Skip to main content

कट्टा: दादर पूर्व ऋषी हॅाटेल

लेखक सूड यांनी रविवार, 25/05/2014 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
व्हाट्सअ‍ॅपवर मिपाकरांचे असे चार ग्रूप आहेत. कोणते ते विचारु नका, अभ्यास वाढवा असं उत्तर मिळेल. त्यातल्या एका ग्रूपवर मेसेज आला शन्वारी सांच्याला कोण कोण भेटू शकतं. मेसेज अर्थातच विमेंचा होता. शन्वार संध्याकाळ असल्यामुळे तसाही उंडारायला वाव असतो, मग मी तर मेसेज आल्याआल्या हो म्हणून सांगितलं. त्यातही दादरसारख्या ठिकाणी कट्टा होणार होता. आता हल्लीच्या फ्याशनीनुसार मध्यवर्ती समजली जाणारी ठिकाणे न निवडता आल्याची खंत होतीच म्हणा, पण असो. कट्टा ठरला, पण बा़कीचे डिटेल्स विमे बैजवार देणार असल्याचं म्हणून तिथेच विषय संपला.

स्वादिष्ट मिरची (तोंडी लावायला)

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 25/05/2014 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीत ठेल्यावर छोले भठूरे सोबत मिर्ची ही ताटात असते. लिंबाचा रस आणि मोहरीची डाळ लागलेली ही मिरची छोले भठूरे सोबत तर स्वादिष्ट लागते, पण रोजच्या जेवणाची रंगत ही वाढविते. शिवाय घरी सर्वाना मिरची खायला आवडतेच. (सौ. ला जास्ती कारण ती मूळ विदर्भातली). पुष्कळ दिवसांपासून सौ.च्या मागे लागलो होतो. काल अखेर तिने ही मिरची बनविली. साहित्य: हिरवी मिरची १०० गरम. (मोठ्या कमी तिखट असलेल्या मिरच्या), २-४ लिंबांचा रस (आकारानुसार, मिरच्या रसात बुडल्या पाहिजे), १०-१२ लसुनाच्या पाकळ्या (आवश्यक नाही), २-३ चमचे मोहरीची डाळ (अंदाजानुसार) आणि मीठ. कृती: प्रथम मिरच्याना मधून कापून ४ तुकडे करून घ्या.

महाराष्ट्र पॉलीटीकल लीग अर्थात एमपीएल २०१४

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 25/05/2014 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या देशात सालबादाप्रमाणे आयपीएलचा हंगाम सुरु आहे. नुकत्याच संपलेल्या दुसर्‍या आयपीएल (इंडीयन पॉलीटीकल लीग हो!) मध्ये नरेंद्र मोदींनी निर्वीवाद जेतेपद मिळवून पंतप्रधानपदाची ट्रॉफी पटकावली आहे. ही मॅच खेळताना बॉयकॉटला रनआऊट करणार्‍या बोथमप्रमाणेच मोदींनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशींपासून आपल्याच टीममधील अनेकांना रनआऊट केलंच, पण राहुल गांधींपासून ते लालूप्रसाद, मुलायमसिंग, नितीशकुमार यांच्याही मलिंगाप्रमाणेच यॉर्करवर दांड्या गुल केल्या. मायावतींचा तर त्यांनी यावर्षी पार अजित आगरकर करुन टाकला!

मँगो केक (ईन प्रेशर कुकर)

लेखक दिपक.कुवेत यांनी रविवार, 25/05/2014 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
Cake 1 साहित्यः १. मैदा - १ कप २. बटर - १२० ग्रॅम ३. ४ हापुस आंब्याचा पल्प ४. व्हॅनीला ईसेन्स - १ चमचा ५. बेकिंग पावडर - १/२ चमचा ६. बेकिंग सोडा - १/२ चमचा ७. मुठभर काळ्या मनुका ८. साखर (आंब्याच्या गोडिनुसार कमी/जास्त) कॄती: १. रिकाम्या कुकर मधे खाली तळाशी मीठ घाला व वरुन तरतं झाकण थेवुन मंद आचेवर प्रीहिट करत ठेवा.

एका इन्टर्प्रीटेशन चा बेस डेटा...

