आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ३
१८१९ मध्येच विल्यम पेरीच्या नेतृत्वाखाली नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेने इंग्लंडहून प्रस्थान ठेवलं. एडवर्ड सॅबीन, फ्रेड्रीक विल्यम बीची यांचा या मोहीमेत समावेश होता. हेकला आणि ग्रिपर या दोन जहाजातून नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडण्याचा पेरीचा बेत होता. बर्फापासून वाचण्यासाठी जहाजाच्या सांगाड्यावर खनिजाचा लेप देण्यात आला होता. जहाजांच्या बाहेरील बाजूस ३ इंचाच्या लाकडाचा थर देण्यात आला होता. त्याशिवाय हवाबंद अन्नाचे डबे त्यांनी आपल्याबरोबर घेतले होते.
इंग्लंडहून निघाल्यावर रॉसच्या मार्गाने न जाता पेरीने थेट लँकेस्टर साऊंडची दिशा पकडली. खाडीतील बर्फातून वाट काढत २८ जुलैला तो खुल्या समुद्रात पोहोचला.
मिसळपाव