क्लासमेट्स - दर्जा!!
कॉलेजच्या म्युझिक डिपार्टमेंटच्या उद्घाटनासाठी जवळपास वीसेक वर्षांनी एकत्र भेटलेले क्लासमेट्स.. बर्याच वर्षांनी एकमेकांना भेटण्याची उत्सुकता, नोस्टॅल्जीया, जुने चेहरे इतकया वर्षांनी दिसल्यावर उसळून आलेल्या आठवणी, ज्याच्या नावने हे म्युझिक डिपार्टमेंट चालू होतंय, त्या कायमच्या दुरावलेल्या मित्राच्या आठवणीनी हळवी झालेली मनं..
अशातच आगमन होतं सत्याचं. सत्या.. कॉलेजचा एक काळ गाजवलेला, रुबाबदार व्यक्तिमत्वाचा सत्या. ज्याच्या स्टाईल आरशासमोर उभे राहून मुलं कॉपी करायचा प्रयत्न करायची, तो कॉलेजचा हीरो सत्या. ज्याच्या आवाजात एका हाकेत कॉलेज बंद पाडण्याची ताकद होती, असा सत्या.
मिसळपाव