Skip to main content

फायर एक करणे २

लेखक अत्रन्गि पाउस यांनी बुधवार, 11/02/2015 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
फायर एक करणे १ मागील धाग्यातील प्रतिसादांवरून निघालेल्या काही मुद्द्यांचा उहापोह .
  • कितीही काळजी घेतली तरी मुलाखत पार पाडून नोकरी मिळवणे आणि प्रत्यक्ष मैदान गाजवणे ह्यात फरक पडू शकतो त्यामुळे मास रिक्रूटमेंट मध्ये असे 'पाशिंजर लोकस' घुसतात.
  • एच आर लोकांना मागे जाऊन अमुक पाशिंजर का / कसा आला हे माहित करून घेणे फारच जिकीरीचे असते आणि कुणी फार फंदात पडत नाही
  • नोकरी वरून डच्चू दिल्यावर लेबर कोर्टात जाऊन तक्रार केली तर भलतीच शुक्लकाष्ठ लागतात मागे ...त्यामुळे एच आर लोकस पूर्ण खात्री करून मगच फायनल क

मौनात दडले क्रौर्य

लेखक गणेशा यांनी बुधवार, 11/02/2015 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
कोण येथे गुरुवर्य ? खितपत पडले शौर्य अहिंसेचे पुतळे मानतो मौनात दडले क्रौर्य झाकोळला स्पष्ट अंधार मुखवट्यात गळले धैर्य स्त्रीत्वाची ताकद जाणतो खुऱाड्यात लुटले कौमार्य घुंगूरपाण्यात डुबले नेत्र कळले कोणास सूरगांभिर्य दगडात ईश्वर जाणतो देवत्व शोधतो सूर्य भावनांचा गच्च बाजार मनात हरवले माधुर्य वैराग्यात निरपेक्षता मानतो अहंकारातून घडते कार्य ---- शब्दमेघ
काव्यरस

भाज्यांचे लोणचे

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 11/02/2015 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीत फेब्रुवारी महिना सुरु होताच वादळ आणि धुक्याचे राज्य संपते. सूर्याचे तेज जाणवू लागते. या मौसमात बाजारात भाज्याही भरपूर असतात. भाज्यांचे लोणचे घालण्यासाठी हा मौसम आदर्शाच. दरवर्षी सौ. या मौसमात भाज्याचे लोणचे एक- दोनदा तरी घालतेच. गेल्या रविवारी भाज्यांचे लोणचे घातले होते. त्याचीच कृती. साहित्य: भाज्या: फुलगोबी १किलो ,गाजर१/२किलो ,शलजम १/२किलो, अदरक १०० ग्रम, लहसून १०० ग्रम मसाले : सौंप (बडीशेप) ( २ चमचे) , मेथी दाणे (१ चमचा), हिंग १/४ चमचे, मोहरीची डाळ १ वाटी, तिखट १/२ वाटी, हळद १/४ वाटी, काळी मिरी ५-६ दाणे, तेल १ वाटी, सिरका १ वाटी, गुड १/2 वाटी.

काथ्याकुटातून रसग्रहण

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 11/02/2015 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
(काल्पनिक) आज टीम लंचला बाहेर पडलो, टेबलावरची महत्वाची डायरी ड्रोवरमधे लॉक करायची विसरलो. टीमबरोबर हॉटेलमधे गेल्यावर जेवताना लक्षात आलं, ऑफीसात फोन करून कोणाला तरी सांगाव म्हटलं, तर जवळ बसणारे सगळे इथे हॉटेलात, धाकधूक होतीच, पण म्हटलं जाऊ दे, हा लंच तर एन्जोय करू. लंचवरून परत आलो तर डायरी टेबलावरच होती पण, माझ्या डायरीच्या ऐका पानावर कोणीतरी लिहून ठेवलं होत. म्हटलं मिपाकरांना सुद्धा ते शेअर करू, प्रतीक्रीयामधून काथ्याकुटातून रसग्रहण तरी होईल.

नेमक काय चुकतंय?

