Skip to main content

अंजिर कस्टड आणि केळा चपाती

लेखक कंजूस यांनी सोमवार, 28/04/2014 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कंपनी कैँटिनमध्ये स्वीटडिश म्हणून नेहमीच्या खीर ,श्रीखंडाशिवाय ब्रेड पुडिंग (बिन अंड्याचे ) ,केळा चपाती ,अंजिर कस्टड ही केले जायचे .

मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस - एक अभिनव पण फसलेला प्रयोग

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 28/04/2014 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वीचे लेखन अलिबाबा आणि चाळीशीतले चोर गांधी आडवा येतो _________________________________________________________________________________ अमित जयंत (चिन्मय मांडलेकर) हा दूरदर्शन मालिकांतून काम करणारा, अनेक पुरस्कार मिळविणारा एक प्रथितयश कलाकार. सध्या त्याचे दिवस वाईट आहेत. त्याच्याकडे काम येत नाही. त्याचा स्वतःचा टीआरपी घसरल्यामुळे त्याला आता मागणी नाही. मागील २ वर्षात त्याला कामच मिळालेले नाही. त्यामुळे वैतागलेला, निराश झालेला, स्वतःवरच व पत्नीवर चिडणारा.

कलगीतुरा - पूर्वार्ध

लेखक बबन ताम्बे यांनी सोमवार, 28/04/2014 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल पुण्याचा ऊन्हाळा नकोसा झालाय. मला जेव्ह्ढा पुण्याचा हिवाळा प्रिय, तेव्ह्ढाच ऊन्हाळा अप्रिय. सुट्टीच्या दिवशी दुपारी बाहेर जायला नकोसं वाटतं. आज रविवार. इतर वेळी मी घरी नसतो सापडलो पण या उकाडयामुळे घरीच थांबलो होतो. टाईमपास म्हणून टी. व्ही. लावला तर फिरून फिरून त्याच त्याच बातम्या. कारण लोकसभेची निवडणूक ! लोकसभेच्या प्रचाराची सगळीकडे रणधुमाळी चालू होती. प्रत्येक पक्ष, अपक्ष आपलाच उमेदवार्/उमेदवारी कशी जनतेच्या भल्यासाठी आहे हे मतदारांवर बिंबवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता.राष्ट्रीय प्रश्न , विकासाचा अजेंडा यापेक्षा वैयक्तिक उखाळ्यापाखाळ्यांना अक्षरशः ऊत आला होता.

सावजी चिकन

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 28/04/2014 05:05 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः १ किलो चिकन साफ करुन, किंचित हळद, तिखट, लिंबू रस लावून मॅरिनेट करुन ठेवणे १ मोठा कांदा बारीक चिरलेला २ टेस्पून आले+लसूण पेस्ट ३ टेस्पून सावजी मसाला ( आवडीप्रमाणे कमी जास्तं) मीठ चवीनुसार बारीक चिरलेली कोथींबीर .

Positive Psychology – दोन सुंदर एक्सरसायजेस- आणि वेल बिइंग ची व्याख्या !

लेखक गुल-फिशानी यांनी सोमवार, 28/04/2014 03:30 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वाचन प्रवासात सध्या मार्टीन सेलींगमन या ग्रेट सायकॉलॉजिस्ट ची काही पुस्तके आलीत. हा फ़ार वेगळा विचार करणारा मानसशास्त्र्ज्ञ आहे. हा अमेरीकन सायकॉलॉजिकल असोसीएशन चा प्रेसीडेंट असतांना साधारण १९९८ मध्ये याने पॉझिटीव्ह सायकॉलॉजी या अगदी नविन अशा अभ्यासशाखे ची मुहुर्तमेढ रोवली. नावाप्रमाणेच ही शाखा मानवी जीवनात जे काही पॉझिटीव्ह आहे ते शोधण्याचा प्रयत्न करते या शाखेचे ध्येय च आहे की एक्सप्लोअरींग व्हॉट मेक्स लाइफ़ वर्थ लीव्हिंग ! आणि बिल्डींग द एनेबलींग कंडीशन्स ऑफ़ अ लाइफ़ वर्थ लीव्हींग. इतना खुबसुरत मोड मार्टीन जी ने आजतक की सायकॉलॉजी की स्टडी को दे दिया.

