Skip to main content

उत्साहानं भारलेली डेनवरची सोळावी गल्ली

लेखक कल्पक यांनी सोमवार, 17/02/2014 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
डेनवर हे अमेरिकेतील कोलोरॅडो राज्याच्या राजधानीचे शहर. कोलोरॅडो हे भौगोलिकदृष्ट्या बव्हंशी पर्वतीय राज्य. कोलोरॅडो या नदीवरून राज्याला नाव देण्यात आलं. डेनवर हे शहर समुद्रसपाटीपासून 5,280 फूट किंवा 1 मैल (1.6 कि.मी.) उंचीवर आहे. त्यामुळे या शहराला Mile High City (1 मैल उंच शहर), असं टोपण नावसुद्धा आहे. 1858 साली डेनवर शहर वसवण्यात आलं. या भागातील 500 चौरस मैलांच्या प्रदेशात डेनवर हे एकमेव शहर असल्यामुळे उद्योग, व्यापार, रोजगार, वाहतूक आणि शिक्षण या सर्व गोष्टी डेनवर येथेच केंद्रित आहेत.

आत्मूबाबा स्माईलीवाले बाबांच्या आश्रमात

लेखक सू डोकू यांनी सोमवार, 17/02/2014 02:26 या दिवशी प्रकाशित केले.
‘आत्मूबाबा स्माईलीवाले’ या नावाच्या पाटीची तीनदा खात्री करुन आम्ही त्या आश्रमात शिरलो. आतील वातावरण टिपीकल म्हणजे सर्वच आश्रमात असते तसे आध्यात्मिक, सुवासिक वासाने भारावलेले आणि प्रसन्न होते. समोरच बाबा प्रशस्त अशा लाकडी व्यासपीठावर मांडी घालून बसलेले होते. गौरवर्ण, फिकट भगव्या रंगाची सॅटीनची कफनी, खाली त्याच रंगाची लुंगी, हातात गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, भाळी चंदनाचा लेप, त्यावर मध्यभागी केशरी टिळा असे दृष्ट लागण्यासारखे तेजस्वी रुप. त्यांच्या पुढ्यात लॅपटॉप होता, आणि त्यावर ते काहीतरी टंकण्यात मग्न होते. आम्ही त्यांच्या शेजारी एका बाजूला जाऊन उभे राहिलो.

मॉर्निंग वॉल्क ! माझगावचा डोंगर !!

लेखक तुमचा अभिषेक यांनी रविवार, 16/02/2014 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी सहा वाजता भारत-न्यूझीलंडचा सामना बघायला उठलो पण घरच्यांच्या ओरडा कम सूचनेनंतर प्लॅन चेंज करत कधी नव्हे ते मॉर्निंग वॉल्कला बाहेर पडलो. मस्त ट्रॅक पॅंट घातली, वर नवे कोरे पांढरे स्पोर्ट्स टीशर्ट. पायातले स्पोर्ट्सशूज मात्र जुनेच. एक फारसे वापरात नसलेले पण बर्‍यापैकी छान स्पोर्ट्सवॉच सुद्धा धुंडाळले. सकाळी साडेसहाला उन्हाचा पत्ता नसल्याने गॉगलचा मोह तेवढा आवरला. गाणी ऐकायला म्हणून हॅण्सफ्री कानात टाकले. एकंदरीत सज धज के घरापासून साडेसात मिनिटांच्या अंतरावर असलेल्या माझगावच्या डोंगराकडे कूच केले.

मिपा दंगा धागा क्र. २..... मिपावरील बल्लव आणि सुग्रणींचे संमेलन भरवू या का?

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 16/02/2014 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
इथे दर आठवड्याला कुणी ना कुणी रेसीपी देत असतो. पण चव आणि वास न समजल्याने कुठला पदार्थ चांगला. हे काही समजत नाही. तर, आपण एक "बल्लव आणि सुग्रणींचे संमेलन भरवू या का?" परीक्षक म्हणून सुबोध खरे,पैसा ताई,सर्वसाक्षी,रामदास काका,अजया इ. तयार असतीलच. ६/७ महिने आधीपासूनच आयोजन केले तर उत्तम. पा.क्रु. देणारी बरीच मंडळी अनिवासी भारतीय असल्याने, त्यांच्या सवडीला प्राधान्य देण्यात यावे. ठि़काण कुठलेही चालेल. हा पण धागा तद्दन विनोदी असल्याने, जास्त सिरीयस घेवू नये.... चूकून मापून पा.क्रु. कलाकारांचे संमेलन झाल्यास त्यास, धागाकर्ता जबाबदार नाही......

