अंधश्रद्धा या सर्व समाजांमध्ये कमी अधिक प्रमाणात आढळतात . म्हणजे भारत हा साप -हत्ती चा आणि मागासलेला देश आहे असे मानणाऱ्या युरोपिअन देशांमध्ये आणि अमेरिकेमध्ये पण अंधश्रद्धा भरभरून आढळतात . भारतात भानामती आणि अंगात येणे वैगेरे प्रकार होत असतील तर गोऱ्या लोकांमध्ये उडत्या तबकड्या , परग्रहवासी आणि dooms day वैगेरे विज्ञानाचा मुलांमा दिलेल्या अंधश्रद्धा जोरात आहेत . याचा एक दणकून पुरावा म्हणजे २१ नोव्हे . २०१२ च्या निमित्ताने उडालेला धुरळा . जग आता नष्ट होणार म्हणून अनेक लोकांची पळापळ सुरु झाली होती . शेवटी नासा ला मध्ये पडून हे धादांत खोटे आहे असे निवेदन द्यावे लागले होते . तरी पण तो दिवस उलटे पर्यंत अनेक लोकांनी आपले 'जिझस ' पाण्यात बुडवून ठेवले होते . तर सांगायचा मुद्दा हा कि खरच अंधश्रद्धा या बाबतीत खरच 'काळ -गोर ' (No pun intended ) करता येत नाही .
मला 'द सिक्रेट ' या प्रकरणाचा शोध 'चित्रलेखा ' मासिक वाचताना लागला . चित्रलेखाने चक्क या विषयावर कवर स्टोरी केली होती . काय आहे हे प्रकरण ? Rhonda Byrne या लेखिकेने हे पुस्तक लिहिले आहे . याच विषयावर एक फिल्म पण आहे . तू नळी वर तिचा काही भाग उपलब्ध आहे . तर या पुस्तकात Rhonda ने एक नियम मांडला . 'The Law of Attraction ' (आकर्षणाचा नियम ?). Rhonda च्या मते हा नियम फ़क़्त काही ठराविक लोकांनाच माहित होता . यात मोठमोठे महाराजे , कलाकार , सेनानी आणि मानवी इतिहासाला वळण देणार्या व्यक्तींचा समावेश होता . पण Rhonda च्या मते हा मानवी जीवनाला वेगळे वळण देणारा आणि मानवाच्या सगळ्या आशा आंकाक्षा पूर्ण करणारा नियम तिला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे म्हणून तिने हे पुस्तक लिहिले होते . हा The Law of Attraction 'असे सांगतो कि माणूस हा सकारात्मक विचारांच्या मदतीने आपल्याला पाहिजे ते म्हणजे भरपूर संपत्ती , प्रेम , सुदृढ तब्येत वैगेरे मिळवू शकतो . वर वर तर हे विधान /नियम निरुपद्रवी आणि खर वाटू शकत . पण ग्यानबाची मेख अशी आहे कि या नियमाला पूर्ण पुस्तकात वैज्ञानिक नियमांचं अधिष्ठान देण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे . त्यासाठी Placebo Effect च्या मागचे कार्यकारण भाव आणि Quantum Physics चे नियम याचे दाखले देण्यात आले आहेत . म्हणजे एका साध्या नियमाला तो एक त्रिकालाबाधित नियम आहे असे सिद्ध करण्याचा खटाटोप . म्हणजे या पुस्तकात वजन कसे कमी करावे किंवा घातक रोगांपासून The Law of Attraction ' वापरून मुक्ती कशी मिळवावी यावर वेगळे प्रकरण आहे . त्यावर अनेक तज्ञांनी टीका केली . म्हणजे सकारात्मक विचार करणे हि चांगली गोष्ट आहे पण दुर्धर रोगाच्या शेवटच्या टप्प्यात असणारा माणूस The Law of Attraction ' वापरून बरा होऊ शकतो का ? अनेक वैज्ञानिक आणि Medical Experts नी हे पुस्तक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईक याना खोटी आशा लावते अशी टीका केली आहे .
साहजिकच या पुस्तकावर आणि The Law of Attraction ' वर टीकेची राळ उडाली . अनेक लोकांनी यावर टीका केली आहे कि या नियमावर विसंबून राहणारे आणि प्रत्येक समस्येवर 'Instant Solution ' शोधू पाहणारे लोक आपल्या आयुष्यातील समस्येच्या root cause पर्यंत जाण्याच टाळतात आणि हे त्यांच्यासाठी धोकादायक आहे .आता या पुस्तकातल्या Quantum Physics च्या दाखल्या बद्दल Rhonda Byrne ने विज्ञान या विषयाचा कधी अभ्यास पण केला नव्हता . तरी पण तिच्या दाव्यानुसार The Law of Attraction ' वापरून अतिशय क्लिष्ट अशा Quantum Physics चे नियम समजून घेतले . तिच्या या दाव्यावर सडकून टीका होणारच होती आणि तशी ती झाली देखील .
