Skip to main content

दोभोळकर कुटुंबीयांनी समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांच्यासारखा सरकारी पुरस्कार नाकारावा का ?

लेखक psajid यांनी बुधवार, 29/01/2014 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच डॉ. नरेंद्र दाभोळकरांना सरकारने 'पद्मश्री' हा मानाचा पुरस्कार मरणोत्तर जाहीर केला. या निमित्त माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले ते तुमच्याशी व्यक्त करावे म्हणतो १) डॉक्टरांच्या खुनाला आज जवळ जवळ पाच महिने होत आलेत तरीही पोलिस नेमक्या खुन्यापर्यंत पोहोचली नाहीत आणि म्हणून सरकारने हे अपयश झाकण्यासाठी, आणि जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवून आम्ही (सरकार) सुधारणावाद्यांच्या बरोबरच आहे हे दाखवण्यासाठी महाराष्ट्रातून त्यांच्या नावाची पद्म पुरस्कारासाठी शिफारस केली का ? २) कोणत्याही समाज सुधारकाचे कार्य हे त्याच्या मृत्युनंतरच लोकांसमोर यावे का ?

लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग २

लेखक क्लिंटन यांनी बुधवार, 29/01/2014 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे लेखनः लोकसभा निवडणुक प्रश्नमंजुषा-भाग १ प्रश्न क्रमांक ५ अलाहाबाद (उत्तर प्रदेश), बिकानेर (राजस्थान), चेन्नई दक्षिण (तामिळनाडू), मुंबई उत्तर (महाराष्ट्र), गुरदासपूर (पंजाब), नवी दिल्ली (दिल्ली), पाटणा साहिब (बिहार), आग्रा, फिरोझाबाद आणि रामपूर (उत्तर प्रदेश) लोकसभा मतदारसंघांना जोडणारा समान दुवा कोणता? अ. या सर्व लोकसभा मतदारसंघांमधून लोकसभेचे आजी/माजी अध्यक्ष कधीतरी निवडून गेले आहेत. ब. या सर्व लोकसभा मतदारसंघांमधून भारताचे आजी/माजी गृहमंत्री कधीतरी निवडून गेले आहेत. क.

जीर्णनगरी मुशाफिरी : जीवधन, नानाचा अंगठा, नाणेघाट

लेखक सुज्ञ माणुस यांनी बुधवार, 29/01/2014 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
जीर्णनगरी मुशाफिरी : जीवधन, नानाचा अंगठा, नाणेघाट जीवधन आणि नाणेघाट यांचा इतिहास आणि माहिती सर्वश्रुत आहेच. यावर बरेच धागे आधीच उपस्थित असल्याने अजून एकाची भर न टाकता फक्त माझा अनुभव मांडतो. कोणाला इंटरेस्ट असेल तर इतिहास, जायचे कसे वैगरे आणि आधीचे लेख या ब्लॉग लिंक वर वाचू शकता. कुकडेश्वर मंदिरापासून ST पकडून रात्री घाटघरला उतरलो आणि काळोखात चालत निघालो. हळूहळू ST च्या यंत्रांचा आवाज आणी प्रकाश अंधारात विरळ -विरळ होत गेला.रात्री अंधारात बस मधून उतरलेले गावकरी आणि सगळ्यात पुढे सरपंच पोपटराव.

तेरी मेरी कहानी........ दो नैनो की (२)

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 29/01/2014 03:02 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा तेरी मेरी कहानी........ दो नैनो की http://misalpav.com/node/25088 ए सांग ना काय म्हणत होतीस. शी बाई .... मी विसरले विसरलीस........ कसे शक्य आहे. मी काय काही विसरु नये का कधी. हो ना मला आठवतंय.. कितीदातरी भाजीत मीठ विसरायचीस. एकदा चहात साखर टाकल्याचे विसरलीस म्हणून पुन्हा एकदा आणखीन साखर टाकलीस. असे तीन वेळा विसरलीस. एका कपात आठ चमचे साखर घातलेला चहा प्यायलोय मी. हो ते लक्षात आहे........ माझ्या पेक्षा तुझी स्मरण शक्ती चांगली आहे. हो ना तु काहीतरी साम्गणार होतीस ते लक्षात आहे माझ्या. हम्म्म. हम्म्म काय.

डोंबिवली कट्टा.... हेमांगी के... ह्यांच्या समवेत...

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 28/01/2014 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वरील एक आदरणीय व्यक्तीमत्व (हेमांगी के) सध्या भारतात आल्या असून, एक,दोन फेब्रूवारीच्या सुमारास त्या डोंबिवलीला आहेत. नक्की वेळ,तारीख आणि ठिकाण (अर्थात डोंबिवली मधीलच) त्यांना विचारून ३१ ता.च्या सुमारास ठरेल. पुरुष मंडळींपैकी ज्यांना यायचे असेल, त्यांनी मला व्य.नि. करावा, ही विनंती. भगिनींनी, अजया ताईंना व्य.नि. करावा. पुढील रंगतदार कट्यांची घोषणा लवकरच.

