक प्रेक्षणीय स्थळ नाहिसे झालेय. त्यामुळे बाटली पाण्याने पुर्ण भरली तरी तहान भागेनाशी झालीय. आज मला समजले की तिला तिथे बसलेले बघण्याची मला सवयच लागली होती. वाढलेली तहान आणि बाटलीचा छोटा होत जाणारा आकार याला तीच जबाबदार होती. जरी तिने ती घेतली नाही तरी तीच होती. तिने मात्र कधीही मान वर करून समोरून कोण जातेय ते पाहिले नसावे. मग आमच्याकडे बघण्याचा योग तरी कुठून यावा. कदाचित येणारा जाणारा प्रत्येक जण आपल्याकडेच नजर टाकत जातो याची तिला जाणीव असावी.

समुद्र......!!

लेखक फिझा यांनी मंगळवार, 21/01/2014 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
समुद्र......!! किनाऱ्यावर भेटतात सगळे जरी … तुझा एकटेपणा कुणा दिसला का कधी आकाशाचा रंग लेऊन घेतोस तुझा रंग कधी पहिला का कुणी हसतोस फक्त लाटांमध्ये ..... तू रडतोस खोल आत कुठेतरी ………. ! रोज तसाच दिसतोस तू ,… अथांग… प्रत्येक एकट्याला अरे , तुझाच संग …. तुझ्या लाटांबरोबर ओठावरचे हसू … तुझ्या क्षितीजाबरोबर डोळ्यातले आसू …. पायाखालून निसटलेल्या रेतीचा आधार शेवटी … हसतोस फक्त लाटांमध्ये …तू , रडतोस खोल आत कुठेतरी ………. रोज नव्याने जगतोस तू ,… एकटा सूर्याचा दाह झेलतो तू असा ....

फाडा नो खिचडो............. ( गव्हाच्या तुकड्यांची खिचडी)- गुजराथी पदार्थ

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 21/01/2014 02:59 या दिवशी प्रकाशित केले.
डाळ तांदळाची खिचडी हा एक सोपा प्रकार सर्वानाच माहीत असतो इथे त्याचेच जरा वेगळे रूप तांदळा ऐवजी तुकडा गहु वापरतात. अर्थात त्यामुळे चवीत बराच फरक पडतो. डाळ , गहू भाज्या असा एक परीपूर्ण आहार मिळतो साहित्य : फाडा ( तुकडा गहु) ( एक वाटी), मुग डाळ ( अर्धी वाटी) , कांदे ( तीन मध्यम आकाराचे) , वटाटे ( एक मध्यम आकाराचा) , मोड आलेली कडधान्ये ( अर्धी वाटी) , आले ( अर्धा इंच) फोडणी साठी. मिरच्या , राई , जिरे , मेथी दाणे , हिंग , हळद मीठ तेल( फोडणी पुरते) गरम मसाला. पाणी पाच कप फाडा हा किमान सहा सात तास भिजवून ठेवावा लागतो. तरच तो नीट शिजतो.

उत्तरायण २०१४ - पुणे ते बडोदा (भाग १)

लेखक मोदक यांनी सोमवार, 20/01/2014 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
...तर गुजरातमध्ये उत्तरायण (संक्रांत) हा सण प्रचंड उत्साहात साजरा केला जातो. ( याबाबत आता अधिक माहिती देण्याची आवश्यकता नसल्याने सरळ मुद्द्यावर येतो. ;) ) २००८ साली संक्रांत हा सण बडोद्यात कसा साजरा करतात हे प्रत्यक्ष पाहिले होते आणि पुन्हा येथे येवून हे सर्व अनुभवायचे आहे हेही त्याच वेळी ठरवले होते. नंतर दरवर्षी काही ना काही कारणाने गुजरात भेट शक्य होत नव्हती. मात्र ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान पुन्हा मित्रमंडळीत हा विषय निघाला व इतके दिवस सुट्टी मिळेल का हे सर्वजण चेकवू लागले. डिसेंबर मध्ये घेतलेल्या सुट्ट्या.. नवीन वर्षाची सुरूवात..

कॉफीचं कॅथार्सिस अर्थात चिडचिड-ए-सोमवार

लेखक आदूबाळ यांनी सोमवार, 20/01/2014 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
अरबट कॉफी चरबट कॉफी | कागदाच्या कपात करपट कॉफी || डोक्याची ग्रेव्ही, इनबॉक्सचं मटण | कॅफेनची किक, बुळबुळीत बटण | पहिला ढकलतोय, चारच बाकी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||१|| परीट घडी, टायचा बावटा | आकड्यांची उसळ, एक्सेल पावटा | बॉस निकम्मा, टीम पापी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||२|| पायांची घडी, मांडीवर पोट | अप्रेझल मीटिंग, बोका भोट | परफॉर्मन्स मदिरा, रेटिंग साकी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||३|| गारगिट्ट पोळ्या, बकाबकाबका | सिग्रेटचा धूर, फकाफकाफका | पगार, पीएफ, बोनस टॉफी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||४||

२६ फेब्रुवारी वीर सावरकर ह्यांची पुण्य तिथी निमित्य .

लेखक kalpana joshi यांनी सोमवार, 20/01/2014 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचं भारतीय व्यक्तिमत्त्व - स्वातंत्र्यवीर सावरकर “धगधगत्या ज्वाला पेटवून ह्र्दयात, स्वातंत्र्य चे स्वप्न पाहिले क्रांतिविरांनी त्यात , कितीएक प्राणाच्या आहुत्या पडल्या , त्या स्वातंत्र्याच्या महासंग्रात ” ब्रिटीशांच्या तावडीतून आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणपणाने लढा दिला, त्या क्रांतिवीरची नावे किती घेणार ? मंगल पांडे, गांधीजींना सत्य, अहिंसा, प्रेम मार्गें स्वातंत्र हवे होते . ते देशाचे बापूजी होते. बाल गंगाधर टिळक, हे जहाल मतवादी होते.

कान्हा नॅशनल पार्क - काय पहावे (भाग ३)

लेखक पिलीयन रायडर यांनी सोमवार, 20/01/2014 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
कान्हा नॅशनल पार्क - कसे जावे (भाग १) कान्हा नॅशनल पार्क - कुठे रहावे (भाग २) कान्हाला गेल्यावर सगळ्या वातावरणामध्ये एकच एक प्रश्न असतो.. "वाघ दिसणार का?" कान्हा मध्ये एकुण ९०-१२० वाघ असावेत. ते संपुर्ण जंगलात कुठेही असु शकतात. पर्यटकांसाठी मु़ळातच ५-१०% च जंगल खुले आहे. त्यामुळे तुम्ही ४-५ तास ज्या भागात फिरणार, तिथे बरोब्बर त्याच वेळेला एखादा वाघ असण्याची शक्यता फार कमी.

निरलस

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 20/01/2014 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
सुकते झडते पुन्हा उगवते भावुक ओले नाते अवनीलाही कळते ना कोशात कसे तण अंकुरते स्पर्श खुणेचा थेंब एक , गंधाळ : कुपीतुन उलगडते रोम रोम रंध्रातुन अलगद अंतरातले दरवळते कुठेच ना शब्दांचे जोखड मुक्यानेच सारे घडते झुळुक वाहते अशीच निरलस अंग अंगणी शहारते ………………. अज्ञात
काव्यरस

(हैदराबादि) मिर्चि का सालन और बगारा राईस

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 20/01/2014 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
१. उप्स मिssssssर्रच्या (घाबरु नका ह्या नुसत्या लांबीला मोठया असतात; तिखट अजीबात नाहि) Mirchya २. बगारा राईस Rice ३.