Skip to main content

"हमें तुमसे प्यार कितना.."

लेखक अन्नू यांनी रविवार, 21/09/2014 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ-सकाळच्या कोवळ्या उन्हाची तिरिप सॅमन्थाच्या तोंडावर पडली आणि नापसंतीदर्शक हुंकार भरत तिने तशीच आपली मान बाजुला कलती केली. रात्रीच्या झोपेची ती धुंदी अजुनही तिच्या डोळ्यांवरुन गेलेली दिसत नव्हती. त्या गोड झोपेच्या तंद्रीतच तिने पुन्हा एकदा आपली कुस बदलली. डावा हात पुढे टाकला. अन्.. नकळतच तिच्या चेहर्‍यावर मंद हसू उमटून गेले! आपल्या जडावलेल्या पापण्या हळूवाSरपणे उघडत तिने त्याच्याकडे एक दृष्टीक्षेप टाकला. तो तिच्या जवळच होता- मॅक.. तिचा मॅक! आणि ती आता त्याच्याच अंगावर हात टाकून स्वस्थ झोपली होती. हलकेसे स्मित करत तिने कौतुकभरल्या नजरेने त्याला न्याहाळले.

एक रात्र फुटपाथवरील

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 21/09/2014 12:19 या दिवशी प्रकाशित केले.

एक रात्र फुटपाथवरील

पन्नास वर्षांपुर्वीची गोष्ट. पावसाची रिप रिप. वीज गेलेली. रात्रीचे 11 वाजून गेलेले. कुठलेच हॉटेल खायला व राहायला उघडे नाही. अशा अवस्थेत मी आणि माझा मित्र व त्याचे वडील दुसऱ्या दिवशीच्या पहाटेच्या एसटीसाठी वणवण भटकत फिरून शेवटी हाताची उशी करून फुटपाथवर उताणे पडलो होतो. “...

पुस्तक : सिलेक्टेड वर्क्स ऑफ जवाहरलाल नेहरू !

लेखक डांबरट यांनी रविवार, 21/09/2014 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
मेनन : संरक्षण मंत्री की परराष्ट्र मंत्री ! (माझ्या अभ्यासाप्रमाणे परराष्ट्राचा मंत्री) आजचा म.टा. मधला सिलेक्टेड वर्क्स ऑफ जवाहरलाल नेहरू या पुस्तकावरचा लेख वाचला. हे पुस्तक मूलतः मेनन यांनी लिहिलेल्या रिपोर्ट्सवर आधारित आहे. सामान्यतः आपल्याला या लेखाच्या नावावरून वाटतं की,कोण्या संरक्षण मंत्र्याने हे पुस्तक लिहिले आहे म्हणजे फार काहीतरी खळबळजनक खुलासे असणार.कारण सध्या राजकारणी, किवा तथाकथित नोकरशहा यांनी पुस्तकातून स्फोट करायचा धडाका लावलाय. पण तसे नाही. कारण मेनन सध्या हयात नाहीत. पण राहून राहून कोणाला न कोणाला नेहरू घराण्याबद्दल उमाळा येत असतो.

स्वामी त्रिकाळदर्शी उवाच: कलियुगातील समुद्र मंथन

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 21/09/2014 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
स्वामी त्रिकाळदर्शी आपल्या आश्रमात गहन विचारात ध्यानमग्न अवस्थेत होते अचानक त्यांनी डोळे उघडले. वेळ न गमावता मी विचारले, बाबा, कसला विचार करता आहात? बाबांच्या चेहऱ्यावर मंद हास्य पसरले, ते म्हणाले बच्चा, समुद्र मंथन सुरु आहे, अमृत कुंभ कुणाला मिळणार याचाच विचार करीत होतो. मी म्हणालो, बाबा फार पूर्वी सत्ययुगात समुद्र मंथन झाले होते, आज तर कलयुग आहे. बाबा म्हणाले, काळ बदलला तरी देव आणि दानवांचा संघर्ष हा चिरंतर आहे. मी विचारले, तो कसा काय? बाबा म्हणाले, बच्चा मतपेटी म्हणजे सुमेरू पर्वत जिचा मथण्यासाठी वापर होईल.

तिला नेहमी वाटतं

लेखक खटपट्या यांनी रविवार, 21/09/2014 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
तिला नेहमी वाटतं.... असावं कोणीतरी आपल्यावर एकतर्फी प्रेम करणारं नकार देऊनही आपल्यासाठी झुरणारं आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी जीव ओवाळून टाकणारं राग आला तरी समजूत काढणारं अबोला धरला तरी सतत मेसेज पाठवणारं आपल्या नकळत आपली काळजी घेणारं आपल्या प्रत्येक गोष्टीची माहिती असणारं गुड मोर्निंग आणि गुड नाईट च्या मेसेज ची वाट बघणारं किती झिडकारलं तरी परत येणारं गुपचूप आपल्यासाठी अश्रू ढालणारं आपल्याबद्दल कितीही वाईट सांगितलं तरी चांगलंच म्हणणारं त्याच्या आयुष्यातील गुपितं फक्त आपल्यालाच सांगणारं ती त्याला झुलवतेय हे माहित असूनही दुर्लक्ष करणारं कोणीतरी असावं आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं

