गुंतता ह्रदय हे.....
लेकी सुनांच्या संसारात आईवडील मायेपोटी गुंतलेले असतात. एकमेकांना असलेल्या व्यावहारिक गरजांचे धागे जरी ह्या गुंतण्यात असले तरीही, आपल्या माणसांविषयीच्या प्रेमाचे रेशमी धागेच ह्या भावनिक गुंतण्यांत अधिक असतात. बरेचदा असे दिसते की नात्यांचे रेशमी बंध व्यवहार, व्यवसायांच्या काट्यांमधे अडकून दुखावले जातात. मग तयार होतो एक विचित्र गाठींचा गुंता......
माझ्या गप्पा ह्या लघुकथेमधे मला असेच काहिसे दाखवायचे होते. पण ते इतक्या सगळ्या शब्दांच्या गुंत्यामधे न अडकता. एखाद्या कवितेसारखे... फ़क्त काहीतरी जाणीव देत देत, पण अबोल.
ह्या कथेवर आलेले प्रतिसाद वाचून असे वाटले, की सगळे पैलू पूर्णपणे व्यक्त न करता एखादा मुद्दा मांडला तर खूप काही चर्चा करण्यायोग्य विषय झाकले जातात. केवळ जेवढे लिहिले आहे त्यावरून निश्कर्ष काढले नात्यांच्या दोन्ही बाजुंवर अन्याय होऊ शकतो. जीवन म्हणजे एखादी कविता नाही, तर मानवी संबंधांमधून निर्माण झालेली एक अत्यंत गुंतागुंतीची रचना असते. ही रचना समजाऊन घेण्याचा प्रयत्न साहित्य, समाजशास्त्र, अर्थशास्त्र अशा विविध मंचांवर सतत होत असतो. पण अजूनही ही जीवनाची रचना पूर्णपणे उलगडली गेलेली नाहीये.
नमनाला घडाभर तेल झाले. आता थोडक्यांत ह्या काथ्याकुटाचा उद्देश सांगतो. मुलाबाळांच्या संसारात वयस्कर आईवडिलांची भुमिका काय? व्यावहारिक आणि व्यावसायीक गरजांच्या रेट्यांत माणसांची मने सांभाळली जातात काय? आईवडिल लेकीसुनांबरोबर रहातात, त्याचे कारण एकमेकांच्या गरजा हे असेल किंवा नसेल. एकत्र रहाणे नेहमीसाठी अथवा अल्पकाळ असेल. पण ह्या एकत्र रहाण्यात मायेची भूक सगळ्यांनाच असते की नाही? की केवळ वयाने लहान असलेल्यांनाच ती असते?
माझ्या गोष्टीतली सिमा ही अशीच मायेच्या भुकेने व्याकूळ झाली आहे. आपले इथे असणे हे मुलांसाठी एक केवळ सोय म्हणून आहे? एक माणूस म्हणून आपल्या काय गरजा आहेत हे समोरच्याला जाणवते तरी की नाही? अगदी सिनेमातल्या सारखे मोलकरीण म्हणून वागवले नाही, तरी एक साधा संवाद जर घरातल्या माणसांबरोबर होत नसेल, तर फ़र्निचर आणि माणूस ह्यांत फ़रक काय राहिला? पैसा ह्यांनी खूप मार्मिक प्रतिसाद अशाच अंगाने दिला आहे.
वयस्क आईवडिलांनी लेकीसुनांच्या संसारात कसे वावरावे / वावरू नये?
सगळ्यांनाच असे काय करता येईल की जेणेकरून मने दुभंगली न जाता रेशीमबंध मजबूत होतील?
ह्रदय किती खोल गुंतू द्यावे की घुसमट न होता प्रेमळ रस चाखता येईल?
“छाप” “काटा” ह्या दोन्ही बाजू काय म्हणतांत?
विषय विशाल आणि बहुचर्चित आहे. पण अजूनही नेमके काय करायला हवे ह्याचे निदान भल्याभल्यांनाही होत नसते. अर्थात “One size fits all” असे सर्वसमावेशक उत्तर अपेक्षितही नाही आणि ते तसे नसते देखील. पण तरीही ह्या निमित्याने ह्याचा (भलेही पुन्हा एकदा) उहापोह होऊन काही मार्गदर्शक खुणा जरी (पुन्हा) बाहेर आल्या तरीही नसे थोडके.
वाचने
3785
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
तुम्हाला नक्की ओल्ड एज प्रॉब्लेम हा मुद्दा मांडायचा आहे का?
In reply to तुम्हाला नक्की ओल्ड एज प्रॉब्लेम हा मुद्दा मांडायचा आहे का? by मुक्त विहारि
नक्की काय?
दोन्ही चा संगम असला पाहिजे
In reply to दोन्ही चा संगम असला पाहिजे by चौकटराजा
भारतीय संस्कृती ने आपल्याला
In reply to भारतीय संस्कृती ने आपल्याला by अरुण मनोहर
ह्या !
माझा जो प्रतिसाद होता तो
चला वेळ मिळालाचे आहे तर, थोडी भर आमच्याकडून...
In reply to चला वेळ मिळालाचे आहे तर, थोडी भर आमच्याकडून... by मुक्त विहारि
मुवि,
एकत्रित कुटुंब पध्दतीला विरोध
In reply to एकत्रित कुटुंब पध्दतीला विरोध by अजया
+१
चांगला विषय
आंदोलने .....