शिवाय आपल्यासोबत घडणारया सर्व वाईट घटना आपणच नकारात्मक विचार करून आपल्याकडे आकर्षित करून घेतो हा The Law of Attraction चा व्यत्यास पण तितकाच धोकादायक . म्हणजे दिल्ली बलात्कार प्रकरणातील बलात्कारित मुलीने नकारात्मक विचार करून तो बलात्कार ओढवून घेतला होता का ? किंवा लातूर मध्ये झालेल्या भूकंपात मरण पावलेल्या किंवा सर्वस्व गमावलेल्या लोकांनी हा भूकंप नकारात्मक विचार करून घडवून आणला होता का ? साहजिकच victim असणाऱ्याला दोषीच्या पिंजर्यात हा नियम उभा करतो .
पाश्चात्य लोकांकडून आलेलं सगळ भारी अस मानून चालणार्या आपल्याकडे पण या पुस्तकाचा खप चिक्कार वाढला आहे . माझे काही मित्र पण यात आले . ते कायम आम्ही सध्या किती आनंदी आहोत आणि सकारात्मक आहोत हे दाखवत असतात आणि कुठलाही प्रश्न शेयर करायला गेल कि Think Positive ' चा डोक्यात जाणारा सल्ला देतात . इतकेच नाही तर आम्ही द सिक्रेट वाचल आहे हे status of symbol समजणाऱ्या लोकांचा संप्रदाय आपल्याकडे पण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे . अनेक बापू -महाराज -साध्वी यांचे संप्रदाय कमी होते कि काय म्हणून यात या नवीन cult ची भर . आता तर The Law of Attraction चे दाखले अनेक महाराज लोक पण आपल्या प्रवचनात द्यायला लागले आहेत . हा नियम वापरून प्रबोधन करणार्या Motivational Speakers चे तांडे पण तैयार झाले आहेत . हो आणि ते Speakers आपल्या प्रबोधनासाठी भरभक्कम फी आकारतात . The Law of Attraction वापरून पैसे
कमवत नाहीत . यालाच विरोधाभास म्हणतात कि काय ?
वाचने
19659
प्रतिक्रिया
75
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोचक
ह्मम
किसी चीझ को दिल से चाहो तो
In reply to ह्मम by योगी९००
लाबंलचक डॉयकॉल आहे तो .
In reply to किसी चीझ को दिल से चाहो तो by सतिश गावडे
डॉयकॉल
In reply to लाबंलचक डॉयकॉल आहे तो . by जेपी
मला तर हा प्रकार "असेल हरी तर
"द सिक्रेट" अतिशय विनोदी
+१
In reply to "द सिक्रेट" अतिशय विनोदी by सतिश गावडे
स्पा पुतण्या, माझं एक
In reply to +१ by स्पा
आपल्याकडच्या एकाहून एक सरस
In reply to स्पा पुतण्या, माझं एक by सतिश गावडे
खुळचट कल्पनांवर विश्वास
In reply to आपल्याकडच्या एकाहून एक सरस by स्पा
+१
In reply to "द सिक्रेट" अतिशय विनोदी by सतिश गावडे
(No subject)
In reply to +१ by हाडक्या
(No subject)
In reply to +१ by हाडक्या
I have experienced the truth
In reply to "द सिक्रेट" अतिशय विनोदी by सतिश गावडे
कामधंदा सोडून बसावं म्हणतो !
बरोबर आहे. नुसता कृतीशिवाय
अंधविश्वास किंवा अंधश्रद्धा
जोपर्यंत कर्माचा त्याग न करता
what the bleep do we know आणि
मी साधारणतः 2009ला या
In reply to what the bleep do we know आणि by चंद्रनील मुल्हेरकर
तीव्रता????? अहो एँजोलीना आणि
In reply to मी साधारणतः 2009ला या by हाडक्या
समजले =))
In reply to तीव्रता????? अहो एँजोलीना आणि by चंद्रनील मुल्हेरकर
एँजोलीना आणि ऐश्वर्याला
In reply to समजले =)) by बॅटमॅन
अगदी अगदी....अशा भावना
In reply to एँजोलीना आणि ऐश्वर्याला by टवाळ कार्टा
या मागणीस बॅट्यास अनुमोदन..
In reply to अगदी अगदी....अशा भावना by बॅटमॅन
अगदी अगदी....अशा भावना
In reply to या मागणीस बॅट्यास अनुमोदन.. by हाडक्या
अगदी अगदी....अशा भावना डीटेलमध्ये सांगण्याची आदर्श जागा म्हणजे मचाक. मिपाचा हा विभाग सुरू जाहल्यास बाकी प्रतिसाद एकदम भरभरून मिळेलफक्त बोलाची कढी,कुनी पुढाकार घेत नाय.काय केलं पायजे ते बोला की मग.