मामाचे गाव - तात्या (३)

लेखक दशानन यांनी शनिवार, 20/09/2014 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग मळ्यामध्ये कच्चा रस्त्याच्या एकाबाजूला मावशीचे घर होते व मागे दूरवर पसरलेले शेतच शेत. त्यामध्ये गावातील अनेक लोकांच्या शेताबरोबर मामाचे शेत देखील दूरवर दिसत असे. त्याची ओळख पटवणारी ओळखीची खुण म्हणजे त्याच्या बांधावर उभी असलेली नारळीची ८-१० झाडे आणि शेताच्या मध्यभागी असलेले आंब्याचे भले मोठे झाड. मावशीच्या घराच्या मागच्या बाजूला लागूनच भला मोठा जमिनीचा तुकडा मावशीचा होता, त्यात तात्याने केळीची बाग, डाळिंब्याची झाडे, पापी आणि रोज लागणाऱ्या हिरव्या मिरच्या पासून कोथिंबीरीपर्यंत अनेक वेगवेगळी झाड लावलेली होती.

फुले शाहु आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र .....???????

लेखक अतुल झोड यांनी शनिवार, 20/09/2014 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१४ साठी आज पासुन अर्ज भरणे सुरु झाले ...परंतु अद्याप पर्यन्त आघाड्या तयार झालेल्या नाहीत....किंबहुना तयार असुन सुध्दा घोषीत केल्या नसेल......कारन पितृपक्ष सुरु आहे.......... उठता बसता, जळी... काष्टी...पाषाणी हे राजकारणी.... फुले शाहु आंबेडकर याचा महाराष्ट्र हे वाक्य बोलत असतात. प्रत्यक्षात मात्र अश्या अंधश्रध्दा जोपासणे शोभते का?....अंनीस न पितृपक्षात निवडणुक अर्ज भरण्याचे आव्हान किती उमेदवार स्विकारतात ते पाहावच लागेल .... विशेषातः जाणता राजाच्या पक्षाच्या उमेदवारांकडून तरी एवढी अपेक्षा ठेवण्यास काही हरकत नाही. तुमचे मत काय?

जीवन - सार

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 20/09/2014 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा : काय सॉम्गॉयलॉच पायजे क्का? रॉर्बट जोत्याच्या घराकडे जाताना दिसला. मॉरेयॉ भवतेक त्यालाच शोधत होती. तसे पाह्यला गेले तर रॉर्बट आणि मॉरीयॉ दूरच्या नात्यातले. रॉर्बट मॉरीयॉ च्या मावशीच्या नणंदेच्या दिराच्या सासूचा नातू. प्ण एका लग्नात मॉरीयॉला रॉर्बट भेटला आणि ते जवळ आले. आख्खे आख्खे दिवस ते एकमेकाना आटवू लॉगले. एकमेकाम्शिवाय त्यान कर्मायचे नाही. राँर्बट जेव्वा जेव्वा मॉरीयॉला भेटॉयचा तेव्वा तेव्वा तो तिच्यासाटी पेपरमिटाच्या गोळ्या ऑणॉयचॉ. मॉरीयॉला त्या मदे भोक आस्लेल्या पांडर्या गोल्या खूप्प आवडॉयच्या. रॉर्बंट ज्जे काही करायचॉ ते अगदी श्टैल मधे करायचा.

देर न हो जाये

लेखक भावना कल्लोळ यांनी शनिवार, 20/09/2014 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
खालील घटना पुर्णपणे काल्पनिक असुन तो कुणाशी खरच साधर्म राखत असेल तर फक्त मनातले मनात हसुन घ्यावे, खालील लेखन निव्वळ मनोरंजनासाठी लिहिला गेला आहे. त्यात लेखिकेला कोणताही मानसिक आजार झालेला नाही यांची कृपया नोंद घ्यावी. स्थळ : इंजिनीअरिंग कॉलेज होस्टेल. वेळ : सकाळची . संख्यने जास्त असलेल्या आणि सुविधा कमी असलेल्या होस्टेल मधला काल्पनिक प्रसंग. नीरु : ए वश्या बाहेर ये, इथे आतल्या चिकनची पुरण व्हायची वेळ आली आहे. अभी : अरे तो कसला येतोय लवकर, आता महाआवाहन करा त्याला.

शिकार

लेखक कल्पतरू यांनी शनिवार, 20/09/2014 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
कधीतरी असाच एक योग येतो चार चौघांची चांडाळ चौकडी जमा होते आणि शिकारीला जायचा बेत ठरतो. आता कोकणात शिकारीला फार महत्व. जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी शिकारीला गेलंच पाहिजे हा इथला अलिखित नियम. लहानाचा मोठा झालो तो या गोष्टी ऐकतच. अगदी मला आठवतंय म्हणजे पहिली दुसरीत असताना दर आठवड्याला शिकारीच्या गोष्टी हमखास कानी पडायच्या. कधी तर सशाच्या, तर कधी लांडोर तर कधी भेकर , रानडुकराची शिकार म्हणजे सगळ्यात मोठी शिकार. याची शिकार जो करायचा तो आठवडाभर गावात त्याची छाती चार इंच फुगवून चालायचा.