Skip to main content

जडण-घडण 12

लेखक माधुरी विनायक यांनी शुक्रवार, 17/10/2014 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या ऑफीस जॉबचा निरोप घेतल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस छान निवांत गेले. मनाला आलेलं साचलेपण हळू हळू निथळू लागलं. सकाळी उठायचं, रोजची कामं आवरायची, आईला मदत हवी का, ते पाहायचं, मग निवांत पेपरवाचन... दुपारच्या जेवणानंतर गेल्या अनेक महिन्यात वेळोवेळी कुठे कुठे खरडून ठेवलेल्या ओळी, कल्पना चाळायच्या... असे खूपच कागद जमले होते. छान वेळ जायचा. संध्याकाळी बाबा ऑफीसमधून आल्यानंतर आई-बाबांसोबत चहा. मग ते दोघं नेहमी एक फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडायचे. मी कधी त्यांच्यासोबत तर कधी एकटीच भटकायचे. माझे बाबा नीटीमध्ये होते. आयआयटी सारखीच नॅशनल इंडस्ट्रीयल इंजिनियरींग इन्स्टीट्यूट.

नवराष्ट्र "पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे " चे राष्ट्रगीत

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 17/10/2014 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे या राष्ट्राचे राष्ट्र गीत कोणते असावे असे तुम्हाला वाटते? आमची कुठेही शाखा नाही. या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेच शाखा नाही. !! धृ !! जे का हिंडले बिंडले पत्ता शोधण्यात गुंगले ते उलटे जावोनी गंडले या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेही शाखा नाही सुजला सुफला मुळा मुठा अन दुथडी भरी नागझरी. सर्वांचे चितळे पोटभरी सदाशिव नारायण साहित्य मांसाहारी उण्या दुण्या चे काम नसे हे पुण्या गुण्याचे नाव असे हे. या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेही शाखा नाही. जय हे जय हे जय जय हे....... जय.पुणे......

'द साऊथ सी बबल'… एका जागतिक महाघोटाळ्याची कथा

लेखक प्रसाद भागवत यांनी शुक्रवार, 17/10/2014 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वी झालेले आणि संभाव्य घोटाळे हा सर्वसामान्यांना बाजारापासून दूर ठेवणारा एक मोठा घटक!!. हे गैरप्रकार नक्कीच निषेधार्ह, पण अशा घोटाळ्यांतून वा अपघातांतूनच प्रचलित व्यवस्थांना सुधारणांचे बाळकडू मिळते, त्या सुदृढ बनतात हे नाकारता येणार नाही. असे भ्रष्टाचार हल्लीच होतात, आपल्याकडेच होतात असे बिलकुलच नाही. वाचकांचा असा गैरसमज असेलच तर तो दूर करणारी ही एक ऐतिहासिक महाघोटाळ्याची सुरस कथा.... ‘घोटाळा' हा शब्द अलीकडे आपल्या भलताच परिचयाचा झाला आहे, वर जेव्हा तो शेअरबाजारासारख्या (कु??)प्रसिद्ध बाबीशी जोडला जातो, तेव्हा 'घोटाळस्य कथाः रम्याः' हे ओघानेच आले.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१६

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 17/10/2014 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग-१५ आणि श्टेजवरून खर्‍या अर्थानी एक्झिट होतात... पुढे चालू... =========================== मग सुरु होतो एक छोटा खेळ..सूनमुखाचा.पण हा ही तयार-झालेला एक विधी आहे. हल्ली एक भलामोठ्ठा आरसा(मंगल-कार्यालयातूनच!) दिला जातो. मग सासूबाई अगदी हौसेनी त्यात आपल्यासह मुलाचा सुनेचा चेहेरा बघतात.फोटुवाले त्यांच्या मागनं खास कलात्मक फोटु घेतात.

प्रेमही जरुरीपुरतंच करावं...

लेखक अजब यांनी गुरुवार, 16/10/2014 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमही जरुरीपुरतंच करावं... सोयीचं आहे, आवडीचं आहे म्हणून जास्त करत गेल्यास त्यची सवय होते आणि ती वाढत वाढत जाऊन शेवटी त्याचं व्यसन होतं... व्यसन कोणतंही वाईटच... आधी ज्या गोष्टीचं व्यसन, त्याची तल्लफ येते, मग हळूहळू त्याची अधिकाधिक मात्रा आवश्यक वाटते न मिळाल्यास विथड्रॉवल सिम्प्टम्स आणि सर्वांत भयानक म्हणजे एका व्यसनासोबत अनेक व्यसनांची आधी चटक आणि मग सोबत... प्रेमही जरुरीपुरतंच करावं... सोयीचं आहे, आवडीचं आहे म्हणून आहारी जाऊ नये...

