एस टि तिल काही अनुभव कायम स्वरूपी लक्षात राहिले. सध्याच्या महिलन्वरिल वाढत्या अत्याचारचे प्रमाण बघता हे अनुभव मला नेहमी आठवतात.
मी पुण्याला नोकरी करायला होते. alternate शनिवार रविवार जोडून सुट्टी मिळत असे.तेव्हा मी रात्रीच्या एस टि ने चिपळुन ला येत असे.पहिल्या वेळी मला काहीच त्रास झाला नाही.तसहि त्या गडिने बरेच चिपलूणकर ये जा करीत असतात.बरेच विद्यार्थीही सोयिचि असते म्हणून त्या बस ने प्रवास करतात.रात्री 11ला स्वारगेट वरून बस निघते ति सकाळी 4.30/ 5पर्यंत चिपळुन ला पोचते.तशीच बस येताना रात्री चिपळुन हून पुण्याला यायला.खर तर खासगी बस पण अनेक अहेत.पण वाटेत बाथ रूम साठी कुठेही थांबतात.त्यापेक्षा एस टि सातारा स्टॅन्ड वर थांबते ते सुरक्षित वाटत.एकदा मी पुण्याहून येत असताना गदिने कात्रज घाट सुरू केल्यावर चालकने सर्व दिवे बंद केले.घाट उतरयला सुरवात झाली आणि मला जणवल कि मागुन कुनितरि मला स्पर्श करतय.मी खिडकिला डोक टेकुन झोपयचा प्रयत्न करत होते.तेव्हा लक्षात आल कि खिडकी आणि सीट यामधून मागचा माणूस हात पुढे करुन मला स्पर्श करु पाहतोय.एक क्षण अंगावर शहरा आला . 2/3वेळा हाच प्रकार झाल्यावर मी वैतगले. का कुणास ठवुक मला उठून कंदक्तर कडे त्याची तक्रार करायची हिम्मत झाली नाही.पण म्हणून त्या माणसाला असाच सोडुन देण शक्य नव्हत.मग तेव्हा माजी धारदार टोकेरि नख कामी आली. जेव्हा त्या माणसाचा हात पुढे यायचा मी चांगला बोचकरुन काढायचे.तरीही त्या दळभद्रि माणसाने चिकाटी सोडली नाही.जवळ जवळ 5/6 वेळा मी त्याला बोचकरल.शेवटी सातारा स्टॅन्ड वर गाडी थांबली.लाईट लागल्यावर मी उठून त्या मानसाकडे अश्य तीक्शण नजेरेने बघितल कि त्याने आपन्हुन मन खाली घातली.त्याच्या हातावर नखचे ओर्खाडे दिसत होते.मग मात्र पुढच्या प्रवासात त्याने काही फाजिल्पना केला नाही.दुसर्या वेलिहि हाच अनुभव मधल्या फटितुन मगचा माणूस हात लावतोय.या वेळी माझ्ह्या बरोबर माझी मैत्रिन देखिल होती.तेव्हा मात्र आम्ही उठून कंदक्तर ला लाईट लावायला सांगून रित्सर त्याची तक्रार केळी.मग त्याने दुसर्या एका स्त्री ला विनंती करुन तिला आमच्या पाठि बसायाची सोय केलि.एकदा मागचा एक माणूस पाठि टेकयचि आणि बसय्चि सीट असते त्याच्या मधल्या फटितुन पठि पाय लावत होता.तेव्हसुध्हा मी त्याची मजा केलि .सातारा स्टॅन्ड साठी गाडी वल्ली आणि मी एकदम वळून त्याचा पाय त्या सीट च्या फतितच पकडून ठेवला.माझ्या सुदैवाने त्याने बंद बूट घातले नवते त्यामुळे त्याची बोटे बरोबर माझ्या हातात सापडली.आणि तेवढ्यात लाईट लागले.आणि मग मात्र कंदक्तर ने त्याला जाम झाडले आणि या वेळी मला जागा बदलून दिली .
या उलट देखील चांगले अनुभव अहेत.मज गाव चिपळुन पासून 25 किमी असल्याने याच पूना गदिने आल कि मला लगेच मुंबई हून आलेल्य पुढे जाणार्या गाड्या मिळत.बरिचशि गर्दी चिपळुन ला उतरत असे.आमचा बस थांबा मुंबई गोवा महामार्गावर एक तिठ्यावर आहे .मी आधी घरी कल्पना दिलेली असल्याने मी चिपळुन हून निघाले कि घरी फोन करुन कल्वित असे.मग साधारण अंदजने दादा किंवा बाबा मला नायायला येत.सकाळी 5/5.30 पर्यंत गाडी तिथे पोचत असे.मी उतरयचि तयारी करायचे आणि कंदक्तर ला सांगायचे कि मला तिथे उतरायचे.बर्यच वेळा ते मला विचारत कोणि येणार अहे का आणायला ? बाबा तिथे असयचेच.पण 2दा बबना चुकून उशीर झाला तर कंदक्तर ने गाडी थांबवून ठेवली आणि मला उतरु दिल नाही .जेव्हा बाबा आले तेव्हा त्याने दार उघडून दिल .एकदा तर गाडी 20 मिनितमधे आली.एरवी 30 मिनिटे लागतात .मग चक्क कंदक्तर खाली उतरून मला घरी सोडुन आला.घर अगदीच 10 पावला वर आहे .पण त्याचे कर्तर्व्य असल्यसरखे तो मला घरी पोचवयला आला.हे अनुभव देखिल नक्कीच लक्षात रहन्यसरखे अहेत. त्याचमुळे मि इतके वेळा पुणे चिपळुन प्रवास केला असेल पण भीती मात्र कधी नाही वाटली .
आत्मविश्वास असला कि कुठल्याही प्रसंगला समोर जायला भीती नाही वाटत .
वाचने
4890
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला.
चांगला लेख! प्रवासात गैरफायदा
+++ १ .
In reply to चांगला लेख! प्रवासात गैरफायदा by श्रीगुरुजी
नियमाप्रमाणे अपवाद सगळीकडेच
In reply to +++ १ . by दिव्यश्री
चला प्रतिसाद देण्याचे अगदी
In reply to नियमाप्रमाणे अपवाद सगळीकडेच by आत्मशून्य
माझा प्रतिसाद आपण लक्षात न घेता विधान केले आहे.
In reply to चला प्रतिसाद देण्याचे अगदी by दिव्यश्री
>>> याला कोणी अपवाद नाही
In reply to +++ १ . by दिव्यश्री
>>> आँ? सगळेच असं करतात असं
In reply to >>> याला कोणी अपवाद नाही by प्यारे१
हेच ते वाट्टेल तसा , आपल्या
In reply to >>> याला कोणी अपवाद नाही by प्यारे१
कोणीही लगेच याचा उपयोग करून
In reply to हेच ते वाट्टेल तसा , आपल्या by दिव्यश्री
छान लेख...
अशा प्रवाशांना तक्रारकरून
टोचणारे पेन...???
भयंकर आहे...
In reply to टोचणारे पेन...??? by स्वप्नांची राणी
असे लोक त्यांच्या व्यक्तिगत
In reply to टोचणारे पेन...??? by स्वप्नांची राणी
https://www.youtube.com/watch