ती... भाग ३
ती... भाग २:http://misalpav.com/node/29423
या सगळ्यावरून जर असं वाटत असेल की मला तिचा कधीच राग आला नाही, अगदीच गुडी गुडी होत सगळं तर तसंही नाही. ती अगदी सत्ता गाजवायची माझ्यावर. !
मी मोठी होत असताना माझं अस मित्रमैत्रिणीच एक जग होत. त्यावर ती आक्रमण करू पहायला लागली. आमचं कुठे जायचं ठरलं की म्हणायची ‘ सवी आणि मी बाहेर जाणार आहोत. ती येणार नाही.’
.. आईशप्पत!! हे काहीतरी भलतं व्हायला लागलं. मी आईपाशी चिडचिड करायला लागले. तिची सगळी परिस्थिती समजत असून. ती मला तिचाच ठेवा समजत होती आणि माझा विश्व बहरू पाहत होतं.
मिसळपाव