Skip to main content

अंधार क्षण भाग ३ - जेम्स ईगल्टन (लेख १०)

लेखक बोका-ए-आझम यांनी गुरुवार, 13/11/2014 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण - जेम्स ईगल्टन तलसा, ओक्लाहोमा. मी माझ्या मोटेलमध्ये आलो आणि त्याच वेळी रेल्वे एंजिनाचा आवाज ऐकला. अगदी अमेरिकन आवाज. असंख्य हाॅलिवूड चित्रपटांमध्ये ऐकलेला. लोकांच्या सवयीचा. पण मला मात्र त्या आवाजाने अस्वस्थ केलं. तलसाला येण्याआधी मी जपानच्या जवळ असलेल्या ओकिनावा बेटावर चित्रीकरण केलं होतं. ओक्लाहोमामधले अनेक तरूण ओकिनावाच्या लढाईत जपान्यांशी लढले होते. जेम्स ईगल्टन, ज्याची मी पुढच्या दिवशी मुलाखत घेणार होतो, त्यांच्यातलाच एक.

बाबा वाक्यं प्रमाणम....२ भिकारी....

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 13/11/2014 04:46 या दिवशी प्रकाशित केले.
गेले कित्येक महिने "मिपा"वर ह्या ना त्या स्वरूपात डू.आय.डीं.चा विषय निघतो. मला अद्याप तरी मिपाच्या अंगणातून बाद करण्यात आलेले नाही.किंबहूना, असे अपमान सहन करायची पाळी आणू नये, असेच संस्कार झालेले असावेत.पण काय तो एकदा सोक्षमोक्ष लावूनच टाकू या, म्हणून नेहमीप्रमाणे बाबांकडे गेलो.(आमचे बाबा जरा बरे सल्ले देतात.) नेहमीचा नमस्कार झाला आणि आम्ही विषयाला सुरुवात केली. मी : बाबा एक शंका होती, बाबा: बोल..ऐकतोय. मी : आजकाल आमच्या मिपावरती डू.आय.डींचे प्रमाण फारच वाढले आहे.तर काही उपाय सुचतोय का ते बघा ना? बाबा : तुला रे लेका कसला त्रास? मी : अहो, परवाच तर मुंज झाली आणि आत्ता भीक मागायला सुरुवात

साचेबंद बुध्दिबळ ?

लेखक कंजूस यांनी गुरुवार, 13/11/2014 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
आनंद वि॰ कार्लसन यांचा प्रत्येक डाव नंतर पुन्हा खेळून पाहतोय. इथे खेळाडूची पहिली खेळी झाली की लगेचच सिसिलिअन, फ्रेँच, ग्रंडफिल्ड, इत्यादी सुरवात/ रक्षण पध्दती अशी टिप्पणी येते. कम्प्युटर आणि महालढवैये त्याचे बरोबर-चूक विश्लेषण करून पुढील खेळी कोणती खेळणार हे सुचवतात बहुतेक तीच चाल चालली जाते. बुध्दिबळ हा खेळ आता इतक्या साचेबंद अवस्थेत पोहोचला आहे का?खेळाडू आता वेळेशी जमवून घाईने खेळताना चुकला की डाव घसरून हारतो. खेळातले वैविध्य हरवत चालले आहे असं वाटू लागतं. राजा -गुलाम आणि वजीराच्या जोडीला रंभा ही मानवी मोहरी वाढवायला हवीत आणि पट १० चौकडीँचा करावा.

(पाठ शिवा हो पाठ शिवा)

लेखक सूड यांनी बुधवार, 12/11/2014 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
पाठ शिवा हो पाठ शिवा वार्धक्यातही वाघ रडवला डाव टाकूनि नवा नवा बन कमळांचे मुदित* सापळे लपायास मज असे मोकळे सत्तांधाला काय का कधी शिवाशिवीचा खेळ नवा? टिकटिकविरहित जरी तव पाऊल अचूक मला पण लागे चाहूल कित्येकांची चळते बुद्धी तुझ्या ऐकता पायरवा उमटू न देईन साद पाऊली सर्रकन जाईन जशी सावली सामावून मज घेईल अलगद हा कमळांचा उभा थवा मालकी घेशील परी कशाची तुझ्या पदांची तुझ्या यशाची पाठलाग मग कुठे संभवे महाराष्ट्र जर तुला हवा !! ;) *मोद-मोदी-मुदित

सत्यनारायण पूजा:

लेखक वगिश यांनी बुधवार, 12/11/2014 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
सत्यनारायण पूजा: मी मिपा वर नविन आहे.येथे असलेले लेख व त्यावरील प्रतिक्रिया वाचून माझे शंकानिरिसन होईल असे वाटते. काही दिवसापुर्वी आम्हा उभयतास सत्यनारायण पुजेस बसण्याचा योग अल.पुजा लक्षपुर्वक ऐकली. पण प्रत्येक अध्यायात पूजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल एवढीच माहिती मिळाली. ही पूजा म्हणजे नेमकी काय आहे?महाराष्ट्रात ती इतकी प्रसिध्ह का?

शिवसेना - युद्धात हरले आणि तहातही हरले

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 12/11/2014 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
सुरूवातीपासून शेवटपर्यंत उद्धव ठाकर्‍यांनी व पर्यायाने शिवसेनेने अत्यंत चुकीची पावले टाकली आणि त्यातूनच आज शिवसेनेची अवस्था 'युद्धात हरले आणि तहातही हरले' अशी केविलवाणी झाली आहे. १५ वर्षे सत्तेपासून लांब राहिल्यावर सत्ता अगदी हातातोंडाशी येऊनही आपल्याच चुकीमुळे घास तोंडात जाताजाता हातातून पडून मातीत मिळावा आणि पुन्हा एकदा उपाशी रहावे लागण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. आणि ही वेळ शिवसेनेनेच स्वतःवर ओढवून घेतली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर लगेचच भाजपने जागावाटपाचा फॉर्म्युला बदलण्याची मागणी करायला सुरूवात केली होती. 'महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच असणार' असे त्यावेळी कै.

पवारावलंबी

लेखक गणेशा यांनी बुधवार, 12/11/2014 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
सामान्य काक (कार्यकर्ता, कावळा नाही) : केंद्रात नरेंद्र .. महाराष्ट्रात देवेंद्र , आठवले का काही . राम (अयोध्याचा नाही, आठवलेंचा) : आणि दूरुन स्मित हसतोय शरदचंद्र .. जमलेना मस्त ? काक : जमले आहे, पण उठा बाबा आता ? राम : का हो उठू ? काक : अहो उ. ठा. आणि बाबा यांचे काय ? असे बोललो. राम : थांबा मोदी नी त्या बद्दल काय बोलायचे सांगितले आहे ते पाहतो आणि मग बोलतो .. दादा : विसरू नका , आम्ही सर्व घड्याळामध्ये पाहून आणि तारखेनुसार काम करतो . काक : .ऑ ? दादा : आज तारीख १२. त्यात ११/१२/२०१४ बेरीज बघा बरोबर १२.

महाराष्ट्र - विश्वासदर्शक ठराव

लेखक धर्मराजमुटके यांनी बुधवार, 12/11/2014 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनं विधानसभेत ‘आवाजी शक्ती’ दाखवून देत ‘विश्वास’ जिंकण्याची किमया साधली आहे. मात्र शिवसेना आणि कॉंग्रेसने हा प्रकार नियमबाह्य असल्याचे म्हटले असून शिवसेनेने मतदान पुन्हा घ्यावे तर काँग्रेसने अल्पमतातलं हे सरकार घटनाविरोधी असून या सरकारच्या बरखास्तीच्या मागणीसाठी राज्यपालांकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे असे विविध बातम्या वाचून कळते. १. आवाजी मतदान काय आहे ? २. मतविभागणी कशी मोजतात ? ३. तसेच लोकसत्ताच्या एका बातमीनुसार हा मुद्दा तांत्रिक आहे की नैतिक एवढाच मुद्दा आहे त्यात कायदेप्रक्रियेचा संबंध येत नाही असे म्ह्टले आहे. ४.

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ४

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 12/11/2014 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या तीन डावातच दोन डाव निकाली निघालेत यापेक्षा जास्त उत्सुकता ताणणारे अजून काय असू शकते? आज चौथा डाव मॅग्नुस पांढर्‍या मोहोर्‍यांनी खेळणार. कोणती सुरुवात असेल ई४ का अजून काही? डाव सुरु व्हायला जेम्तेम एक मिनिट आहे चला बघूयात !

मला आवडलेली पुस्तके:विनोदी साहित्य

लेखक पुस्तकमित्र यांनी बुधवार, 12/11/2014 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी! अात्मचरित्रांच्या धाग्याला तुम्ही दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!या भागात अापल्या अावडत्या विनोदी पुस्तकांबद्दल बोलुया. जगण्याची मजा घ्यायची असेल,ताणतणाव विसरायचे असतील तर विनोदी साहित्य वाचण्यासारखा इलाज नाही.सूचक,मार्मिक विनोद,रोजच्या जगण्यातल्या विसंगतींवर बोट ठेवुन स्मितहास्य निर्माण करणा-या विनोदापासुन पोट धरुन हसायला लावणारे विनोद अशा सर्व प्रकारचं विनोदी साहित्य विविध पुस्तकांतुन अापण वाचलं असेल.त्याबद्दल इथे लिहुया!