गिलक्या (घोसाळी) चे भजी

लेखक आरोही यांनी रविवार, 16/02/2014 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
bhaji साहित्य :1 गिलके ,१ वाटी बेसन ,एक चमचा लाल तिखट,अर्धा चमचा हळद,एक चमचा ओवा ,थोडी कोथिम्बिर चिरून,मीठ चवीनुसार ,तळण्यासाठी तेल, पाणी . कृती : गिलके धुऊन पुसून घ्या . त्याच्या गोल गोल बारीक चकत्या करा आता बेसनात लाल तिखट,हळद, मीठ,ओवा,कोथिम्बिर घालून भाज्यांचे पीठ भिजवून घ्या . आता कढाई मध्ये तेल तापायला ठेवा. तेल तापल्यावर त्यात गिलक्याचे काप बेसन मध्ये घोळवून तळून घ्या . मस्त गरम गरम गिलक्याचे भजि खायला द्या.

पालक कढी

लेखक दिपक.कुवेत यांनी रविवार, 16/02/2014 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
kadhi साहित्यः १. पालकाची जुडी - १.५ २. आलं/लसूण पेस्ट - १ चमचा ३. बारीक चिरलेला कांदा किंवा कांद्याची पेस्ट - १ मध्यम ४. ताक - १/२ लि. ५. बेसन - २ चमचे ६. बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या - २ ७. कढीपत्ता - १ काडि ८. तेल २ पळ्या ९. चवीनुसार मीठ/साखर १०. फोडणीसाठी २ पळ्या साजुक तूप, चिमूटभर हिंग, १ चमचा जिरं आणि २ सुख्या लाल मिरच्या कॄती: १. पालकाची पाने स्वच्छ धुवुन त्यांची देठे खुडुन घ्या.

अमिताभ वि. विनोद खन्ना, एक जबरदस्त रंगलेला सामना

लेखक Atul Thakur यांनी रविवार, 16/02/2014 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
films हिन्दी चित्रपटसृष्टीत काही कलाकार असे होऊन गेले कि ते जेव्हा कधी काळी एकत्र आले, रसिकांना जबरदस्त रंगलेली जुगलबंदी पाहायला मिळाली. मात्र कुठले कलाकार एकत्र आल्यावर ही आग पेटणार होती याचं गणित फक्त परमेश्वरालाच ठाऊक असणार. दिलिपकुमार राजकपुर प्राचिन काळी “अंदाज” मध्ये एकत्र आले तेव्हा एक पडद्यावर युद्ध घडलं होतं. मात्र ही चकमक “इन्सानियत” मध्ये देव आणि दिलीपकुमार एकत्र आल्यावर झडली नाही. “संघर्ष” मध्ये संजीव कुमार विरुद्ध दिलीपकुमार असा सामना होता. त्यात पुन्हा बलराज साहनी.

आंबा

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 16/02/2014 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळा म्हंटला की आपल्याला सर्वात अगोदर आठवतो तो आंबा. उन्हाळ्याचा बर्‍याच प्रकारचे आंबे खात असतो.

जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला

लेखक रमताराम यांनी रविवार, 16/02/2014 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
ही आहे एक खोल विहीर, अठराविसे पायर्‍यांची, आणि धूर्तांनी रचलेल्या मूर्ख दगडांच्या उतरंडीची, विहीर इतकी अंधारी, खोल की तळ दिसत नाही, तो ही सारा खडकाळ, पाण्याचा एक टिपूस नाही, खडकाळ, रिकामी असली विहीर तरी नाही रिती, सुकल्या तळावर उभी आहे चार जीवांची झोपडी, दगड खडकांशी झुंजणारे ते आकांताने वर येतात, काठावरचे 'बघे' त्यांना पुन्हा खाली लोटून देतात थोडी चढण चढून येताच काठावरून होते गर्जना जब्याऽऽ, एऽ फँऽऽन्ड्री, पकड साला पकड.