पांढर धुकं काळ धुकं

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 28/01/2014 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज नेहमीप्रमाणे सकाळी ७.३० वाजताची ७४० घेतली. रस्त्यावर धुकं पसरलेलं होत. दिल्ली केंटचा भागात वस्ती विरळ असते, त्या मुळे रस्त्यावर धुकं ही जास्ती दाट होत. धुक्याचा रंग जवळपास काळाच होता त्या मुळे २०-२५ मीटर पुढचे दिसत नव्हते. एक प्रकारची उदासी वातावरणात पसरलेली होती. एसी बसच्या खिडकीतून धुकं बघता-बघता बालपणाचे दृश्य डोळ्यांसमोर तरंगले. धुकं तेंव्हा ही पडायचं पण रंग मात्र पांढरा शुभ्र असायचा. धुक्याच्या परद्याला भेदून सूर्याची सोनेरी किरणे अंगावर पडायची तेंव्हा मन प्रसन्न व्हायचं. कधी-कधी धुक्यात सप्तरंगी इन्द्रधनु ही दिसायचे. पण आज सूर्याची सोनेरी किरणे ही काळपट वाटत होती.
काव्यरस

कन्व्हेन्शनल पॉलिटिक्स म्हण्जे काय रे भाउ ?

लेखक चौकटराजा यांनी मंगळवार, 28/01/2014 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या राजकारणात १९६९ हे वर्ष फार महत्वाचे आहे. सर्वसाधारण पणे अनेक नेत्यांच्या मताना मान असे राजकारण त्यापूर्वी सत्ताधारी व विरोधी पक्षात चालत असे. आजही काही प्रमाणात असे राजकारण फक्त भाजप या पक्षात चालते असे म्हणण्यास हरकत नाही. पण बाकी राहुल गांधी, मुलायम सिंग, जयललिता, लालूप्रसाद, मायावती, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, ई ई त्या त्या पक्षातील हुकुमशहाच आहेत. तशा प्रकारची कबुली त्यांचे प्रवक्ते देतच असतात. ( काही कारणाने आपण शरद पवार याना हुकुमशहा या यादीत नको टाकायला ! ) इंदिरा गांधी च्या उदयानंतर काँग्रेस पक्षात " वरून खाली" राजकारणाची सुरूवात झाल्याचे दिसते.

रानपाखरं.......!

लेखक psajid यांनी मंगळवार, 28/01/2014 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
बांधलं मचाण वर गाण्यात गळा, मधुरता मंधी दुमला शेतमळा !! येऊन चोर जोंधळ्यात दडं, शिवार टिपीत चाललीत पुढं !! भिरभिरली गोफण सुटला दगड, चोर जोंधळ्यात त्येनं केलं उघड !! का म्हून सतावता सुखानं जगू द्यावं, किती सोसलं पिकासाठी तुम्हा ते नाय ठावं !! घरी तान्हं ठिवून आलिया राखणीला, सोनं ठिवलं तरच वरीसभर पीठ भाकरीला !! - साजीद यासीन पठाण दह्यारी (पलूस, सांगली, महाराष्ट्र)
काव्यरस

उत्तरायण २०१४ - काsssssssssssssयपो छेssss (भाग ३)

लेखक मोदक यांनी मंगळवार, 28/01/2014 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तरायण २०१४ - पुणे ते बडोदा (भाग १) उत्तरायण २०१४ - पुणे ते बडोदा (भाग २) रात्री ११ नंतर पतंग बाजार कसा असेल (आणि असेल का?) अशा शंका होत्याच, मात्र एकदम... . वेगवेगळ्या आकाराचे, रंगाचे, प्रकारचे (कागदाचे, प्लॅस्टीकचे पतंग) आणि त्यातही पुन्हा वैविध्य होतेच!!

<<<< उपकृमी वाढे खात्यात >>>

लेखक सुहास.. यांनी मंगळवार, 28/01/2014 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
कृमी हा शब्द जाणुन बजुन लिहिला आहे .. कच्चा माल : ओळखा पाहु ;) उपकृमी वाढे खात्यात जिलेब्या काथ्या कुटात कधी नवे, कधी जुने विकार जंत ताटात , उपकृमी वाढे खात्यात ।। १ ।। वाश्या : मी तुला सांगतो , इतकी वैचारिक कळवळ मी आयुष्यात बघीतलेली नाही. सई : आणि तु ? मघाशी धागा आला तेव्हा तुझा चेहरा का पडला ? वाश्या : माझा चेहरा कशाला पडेल ? माझा चेहरा पडायला मी शतकी धागे लेखकु आहे का ?