Skip to main content

मिपा दंगा....धागा क्र. १.....डोंबिवली हे मध्यवर्ती ठिकाण होवू शकते का?

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 15/02/2014 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा फक्त दंगा करायलाच आहे.हा निव्वळ टाइमपास धागा असल्याने वैयक्तिक शेरेबाजी टाळावी. ह्यात कुठलाही स्वार्थ नाही...असलाच तर परमार्थच आहे.जेणेकरून तमाम मिपाकरांना एक २०० ते २५० मी. लांबी असलेल्या फडके रोडचे दर्शन घेता यावे. ह्या निमीत्ताने मला, महारष्ट्राचा तमाम भौगोलिक.ऐतिहासिक आणि सांस्क्रुतिक इतिहास पण समजेल. तुम्हाला डोंबिवली नको असेल तर. मध्यवर्ती ठिकाण म्ह्णून वडगांव बुद्रुक किंवा तळेगांव खूर्द वाटले तरी लिहा. नेहमीच्या पुणे,मुंबई आणि ठाणे करांना खास आमंत्रण.

कै. भाऊसाहेब पाटणकर

लेखक शरद यांनी शनिवार, 15/02/2014 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. भाऊसाहेब पाटणकर यांच्यावरील लेख वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वी भाउसाहेबांचा पहिला शेर-ओ-शायरीच्या वाचनाचा कार्यक्रम पुण्यात साहित्य परिषदेच्या सभागृहात झाला. प्रा. क्षीरसागर अध्यक्षस्थानी होते. आम्ही २५-३० ऐकावयास. काय बहार आली. सर्वजण मंत्रमुग्ध. पण वाहवा म्हणावयास आम्ही पोरेच. थोडे ज्येष्ठ खुश होते पण दाद देण्यास थोडे मागेच. लगेच दुसर्‍या दिवशी शोधून "मराठी शायरी" मिळवळी. बहुतेक दुकानदारांना पुस्तकाचे नावच माहीत नव्हते.. वाचून झाल्यावर लगेच परत जाऊन १२ रु. खर्च केले व ४ प्रती विकत घेऊन मित्रांना वाटल्या. नच तरी माझी प्रत नाहिशी होणार होतीच.

मिस्टर प्रामाणिक

लेखक तिमा यांनी शनिवार, 15/02/2014 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी अत्यंत प्रामाणिक आहे बरं! आपल्या देशातलाच काय, या जगातला सर्वात प्रामाणिक माणूस आहे मी! त्यामुळेच तर या भ्रष्टाचारी राक्षसांकडून सामान्य जनतेची सुटका करण्यासाठी मी पक्ष स्थापन केला. माझा पक्ष मोठ्या संख्येने निवडून आल्याबरोबर लगेच सत्तेचे दलाल सावध झाले. सगळ्यांनी माझ्याविरुद्ध कट केला. मला माहितच होते ते. ते आतून कसे एक आहेत, हेच तर मला जनतेला दाखवून द्यायचे होते. माझे सरकार स्थापन झाल्याबरोबर मला आणि माझ्या माणसांना किती काम करु आणि किती नको असे झाले. रोजच्या रोज आम्ही कामांचा फडशा पाडायला सुरवात केली. सरकारी नियम हे आपणच केलेले असतात नं? मग ते वाकवले, मोडले तर एवढी बोंबाबोंब का करायची ?

टेंडर

लेखक चाणक्य यांनी शनिवार, 15/02/2014 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
टेंडर काढा....साहेब म्हणाले त्या सरकारी कार्यालयाची भिंत ओल पकडत होती गेले काही महीने एक वेळ छप्पर गळकं असलं तरी चालतं पण आधार देणा-या भिंतीच जर कमकुवत झाल्या तर कसं चालेल...नाही का? तर टेंडर काढा...साहेब म्हणाले...भिंती रंगवून घेऊ . . . रंगारी आले मग भिंत केली साफ घड्याळ, कॅलेंडर, गांधीजींची तसबीर, नोटीस बोर्ड, चिकटवलेल्या नोटीसा, सुट्ट्यांची लीस्ट सगळं सगळं काढलं आणि दिला रंग छानसा शेड तीच पण तरी छान वाटत होतं सगळ्यांना घड्याळ, कॅलेंडर, गांधीजींची तसबीर, नोटीस बोर्ड, चिकटवलेल्या नोटीसा, सुट्ट्यांची लीस्ट गेलं परत आपापल्या जागी साहेब खुश...काहीतरी काम झालं ऑफिसात म्हणून पण पंधरा एक दिवस आणि प

काळा घोडा कला महोत्सव कट्टा - वृत्तांत (४)

लेखक सर्वसाक्षी यांनी शनिवार, 15/02/2014 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
तर त्या पोपटाने जोरदार गर्दी खेचली होती. पोपट लहान अस्ला तरी तो भल्या मोठ्या खुर्चीवर बसला होता, खुर्चीशेजारी त्या पोपटाच्या जन्मदात्याचे वडील उभे होते. त्यांचे नाव नरेशभाई. गोरापान वर्ण, निळसर घारे सोळे आणि अथांग शुभ्र दाढी असलेले हे व्यक्तिमत्त्व मला भावले.

