Skip to main content

खारघर टोल नाका

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 06/01/2015 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
सायन - पनवेल - १० पदरी मार्ग अंतर पार करण्यास लागणारा कालावधी - १ तास अधिक टोल नाक्यावर लागणारा वेळ वाशी टोल नाका - अर्धा तास खारघर टोल नाका - अर्धा तास एकूण वेळ - २ तास एवढ्या वेळेत तर पूर्वी आम्ही लोणावळ्याच्या पुढे पोचायचो कुठे नेऊन ठेवलात ' वेळ ' माझा … । सत्तेत आल्यावर आम्ही टोल बंद करू , खारघर टोल नाका कदापि चालू होऊ देणार नाही इ . आश्वासने देऊन निवडून आलेल्या भाजपा ( सेना ) सरकारने आज अखेर खारघर टोल नाका चालू केला . टोलनाक्याच्या पलीकडील ५ गावाना ( पनवेल, कळंबोली, कामोठे, कोपरा , खारघर ) सूट मिळणार असे कळते .

ओंकारेश्वर प्रवासाचे निमित्ताने-एकूण ४ पैकी भाग ४

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 06/01/2015 10:18 या दिवशी प्रकाशित केले.

पुलावरून दिसणारे ओंकारेश्वर मंदिर आणि पुलाच्या उजवीकडील तेजाजी जाट ह्यांचा पुतळा

गीत तारकांचे

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 06/01/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
प्राथमिक चाल लावलेले माझे हे भावगीत, इथे शब्द सादर करीत आहे. जसा भास होतो उरी चांदण्यांचा विसावा तसा मी मागतो सांजवेळी ll १ ll मनी गर्द वेळा तुझ्या आठवांच्या उसासा दिलासा रात्र देऊनी जाई ll २ ll तुझा श्वास माझ्या मनातून झरता शब्द बोल ओठी तुझ्या भावनांचे ll ३ ll गंध सोबतीचे मग हवेतून विरता सखे गीत गावे तुझे तारकांचे ll ४ ll - सार्थबोध http://www.saarthbodh.com/2015/01/blog-post.html

मदत...Internship.!

लेखक उगा काहितरीच यांनी सोमवार, 05/01/2015 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, नुकतेच पुणे विद्यापिठातुन MCA(अभियांत्रीकी) या पद्व्युत्तर पदवीचे ५ सत्र पुर्ण केले. विद्यापिठाने सहाव्या सत्रासाठी विषय वगैरे न ठेवता पुर्ण वेळ Internship असा कार्यक्रम आखला आहे. यासाठी आम्हा विद्यार्थ्यांनी कंपनी मध्ये राहुन काम शिकणे वगैरे अपेक्षीत होते. यामध्ये विद्यार्थ्यांसोबत कंपन्यांचापण फायदा होता कारण त्यांना अल्प मानधनावर(stipend)किंवा फुकट काम करायला व्यक्ती मिळते.पण मागील २-३ वर्षापासुन लहानमोठ्या कंपन्या या संधीचा फायदा उठवुन विद्यार्थ्यांकडुन काम करुन घेता घेता training fees च्या नावाखाली ५००० ते ५०,००० रुपये उकळत आहेत.

ट्रॅप - ५

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 05/01/2015 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीतील साऊथ ब्लॉक परिसरातील ऑफीसमधल्या आपल्या डेस्कवर बसून कॅप्टन नितिन देशमुख आपल्या समोरील कागदाच्या कपट्याकडे रोखून पाहत होता. आतापर्यंत किमान तीनवेळा त्याने तो कपटा वाचला होता. त्यावर एकच वाक्य लिहीलेलं होतं. The Man on the terrace winked at the lady beside and thrown flowers at her! एखाद्या सामान्य माणसाने ते वाक्यं वाचलं असतं तर त्याला एखाद्या कथेतील प्रसंगाचं वर्णन वाटलं असतं. पण कॅप्टन नितिनला मात्रं त्या वाक्याचा अर्थ बरोबर कळला होता. "गुड मॉर्निंग कॅप्टन!" एक मधुर स्वर त्याच्या कानावर आला. त्यासरशी त्याची समाधी भंग पावली. त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं.