विसर

लेखक आनंदमयी यांनी सोमवार, 28/04/2014 00:39 या दिवशी प्रकाशित केले.
भातुकलीचा रंगलेला संपला ग डाव आता तुला गाठायचा आहे तुझा गाव आवर सारे तुझे तुझ्या सोबती घेऊन जा आठवणी तुझ्या इथे तेवढ्या ठेवून जा तुला पुन्हा मांडायचा आहे नवा खेळ तुझ्या माझ्या सोबतीची संपली ग वेळ विसर सखे ओळखीच्या जुन्या वाटा सार्या हृदयाशी बांधलेल्या सोड जुन्या दोर्या हरवुदे सोबतीने गुंफलेली माळ हरवुदे वाट आडवळणी खट्याळ खुणावती तुला तुझ्या नशिबाच्या रेघा तुला-मला जोडणारा तोड आता धागा नको सखे निरोपाचे उगा अश्रू ढाळू जायचीच निसटून हातातली वाळू सोसायचा तुझ्या-माझ्या नात्याला दुरावा जायचे जरी तुला ग सखे तुझ्या गावा... राहीन मी तुझ्या उरामध्ये ग दाटून कधी तुझ्या डोळ्यातून येईन बरसून ..... -अ

थोड positive थोड negative

लेखक मालविका यांनी सोमवार, 28/04/2014 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
एस टि तिल काही अनुभव कायम स्वरूपी लक्षात राहिले. सध्याच्या महिलन्वरिल वाढत्या अत्याचारचे प्रमाण बघता हे अनुभव मला नेहमी आठवतात. मी पुण्याला नोकरी करायला होते.

रसीक बलमा..

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 28/04/2014 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
चोरी चोरी चित्रपटातील सगळीच गाणी गाजली. त्यातले कोणते एक निवडायचे ठरवणे हे खूप अवघड आहे. चोरीचोरीतील प्रत्यक गाण्याचे स्वतःचे असे एक वैशिष्ठ्य आहे. अर्थात लता मंगेशकर हा प्रत्येक गान्यातील कॉमन फॅक्टर आहे. रसिक बलमा.... हे गाणं अजब आहे. स्वरांवरचा ठहराव आणि आंदोलने यांची एक मजेदार जुगलबंदी बघायला मिळते. गाण्याच्या सुरवातीला " रसिक बलमा ........ मधल्या "मा" अक्षरावरच्या स्वरावरील ठहराव तसेच हाये मधल्या " ये" वरचा निश्चल सूर...विरतो न विरतो तोच " दिल क्युं लगाया " या शब्दातील लगाया मधील " या " शब्दा वर स्वर ज्या पद्धतीने आंदोलीत होतो तो एक चमत्कारच आहे.

खुराकी खारीक

लेखक कंजूस यांनी रविवार, 27/04/2014 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या लहानपणी टिव्ही नव्हते त्यावेळी मुंबईतल्या राणीचा बाग ,हँगिग गार्डन ,फाईव गार्डन,गिरगाव दादर जुहू चौपाटीवर हिंडणे ,गेटवेला जाणे असा लोकांचा सुटीतला टाईमपास असायचा .आइसक्रीम ,कुल्फी ,पाणीपुरी आणि भेळ हे नेहमीचं खाणे .फोर्टात कामाच्या दिवशी फक्त नोकरीवाले जायचे .पण एक दोन वेळा बाबांबरोबर जाण्याचा योग आला आणि गजबजाट पाहाण्यास मिळाला होता .त्यावेळी फोर्टात एक विशेष वस्तु खायला मिळाली होती .पौष्टिक खुराकी खारीक .ती फार आवडली होती . ती दुपारच्या वेळी विकायला एकदोनजण बसायचे .गुजराती व्यापारी ते खायचे .आम्ही ती करूनही पाहिली होती .

दिल्लीतील पहिला वहिला कट्टा

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 27/04/2014 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रगुप्त उवाच: दिल्लीचा उन्हाळा, आणि वेळ दुपारी चारची ठरलेली. आम्ही तिघे, म्हणजे विवेक पटाईत, अरूण जोशी आणि मी बरोबर एकाच वेळी 'त्रिवेणी कला संगम' या ठरलेल्या ठिकाणी पहुचलो. तिथल्या उघड्या आभाळाखालच्या उपहारगृहामध्ये बसावे असा विचार करून तिकडे मोर्चा वळवला, पण संध्याकाळी रम्य वाटणारी ती जागा अजून चांगलीच गरम होती. मग आता कुठे जावे, असा विचार करत एक-दोन जागा बघून शेवटी एक-दीड किलोमीटर अंतरावर असणार्या नवनिर्मित 'महाराष्ट्र सदन' मध्ये पहुचलो.