रीलस्टार
रीलस्टार
रीलस्टार
शहाण्या बाळाची गोष्ट
आजकालच्या सुशिक्षित जगात 'डिजिटल डिटॉक्स' नावाच्या एका नवीन सुविचाराने धुमाकूळ घातला आहे. मोठेमोठे विचारवंत, कॉर्पोरेट गुरू आणि यूट्यूबवरचे तत्त्वज्ञ रोज सकाळी येऊन ज्ञान पाजळतात की, जर तुम्हाला मानसिक शांतता हवी असेल, तर दिवसातून किमान दोन तास किंवा आठवड्यातून एक दिवस मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियापासून पूर्णपणे लांब राहा. इंटरनेटवरची ही गंभीर व्याख्याने ऐकून आपल्या एका मराठी पांढरपेशा नोकरदाराला वाटलं की, आपणही आयुष्यात हा प्रयोग करून बघावा. तसाही रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तो मोबाईलच्या स्क्रीनवर डोळे फोडून थकला होता.
फुटबॉलचं महायुद्ध दि. ११ पासून सुरू झालं. एकूण ४८ संघांचा सहभाग असलेले फुटबॉलचे सामने पुढे रंगत जातील. सध्या सामन्यांच्या वेळा आपल्या भारतीयांच्या अजिबात सोयीच्या नसतात. हायलाइट्सची व्यवस्था उरली नाही, त्यामुळे सामन्यांचा आनंद घेणे जिकिरीचे झाले आहे. अडतीस वर्षांचा मेस्सी अर्जेंटिनाला फुटबॉल वर्ल्डकप जिंकून देतो का, ते पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तिकडे, एक्केचाळीस वर्षांच्या पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होते का, तेही पाहता येईल.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता ही हा हा म्हणता आपल्या रोजच्या जीवनातील एक मुख्य घटक झालेली आहे. म्हणजे अगदी कोअर डेव्हलपमेंट ते कस्टमर केअर चॅटबॉट ह्या तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात शिरकाव केला आहेच. अगदी परवा आमची वय वर्षे आठ असणारी कन्या शाळेतील "महाराष्ट्र आणि सिक्कीम मधील सणांची तुलना" ह्या विषयावर पोस्टर बनवण्याचे आर्ट वर्क घेऊन आली तसे आम्ही नवरा बायको हबकलो असताना छोटीने शांतपणे माझा मोबाईल उचलून जेमिनीला असा अचूक प्रॉम्प्ट दिला की त्याने पंधरा सेकंदात गुढी पाडवा अन् सिक्कीमचा लुसूंग (नवीन वर्ष स्वागत सण) तुलना करणारे इन्फोग्राफिक पोस्टर दिले.
-
https://www.misalpav.com/tourism/53715-
पहिला भाग इथे वाचा
उद्याच्या कार्यक्रामाची रूपरेखा ऐकली. जेवण केले,खोलीत जाऊन सर्व पर्यटक गुडूप झाले..
पुढे.....