घर- घर

लेखक चिनार यांनी सोमवार, 05/01/2015 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांपासून स्वत:साठी घर शोधण्याची मोहीम सुरु आहे. आजकाल घराला 'Flat' असे म्हणतात. पुण्यासारख्या शहरात जर Flat बुक केला असेल तरच त्या माणसाने आयुष्यात काहीतरी मिळवलय असे मानले जाते. कारण भेटणारा प्रत्येक दुसरा माणुस तुम्हाला ' काय, कसे सुरु आहे? ' हे विचारून झाल्यावर 'काय Flat वगैरे बूक केला कि नाही अजुन? 'असा प्रश्न विचारून जातोच.आणि त्याचे उत्तर जर 'हो' असेल तर पहिल्या प्रश्नाच्या उत्तराला काहीही अर्थ उरत नाही. Flat घेतल्यावर माणसाचे 'बरं चाललंय ' हे उत्तर खरं असुच शकत नाही. तो बिचारा ईएमआय आणि डाउन पेमेण्ट या 2 शब्दान्नी पुरता मेटाकुटीला आलेला असतो.

माझेच (म्हणणे) खरे

लेखक नाखु यांनी सोमवार, 05/01/2015 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
वि.कुं ची क्षमा मागून्.आणि खरे काकांना दंडवत घालून (शीर्षकात खरे शब्द वापरू दिल्याबद्दल) वाचनापूर्वी (गर्भीत) सूचना :काव्यरस व लेखन विषय नजरेखालून घालावा नंतर पश्चाताप नको. नेहमी प्रमाणे यावरील खुलाश्यास वा स्पष्टीकरणास आम्ही बिलकुल बांधील नाहीत तेव्हा अपेक्षा करून मुखभंग करून घेऊ नये. :-| :| =| :-| वि.सू.

अंधार क्षण भाग ५ - निष्ठा (लेख २४)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 05/01/2015 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण भाग ५ - निष्ठा मध्ययुगीन युद्धांमध्ये आणि दुस-या महायुद्धामध्ये असलेला एक अत्यंत महत्वाचा फरक म्हणजे धर्म हा मुद्दा दुस-या महायुद्धात अजिबात महत्वाचा नव्हता. नाझींच्या ज्यू द्वेषाचं कारण धार्मिक नसून वांशिक होतं. हिटलरला तर कुठल्याही धर्माबद्दल आस्था नव्हती. पण धार्मिक मुद्दे जरी महत्त्वाचे नसले तरी एखाद्या विचारसरणीवर पराकोटीची निष्ठा हे दुस-या महायुद्धाचं वैशिष्ट्य होतं. एस्. एस्. प्रमुख हेनरिख हिमलरसारख्या कट्टर नाझींसाठी सोविएत रशियाविरूद्ध पुकारलेलं युद्ध म्हणजे कम्युनिझम किंवा साम्यवाद आणि राष्ट्रीय समाजवाद या दोन विचारसरणींमधला टोकाचा संघर्ष होता.

ओंकारेश्वर प्रवासाचे निमित्ताने-एकूण ४ पैकी भाग ३

लेखक नरेंद्र गोळे यांनी सोमवार, 05/01/2015 08:22 या दिवशी प्रकाशित केले.

रूपमती महालातील जलाशयातील वरच्या कमानींचे प्रतिबिंब. बाजबहाद्दुर महालातील पुष्करणी.

आजचा मुख्य स्थलदर्शनाचा कार्यक्रम मांडवगड उपाख्य मांडूचा होता. त्यामुळे आता नाश्ता करून आम्हाला निकडीने प्रवासास सुरूवात करायला हवी होती. तासा दीड तासातच आम्ही मांडूस पोहोचलो. किल्ल्याचे सर्वसारणतः तीन भाग पडतात. रेवाकुंड ह्या तिसर्‍या खंडापासून आम्ही सुरूवात केली.

लोकमान्य - एक युगपुरुष

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी सोमवार, 05/01/2015 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
लोकमान्य बाळगंगाधर टिळक. काही भारतीयांची नावे घेतली की माझे मस्तक आपोआप आदराने झुकते, त्यातलं हे महत्त्वाचं नाव. लोकमान्य. दुसरं काहीही नाही. संत नाही, महंत नाही, महात्मा नाही, देवमाणूस नाही, किंवा तत्सम काहीही नाही. लोकमान्य. लोकांना मान्य असलेला तो लोकमान्य. बास्स.