Skip to main content

साल्याने पेपर टाकलाय.......

लेखक सार्थबोध यांनी बुधवार, 03/12/2014 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
आय टी मध्ये राजीनामा देणे, या क्रियेला पेपर टाकणे असे म्हणतात, त्यावर हि कविता. साल्याने पेपर टाकलाय................... तो रोज ऑफिसला येतो वेळेत येतो; वेळेत जातो नऊ तास भरले नाहीत; तर चिंता करतो कमी भरले तास; तर नंतर भरून काढतो साहेबाने काम दिले; तर नाश्त्याला पण जात नाही साहेब जागेवर असताना; जागचा उठत नाही कितीपण महत्वाचे काम असो; साहेब गायब झाल्याशिवाय हा जागचा हालत नाही साहेब खुर्चीत यायच्या आत, जागेवर यायची सवय काही जात नाही जास्त सुट्या घेत नाही, घेतली तरी अप्रुव्हल घेतल्याशिवाय; कलटी टाकत नाही ओव्हर टाइम कधी मागत नाही कॉम्प-ऑफ कधी घेत नाही. मोबाईल वर फोन आला; तर साहेबासमोर बोलत नाह

एका नव्या इतिहासाची सुरुवात ( अंतिम )

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 03/12/2014 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसूत्र : एका नव्या इतिहासाची सुरुवात -१ एका नव्या इतिहासाची सुरुवात -२ एका नव्या इतिहासाची सुरुवात -३ एका नव्या इतिहासाची सुरुवात -४ नऊ महिने अगदी सुरळीतपणे पार पडले. तणावाच्या छायेखालूनही तिच्या गौर तनूचे असामान्य गर्भतेज लपत नव्हते. काळोखाचा पडदा दाट झाला आणि ज्या क्षणाची दोन्ही पातळ्यांवर उत्कंठापूर्ण प्रतीक्षा होती, तो अखेर येऊन ठेपला ! अकलिप्ताला प्रसववेदना सुरु झाल्या.

विंडोजमधील क्रॅपवेअर आणि ब्लोटवेअर

लेखक येकटा मऱ्हाटी मानुस यांनी बुधवार, 03/12/2014 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याचदा आपण क्रॅपवेअर आणि ब्लोटवेअर बद्दल ऐकतो, पण ते नक्की काय असतं असा प्रश्न पडतो. तर आज आपण विंडोजमधील क्रॅपवेअर आणि ब्लोटवेअर यांची माहिती घेउ. क्रॅपवेअर म्हणजे तुमच्या पीसीमध्ये तुमच्या कळत अथवा नकळत इंस्टाल झालेले प्रोग्राम्स. उदा. ब्राउझरमधील टूलबार्स, पीसी चालू झाल्यावर आपोआप सुरु होणारे काही बिनकामी प्रोग्राम्स आणि सर्वात भयानक, ब्राउझरमधील सेटींग बदलणारे प्रोग्राम्स. या क्रॅपवेअरचा तुम्हाला कसलाही फायदा होत नसतो.

मनात आले ते... तसे...

लेखक असा मी असामी यांनी बुधवार, 03/12/2014 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिपा वर लिहण्याचा पहिलाच प्रयत्न. आज सकाळी कार्यालय मध्ये येताना F.M. वरचे गाणे इतके डोक्यात गेले की मनातली गरळ ओकल्याशिवाय चैन पडनार नाही. F.M. वर गाणे लागले होते अंदर की सीटी मे मारो बम डोले ( कोण रे तो अश्लिल...अश्लिल..बोलत आहे). ह्या गाण्याच्या नक्कि काय शब्दरचना आहेत मला अजुन कळाले नाहि? काय ते गाणे काय ती शब्दरचना? दुसरे गाणे लागले होते मला राग येतो. ते गाणे चालु असताना जर तुम्ही झोपायचा प्रयत्न करत असाल तर हे गाणे नक्की hypnotise करुन तुम्हाला राग येत आहे असे वाटते. असो. अशी गाणी सकाळी कोणाला ऐकाला आवडतात?

