दासनवमीनिमित्त “श्री समर्थ चरित्र प्रश्नमंजूषा” सत्र दुसरे
मागील पानावरुन पुढे चालू.... पुढील २५ प्रश्न :
२६ समर्थांचे कृष्णातीरी आगमन झाले ते शालिवाहन शक कोणते ?
२७ कृष्णतीरी समर्थांनी पहिला मारुती कोणत्या गावी स्थापन केला ?
२८ कृष्णातीरावर समर्थ कोणत्या गावी स्थिरावले ?
२९ छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ यांची प्रथम भेट कुठे झाली ?
३० छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ यांची भेट झाली ते शालिवाहन शक कोणते ?
३१ चाफळचे राममंदिर कोणत्या नदीच्या तीरावर आहे ?
३२ चाफळच्या राम मंदिरात स्थापन केलेली मूर्ती कोणत्या नदीच्या डोहात सापडली ?
३३ डोहात सापडलेल्या दुसर्या मूर्तीची स्थापना कोठे केली ?
३४ रामनवमी उत्सवास समर्थांनी कोठे प्रारंभ केला ?
३५ चाफळच्या उत्सवास जेव्हा सुरवात झाली ते शालिवाहन शक कोणते ?
३६ समर्थ संप्रदायाचे नाव काय ? संप्रदायाचा मठ कोणता ?
३७ भारतभ्रमणात समर्थांची व कोणत्या शीख गुरूंची भेट कोठे झाली व ते शालिवाहन शक कोणते ?
३८ समर्थांना महाबळेश्वरास मिळालेले दोन शिष्य कोण ?
३९ समर्थांना कोल्हापुरात मिळालेले दोन शिष्य कोण ?
४० समर्थ शिष्या वेण्णास्वामी व अक्कास्वामी यांच्या गावाचे नाव काय ?
४१ ‘भरल्या घरात रामनाम घेऊ नका’ असे समर्थांना कोण म्हणाले ?
४२ वाई येथे समर्थांनी स्थापित केलेल्या मारूतीचे नाव काय ?
४३ वाईमधील कोणत्या तीन घराण्यातील व्यक्तींना समर्थांनी प्रथम अनुग्रह दिला ?
४४ समर्थ स्थापित अकरा मारूतीपैकी सातारा जिल्ह्यात किती स्थाने आहेत व त्यांची नावे काय ?
४५ समर्थ स्थापित अकरा मारूतीपैकी कोल्हापूर जिल्ह्यात किती स्थाने आहेत व त्यांची नावे काय ?
४६ समर्थ स्थापित अकरा मारूतीपैकी सांगली जिल्ह्यात किती स्थाने आहेत व त्यांची नावे काय ?
४७ एकाच अभंगात अकरा मारूतींचा उल्लेख आहे तो अभंग कुणाचा ?
४८ दास टेकडी कुठे आहे ?
४९ समर्थांचा मठ कोणता ? त्याचा कारभार कोण पहात असे ?
५० कल्याण स्वामींचा मठ कोणता ? तो कोणत्या नदीच्या तीरावर आहे ?
जय जय रघुवीर समर्थ !
याद्या
21199
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
अवघड प्रश्न आहेत.
३९ समर्थांना कोल्हापुरात
कल्याणस्वामी पण कोल्हापूरातच
In reply to ३९ समर्थांना कोल्हापुरात by बॅटमॅन
कल्याणस्वामी कोल्हापुरातच.
In reply to कल्याणस्वामी पण कोल्हापूरातच by प्यारे१
कल्याण स्वामी आणि दत्तात्रय
In reply to कल्याणस्वामी कोल्हापुरातच. by बॅटमॅन
यग्झाक्टली!!!! आत्ता क्लीअर
In reply to कल्याण स्वामी आणि दत्तात्रय by प्रसाद गोडबोले
वादग्रस्त प्रश्न
येस!
In reply to वादग्रस्त प्रश्न by प्रसाद गोडबोले
ते १६५९ मध्ये अफजलखानाला
In reply to वादग्रस्त प्रश्न by प्रसाद गोडबोले
प्रक्षिप्त
In reply to ते १६५९ मध्ये अफजलखानाला by प्यारे१
>>>तुकारामांचा जन्म १५७७
In reply to प्रक्षिप्त by प्रसाद गोडबोले
विकी वर १५७७ चा उल्लेख आहे पण
In reply to >>>तुकारामांचा जन्म १५७७ by प्यारे१
उत्तरे