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 25/05/2014 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर हा डेटा बनवणं हे काही फार मोठे काम नव्हते. न्यू जोईनीज साठी एक इन्टर्नल प्रोजेक्ट असावा ज्यामुळे त्यांच्या अ‍ॅबीलीटीज एन्हान्स करता येतील या विचाराने हा प्रोजेक्ट घेतला होता. तो इन्टर्नल होताच पण त्याचबरोबर जमले तर कोणत्यातरी क्लायन्टच्या गळ्यात मारायला उपयोगी येणार होता. हे नेहमीचेच. न्यू जॉईनीज कडून विदाउट बिलींग प्रोजेक्ट करुन घ्यायचा आणि तो सेल करताना ऑप्टीमम रीसोर्सिंगच्या नावाखाली मोठे प्रॉफिट दाखवायचे आणि बी यू चा कागदी प्रॉफिट ग्राफ वर न्यायचा. ही पॉलीसी खरे तर अब्राहमची. नवी पोरे कामाला वाघ असतात. डाटा एन्ट्रीचे कंटाळवाणे रटाळ ते सुरवातीला अगदी आनंदाने करतात.

राजमाची उन्हाळी भटकंती: २

लेखक कंजूस यांनी रविवार, 25/05/2014 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
राजमाची उन्हाळी भटकंती: १ चार वाजले होते आणि गार वाऱ्याने बरे वाटले.इथे डावीकडच्या मनोरंजनच्या पायथ्यात कोणी घर /हॉटेल बांधले आहे. सरळ पुढे खाली करवंदीच्या जाळ्यांतून पंधरा मिनीटात उधेवाडी या गडावरच्या गावात आलो. उधेवाडी गावात तशी पन्नासच्या आत घरे आहेत.जानोरे यांच्या हॉटेल शिरिष मध्ये पडवीत बैग टाकली तेव्हा साडेचार वाजले होते.मालकांनी हसून स्वागत केल.ओळखतात."बऱ्याच दिवसांनी आलात?"तसा मी गेल्या दहा वर्षात सहावेळातरी इथे आलोय.लगेच पाणी आणले .चहा घेतला.पावसाळ्यात खूप गर्दी असते.पुण्याकडचे पर्यटक शनिवारी पाचनंतर निघतात आणि {खंडाळा कुणे गाव/लोणा

थांबा आणि वाट पहा !

लेखक मंदार कात्रे यांनी रविवार, 25/05/2014 02:39 या दिवशी प्रकाशित केले.
थांबा आणि वाट पहा ! भारताचे नवनिर्वाचित प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी शपथग्रहण करून पदभार स्वीकारण्यापुर्वीच त्यांच्या सार्क राष्ट्रप्रमुखाना बोलावण्याच्या निर्णयावरून उलटसुलट निष्कर्ष काढून रणकंदन करणार्या मंडळीना सांगावेसे वाटते ते इतकेच् की जरा थांबा आणि वाट पहा ! पाकिस्तानशी युद्ध पुकारून लढण्या ऐवजी गनिमी काव्याचा वापर करून आर्थिक कोंडी करणे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या बाजूने दबावगट निर्माण करणे / बलुचिस्तान वझिरीस्तान फुटीरतावादाला सहाय्य करून पाकिस्तानला अंतर्गत वादात व्यस्त ठेवणे / अफघाणिस्तानला सर्वतोपरी मदत करून आपले मित्र व पाकिस्तानचे शत्रू वाढवणे व पाकिस्तान ला दुर

एक विलक्षण अनुभव

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 25/05/2014 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
आताच दोन आठवड्यापूर्वी जे इ इ मेन चा लागला. मुलाचा निकाल फारसा चांगला आला नाही. तो आय आय टी च्या मुख्य परीक्षेसाठी अपात्र ठरला. आम्ही सुद्धा दोन दिवस बर्यापैकी निराश होतो. पण यात आपले नैराश्य बाजूला ठेवून मुलाला धीर देण आवश्यक होते त्यामुळे चेहेर्यावर तसे काही दिसू न देता आम्ही त्याला पुढच्या परीक्षांसाठी उत्तेजन देत होतो. तीन चार दिवसात गाडी रुळावर आली. मुळात आयुष्यात अपयशी होण्याचा मला चांगला अनुभव असल्याने मी जास्त शांत होतो.आणि मी शांतपणे मुलाला जवळ घेऊन सांगितले की तू काही सलमान खान सारखा दारू पिऊन लोकांच्या अंगावर गाडी घालण्यसारखा गुन्हा केलेला नाहीस.

सौदी क्षणचित्रे : ०५ : एक विविधरंगी मरुवन, अल् कतीफ

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 24/05/2014 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
सौदी क्षणचित्रे : ०५ : एक विविधरंगी मरुवन, अल् कतीफ =================================================================== सौदी क्षणचित्रे : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...