क्रिस्पी सेसमी प्राँस इन लेट्युस कप्स

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 14/02/2014 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्य क्रिस्पी सेसमी प्राँससाठी: १०-१५ कोळंबी साफ करु घेणे पाऊण वाटी मैदा (ह्यातील थोडा बाजूला काढून ठेवा कोटींगसाठी) पाऊण वाटी भाजलेले पांढरे तीळ शेजवान सॉस / चटणी (चिंग्सची शेजवान चटणी भारतात सहज मिळते, मस्तचं लागते) मीठ तेल .

आरोग्यवर्धक पाकक्रुती... भाग २ ... आल्याच्या वड्या.......

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 14/02/2014 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथमतः काही गोष्टी: १. ह्या अत्यंत घाई घाईत बनवल्याने हव्या तशा जमल्या नाहीत आणि मध्येच ऐन वेळी फोन आल्याने थोडी भानगड झाली. २. श्री. आदूबाळ आणि जेपी ह्यांच्या आग्रहास्तव बनवल्या असल्याने, ही पा.क्रु. त्यांना अर्पण. ३. वड्या करायला शिकायचे असेल तर ही प्रथम शिकायला लागते.समजा चुकल्याच (जशा माझ्या चुकल्या) तर चहात वापरता येतात आणि उरलेल्या किसाचा (किंवा चोथ्याचा) उपयोग लोणच्यासाठी किंवा मुखशुद्धी बनवण्यासाठी करता येतो. ४. मोबाईल बंद ठेवा किंवा फोन घेण्यासाठी दुसर्‍या व्यक्तीची नेमणूक करा. ५.

A.K.-अरविंद केजरीवाल....!(बंदे मे है दम !)

लेखक बाबा पाटील यांनी शुक्रवार, 14/02/2014 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
केजरीवाल--- माणसात दम आहे साला,तो कसा असु द्यात पण याच्या प्रामाणिकपणाविषयी शंका नाही,सिस्टीमच्या विराधात जावुन काम करायला अंगात सुलेमानी किडा लागतो,तो या माणसात आहे.खुर्चीला पिढ्यान पिढ्या जळुसारखे चिकटुन बसणारे पाहिले की कळत हातातील दिल्ली सोडायला खरच दम पाहिजे. बहुतेक लोक त्याला सनकी,वेडा समजतात्,पण याच्या इतका हुशार माणुस भारतीय राजकारणात सध्या तरी नसावा.केंव्हा, कुठे, काय आणी कसे बोलायचे आणी करायचे पुर्ण नियोजनबद्ध कार्यक्रम या माणसाचा आहे,आज जी चाल हा माणुस खेळलाय ती खरच मानली पाहिजे. माझ्या मते दिल्लीवासियांची पुर्ण सहानभुती या पठ्याला मिळाणार आणी या वेळेस हा काँग्रेसबरोब

सुंबरान - आठवणीतल्या प्रेमकथा - भाग ४

लेखक मराठी कथालेखक यांनी शुक्रवार, 14/02/2014 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
(कृपया भाग १ मधील प्रस्तावना आधी वाचा) भाग १ - http://misalpav.com/node/26930 भाग २ - http://misalpav.com/node/26938 भाग ३ - http://www.misalpav.com/node/26981 ४) आईचे छत्र हरवलेले, वडीलांचे घराकडे फारसे लक्षा नाही आणि अर्थिक परिस्थिती ओढाताणाची. अशा स्थितीत प्रकाश आपल्या दोन धाकट्या आणि अविवाहित बहिणींची काळजी घेत त्यांच्या व स्वतःच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी धडपडत होता.

घारापुरी भ्रमंती कट्टा: १ मार्च २०१४

लेखक प्रचेतस यांनी शुक्रवार, 14/02/2014 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
मुक्त विहारि यांनी आधी टाकलेल्या घारापुरी कट्ट्याची तारीख आधी १ किंवा ८ मार्च ह्या गोंधळात अडकलेली होती. आता हा घारापुरी भ्रमंती कट्टा १ मार्च २०१४ रोजी करण्याचे नक्की झाले आहे. त्यामुळे येथे त्यासाठी जाहीर धागा टाकत आहे. कट्ट्याची सर्वसाधारणपणे योजना खालीलप्रकारे असेल. पुण्याहून शनिवारी दि. १ मार्च रोजी मी, धन्या, सूड, नाद खुळा, प्रशांत आणि अत्रुप्त आत्मा असे सिंहगडने निघून साधारण ९.४५ च्या सुमारास छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहोचू. तिथून गेट वे ऑफ इंडियापर्यंत साधारण १०/१०.१५ पर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे.