खुराकी खारीक
आमच्या लहानपणी टिव्ही नव्हते त्यावेळी मुंबईतल्या राणीचा बाग ,हँगिग गार्डन ,फाईव गार्डन,गिरगाव दादर जुहू चौपाटीवर हिंडणे ,गेटवेला जाणे असा लोकांचा सुटीतला टाईमपास असायचा .आइसक्रीम ,कुल्फी ,पाणीपुरी आणि भेळ हे नेहमीचं खाणे .फोर्टात कामाच्या दिवशी फक्त नोकरीवाले जायचे .पण एक दोन वेळा बाबांबरोबर जाण्याचा योग आला आणि गजबजाट पाहाण्यास मिळाला होता .त्यावेळी फोर्टात एक विशेष वस्तु खायला मिळाली होती .पौष्टिक खुराकी खारीक .ती फार आवडली होती . ती दुपारच्या वेळी विकायला एकदोनजण बसायचे .गुजराती व्यापारी ते खायचे .आम्ही ती करूनही पाहिली होती .
करायला सोपी आहे .
साहित्य :
१)साखर खारीक (गोड असते .दुसरी एक लाकूड खारीक मिळते ती नको )
२)सारणासाठी
किसलेले सुके खोबरे आणि थोडी खसखस भाजून घ्यायचे .थोडे बेदाणे ,मनुका ,खडीसाखरेचे तुकडे ,अक्रोड आणि काजु चुरा एकत्र करायचे .
कृती :
१)खारका एक दिवस कमीतकमी पाण्यात भिजवून घ्यायच्या. सुरीने चिर मारून बिया काढायच्या ,कडेच्या देठाच्या कडक चकत्या उडवायच्या .
२)आत सारण घट्ट भरायचे .
(पूर्वी चांदीवर्ख लावत असत ).
चॉकलेटला चांगला पर्याय आहे .
वाचने
7312
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
मी पयला!
wow!!! Very royal!!!
सेम ह्याच प्रकारे खजुराच्या
In reply to सेम ह्याच प्रकारे खजुराच्या by पिंगू
पिंगू
अरे वा
देसी चॉकलेट टिकत नाहित .रोज
अशाच प्रकारे
In reply to अशाच प्रकारे by राही
वा!!! राजस प्रकार वाटतो आहे.
मस्त
राही बरोबर .आम्ही गुंजेचा
दात येण्याच्या वयातल्या
In reply to दात येण्याच्या वयातल्या by अजया
अश्या पाकक्रूतींच्या प्रिंट्स
In reply to अश्या पाकक्रूतींच्या प्रिंट्स by कवितानागेश
खरच अशा पा.कृ जमवुन क्लिनिकला
होय .आणि याने (खारीक अधिक