शिआयडी गंमत

लेखक दशानन यांनी गुरुवार, 16/10/2014 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
आज डोकं फार दुखतं आहे. आई गं! - दशानन मेली, मी कधी पासून सांगत होते, तो दळभद्री टीव्ही पाहू नका, पाहू नका! - दशाननची बायको अगं, मला काय माहिती असा त्रास होईल.. - दशा. पण मला का त्रास? नेमकं कुठले डोके दुखत आहे, ते तरी सांगा.. अमृतांजन लावते थोडे... - दशा.बाय दहाच्या दहा, ठणाना करत आहेत.... - द. मेले गं! नेमकं काय पहात होता टीव्हीवर? ऑ? ते इंग्लिश चेनेल का? - द.बा. अगं, ते मोदी आले तेव्हाच, बंद झाले. आज सोनी पहात होतो सिआयडी - द. अगं बाई, अजून तुम्ही मेला नाय? ते सीआयडी पाहून तर किमान १०००००००००० लोकं गेली असतील वर.. - दबा म्हणजे? तुला म्हणायचे काय आहे?

अ‍ॅन्ड्रॉइड फोन साठी चांगले छान अ‍ॅप्स कुठे डाउनलोड करता येतील

लेखक गुल-फिशानी यांनी गुरुवार, 16/10/2014 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो बरेच दिवसांची हौस पुर्ण झाली आहे. मी एक सॅमसंग चा मोबाइल खरेदी केलेला आहे. मला चांगली अ‍ॅप्स कुठे डाउनलोड म्हणजे नेटवर कुठे चांगली अ‍ॅप्स डाउनलोड करावयास मिळतील याच्या लिंका कृपया द्याव्यात. आणि अ‍ॅप चा वापर कशासाठी आहे त्याची ही माहीती दिली तर बरे होइल. खास करुन संगीता विषयी चे अ‍ॅप्स असल्यास वा इतर कुठलेही अ‍ॅप्स जे इंटरेस्टींग आहेत त्यांच्या कृपया लिंका द्याव्या धन्यवाद अगोदरच मानतो

माहिती हवी आहे - प्रपौत्र दर्शन

लेखक स्वप्नालीसा यांनी गुरुवार, 16/10/2014 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मिसळ पाव वर लिहिण्याची हि माझी पहिलीच वेळ आहे. पण रोज न चुकता इथे येऊन नवनवीन लेख, चर्चा वाचण्याचा माझा अगदी नेम झाला आहे, आणि त्यातूनच मला असा वाटले कि इथले सभासद मला 'प्रपौत्र दर्शन ' सोहळ्याविषयी काही मार्गदर्शन करू शकतील आम्ही इंग्लंड मध्ये राहतो आणि इथे आमच्या एका स्नेह्यांना त्यांच्या आई आणि नाती साठी हा सोहळा करायचा आहे. त्यांच्या कुटुंबातील असा पहिलाच सोहळा अहे. बऱ्याच लोकांकडे चौकशी केल्यावर खूपच वेगवेगळी माहिती मिळाली . त्यात फक्त 'सोन्याची फुले' तेव्हढी सगळ्यांनीच सांगितली .

<दबंग>

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 16/10/2014 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
लिहीतानाच हसायला येत आहे, कारण 'मुद्दाम' लिहितोय. ---दबंग--- हुडहुड दबंग हुडहुड दबंग ये आरोळी थेटरात मग अनेक शिट्ट्या एका वेळी पोलिसाच्या वेशामध्ये सल्लूभाई थेटर फुल्ल प्रेक्षक मुग्ध त्याच्या पायी बघतो पिक्चर बाजूला मी डोके ठेवुनि येते गम्मत मारामारी ऐसी बघुनि मनोरंजना कमी न पडती सल्लूभाई अन भार्येचा हट्टच असता इलाज नाही -------------- -----------

विंचू चावला

लेखक फुंटी यांनी गुरुवार, 16/10/2014 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
मतदान झाल ,निकाल लागला ,आलं सरकार आलं सरकार , तयाला माझा नमस्कार अग, ग ..... विंचू चावला देवा रे देवा ..... विंचू चावला आता काय मी करू ..... विंचू चावला अग, ग ..... विंचू चावला आर आर आबा , बा .....