In reply to अगदी अगदी....अशा भावना by जेपी
त्याचे काय झाले असेल की
In reply to तीव्रता????? अहो एँजोलीना आणि by चंद्रनील मुल्हेरकर
@हाड्क्या अगदि अगदि. हेच
प्रतिक्रिया दिल्यबद्दल
प्लॅसिबो..
सकारात्मक विचार करा हि
In reply to प्लॅसिबो.. by योगी९००
माझ्यामते भुकंप, बलात्कार
In reply to सकारात्मक विचार करा हि by पिंपातला उंदीर
मला एवढचं कळलं ..
In reply to सकारात्मक विचार करा हि by पिंपातला उंदीर
मी फक्त सकारात्मक विचार करुन
कोणाचे?
In reply to मी फक्त सकारात्मक विचार करुन by खटपट्या
स्वतःचेच. वाढवायचे असेल तर...
In reply to कोणाचे? by टवाळ कार्टा
@टवाळ कार्टा कोणाचे? >>>
In reply to कोणाचे? by टवाळ कार्टा
मला सिक्रेट सारखी पुस्तके
मराठी शब्द.
In reply to मला सिक्रेट सारखी पुस्तके by मृत्युन्जय
अवांतर -ज्या डेल कार्नेजी
In reply to मला सिक्रेट सारखी पुस्तके by मृत्युन्जय
अरेरे. लोका सांगे तत्वज्ञान
In reply to अवांतर -ज्या डेल कार्नेजी by पिंपातला उंदीर
काहि लोक अस म्हनतात काहि लोक
In reply to अरेरे. लोका सांगे तत्वज्ञान by मृत्युन्जय
ह्म्म..
लेख मनापासुन पट्ला
थिन्क पोझीतीव्ह
कुटुंबात ह्या थिंक पॉजीटीव्हचे बरेच फायदे आहेत.
In reply to थिन्क पोझीतीव्ह by अत्रन्गि पाउस
५ व्या दिवशी बायको म्हणेल आज
In reply to कुटुंबात ह्या थिंक पॉजीटीव्हचे बरेच फायदे आहेत. by मुक्त विहारि
शिंच्या, तुला असेच उत्तर मिळणार....
In reply to ५ व्या दिवशी बायको म्हणेल आज by टवाळ कार्टा
बायको आवडत नाही.......थिंक
In reply to शिंच्या, तुला असेच उत्तर मिळणार.... by मुक्त विहारि
तुम्ही ४था प्रश्र्न नीट वाचलेला दिसत नाही...
In reply to बायको आवडत नाही.......थिंक by खटपट्या
ओके,
In reply to तुम्ही ४था प्रश्र्न नीट वाचलेला दिसत नाही... by मुक्त विहारि
अरे बाबा....
In reply to ओके, by खटपट्या
ठीकै !! येतो तुमच्या बाबांकडे
In reply to अरे बाबा.... by मुक्त विहारि
आता व्य.नि. वगैरे नकोच
In reply to ठीकै !! येतो तुमच्या बाबांकडे by खटपट्या
आता व्य.नि. वगैरे नकोच.डायरेक्ट बाबांचा सल्लाच देवू.@मुवि- चालु करा.आमाला झाला फायदा सल्याचा. इतरांना पण होईल.बटाटेवड्यांबरोबर चिंचेची चटणी
In reply to अरे बाबा.... by मुक्त विहारि
भाऊ....
In reply to बटाटेवड्यांबरोबर चिंचेची चटणी by सतिश गावडे
(No subject)
In reply to शिंच्या, तुला असेच उत्तर मिळणार.... by मुक्त विहारि
गालिब आठवतो
?
In reply to गालिब आठवतो by सुधीर
दोन प्रकारची माणसं
In reply to ? by क्लिंटन
तेच
In reply to दोन प्रकारची माणसं by सुधीर
:)
In reply to तेच by क्लिंटन
सकारात्मक विचार करणे हि
>>सध्या दिवगंत कलाकार कुलदीप
In reply to सकारात्मक विचार करणे हि by पिंपातला उंदीर
निव्वळ बकवास!!
या पुस्तकासारखा वागलो, अभ्यास
In reply to निव्वळ बकवास!! by आगाऊ म्हादया......
भारि प्रतिसाद
थींक पॉझीटिव्ह
+१
In reply to थींक पॉझीटिव्ह by अमित खोजे
>>> बाकी अति विज्ञाननिष्ठ
In reply to +१ by क्लिंटन
@अमीत राव- मस्त प्रतिसाद
इंटरेस्टिंग!
अश्या पुस्तकांकडे एक