द सिक्रेट- नवीन अंधश्रद्धा ?

लेखक पिंपातला उंदीर यांनी मंगळवार, 02/12/2014 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
अंधश्रद्धा या सर्व समाजांमध्ये कमी अधिक प्रमाणात आढळतात . म्हणजे भारत हा साप -हत्ती चा आणि मागासलेला देश आहे असे मानणाऱ्या युरोपिअन देशांमध्ये आणि अमेरिकेमध्ये पण अंधश्रद्धा भरभरून आढळतात . भारतात भानामती आणि अंगात येणे वैगेरे प्रकार होत असतील तर गोऱ्या लोकांमध्ये उडत्या तबकड्या , परग्रहवासी आणि dooms day वैगेरे विज्ञानाचा मुलांमा दिलेल्या अंधश्रद्धा जोरात आहेत . याचा एक दणकून पुरावा म्हणजे २१ नोव्हे . २०१२ च्या निमित्ताने उडालेला धुरळा . जग आता नष्ट होणार म्हणून अनेक लोकांची पळापळ सुरु झाली होती .

बिल्डिंग अ स्ट्राँग फाउंडेशन - पायांचे साधे, सोपे व्यायाम

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 02/12/2014 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
बाकी काही लिहीण्या आधी काही डिस्क्लेमर्स देत आहे. लेखन व्यायाम/व्यायामप्रकार विषयक आहे. तरीही, मी व्यायामतद्न्य, प्रशिक्षक इत्यादी नाही. माझ्या कुतुहलजन्य माहितीस मी इथे केवळ मांडत आहे. यास किंचितशी अनुभवाची किनार असली तरी 'स्वानुभवातून सांगतोय' म्हणण्याइतकी नाही. खाली दिलेले काय, किंवा कुठलेही व्यायामप्रकार एक तर स्वतःला सांभाळून, कुवत ओळखून वा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावेत. झालं. तर! आता मुद्द्याकडे वळतो. एक सुरेख क्वोट वाचलं होतं कुठेतरी.

निखळ विनोदाचा तारा निखळला

लेखक नाखु यांनी मंगळवार, 02/12/2014 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या संयत अभिनयाने व नर्मविनोदी भूमिकांनी परिचित "देवेन वर्मा" यांचे आज निधन झाले. त्यांना विनम्र आदरांजली. आजच्या ओढून-ताणून विनोदाच्या पार्श्वभूमीवर निखळ विनोदवीरांचे महत्व ठळकपणे समोर येते. त्यांच्याबद्दल आपल्या काही आठवणी (आवडत्या भूमिका/चित्रपट माहीती असल्यास) या आदरांजलीत समावेश करावी ही विनंती. मला त्यांचा "अंदाज अपना अपना" मधील छोटासा रोल पण लक्षवेधी अभिनय आवडला होता.

अभिनेता - "देवेन वर्मा "कालवश झाले.

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 02/12/2014 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी चित्रपटस सृष्टीतील एक संवेदनशील अभिनेता देवेन वर्मा यांचे आज र्‍हदयविकाराने सकाळी पुणे येथे निधन झाले. आपल्या सहज अभिनयाने त्याने रसिकांच्या मनाचा कोपरा काबीज केला होता. कॉमेडी ऑफ एरर्स वर बेतलेल्या "अंगुर" चित्रपटातील त्यांचा संजीवकुमारसोबतचा डबलर रोल मधला सहकलकार हा त्यांचा सर्वात भावलेला रोल. सिलसिला मधे "विद्यार्थी" या अमिताभ ला समजवणार्‍या मित्राचा रोल असो किंवा "रम्गबिरंगी" सिनेमात अमोलपालेकरला वेगवेगळ्या भूमीका निभवायला सांगणारा मित्र असो.