लेखक शब्दबम्बाळ यांनी बुधवार, 11/02/2015 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
काल मला ती म्हणाली तुमचं माझ्याकडे दुर्लक्ष होतंय, संसाराच्या गाड्यात माझं एकटीच तिरकिट होतंय, तिचं देखील बरोबर आहे मला हे पटतंय, पण काहीच कळत नाही नेमकं काय चुकतंय… कधीतरी मी तिचा हात प्रेमाने हातात घेतो, अलगदपणे मग तिला माझ्या मिठीत घेतो, जेव्हा ती पाघळत असते मिठीत माझ्या, नेमक तेव्हाच गॅसवरच दुधसुद्धा उकळतंय, काहीच कळत नाही नेमकं काय चुकतंय… रात्रीच्या वेळी मी थोडा निवांत बसतो, तिच्याकडे पाहून मग छानसा हसतो, जेव्हा ती हि हसते गालात हळूच, नेमक तेव्हाच कार्ट आमचं भोकाड पसरतंय, काहीच कळत नाही नेमकं काय चुकतंय… कधीतरी मी हिच्यासाठी मुद्दाम सुट्टी काढतो, कुठेतरी फिरवावं हिल
काव्यरस

भूमी अधिग्रहण कायदा

लेखक कपिलमुनी यांनी बुधवार, 11/02/2015 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
भूमी अधिग्रहण कायदामध्ये सध्याच्या केंद्र सरकारने काही बदल केले आहेत. त्यामधले मुख्य बदल खालीलप्रमाणे १. पूर्वी संपादनासाठी 70 टक्के शेतकऱ्यांची संमती बंधनकारक होती . ही अट आता काढून टाकण्यात आली आहे. यामुळे विरोध असतानाही सरकार बळजबरीने खाजगी / सरकारी प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेउ शकते . २. संपादन केलेली जमीन त्या प्रोजेक्टसाठी जर ५ वर्षात वापरली गेली नाही तर ती जमीन मूळ शेतकर्‍याला परत करण्यात यावी . ही अट काढून टाकली आहे. या मुळे जमीनी फक्त संपादीत करून योग्य भावाची वाट बघत पड ठेवण्याचे प्रमाण वाढेल. आणि शेतकर्‍याकडे असलेला जमिनीचा ट्क्का अजून कमी होइल.

आणिक एक आरक्षण

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 11/02/2015 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
दोन दिवसापूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी होती; 'शेअर टॅक्सी मधे पुढची पॅसेंजर सीट महिलांसाठी आरक्षित.' त्यावर अनेक प्रतिक्रिया होत्या. सामाजिक संस्था, प्रवासी संघटना, इत्यादींनी अगदी स्वागतार्ह निर्णय वगैरे संबोधून या गोष्टीचं कौतुक केलं होतं. ट्रेनचे डबे झाले, बसच्या सीट झाल्या आता टॅक्सीच्याहि सीट महिलांसाठी आरक्षित; किंवा राखीव. यामागचं कारण असं की मागच्या सीट वर इतर दोन पुरुष प्रवाशांबरोबर (अर्थातच अनोळखी) प्रवास करताना त्यांना जो त्रास होतो तो होऊ नये. सद्ध्याच्या एकंदरित सामाजिक मानसिकतेकडे आणि घडणा-या घटनांकडे बघता हे अगदी योग्य आणि रास्त वाटतं.

वैभवशाली वाडा जुना

लेखक प्रमोद देर्देकर यांनी बुधवार, 11/02/2015 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
वैभवशाली अस्तित्वाच्या उध्वस्त खुणा, पदोपदी सांगत असतो तो वाडा जुना, ढासळलेल्या भिंती अन ओसाड जोतं, गवताच्या पातीशी आता जडलंय नातं, दरवाजांच्या बिजागरांचे ते भयाण किरकिरणं, अन वाळवीच्या रांगांनी ते वासे पोखरणं, कोळयांची जळमटं अन धुळिचे साम्राज्य, असाह्य कुरकरणं, जिन्यातल्या पायर्‍यांचं कित्येक आप्तांची वंशावळ अंगावर खेळवली यानं, डावपेच, शिकार, फितुरी सगळं पाहिलंय यानं, आत्मक्लेषाच्या खुणा झेलत जगतोय जिणं, मातीशी संग होताच, शेष ते ना राहील भग्न, कोणा एके काळी झडत असतील नौबती, अन कोस कोस असेल त्याच्या श्रिमंतीची महती, आज खंगला असेल, मोडकळीस आला असेल, तरीही, वैभवशाली अस्तित्वाच्या उध्व

उल्लेखनीय मराठी साहित्याचा पुस्तक-परिचय करुन हवा

लेखक माहितगार यांनी बुधवार, 11/02/2015 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
केवळ मराठी भाषा दिवस म्हणून नव्हे तर मराठी भाषेसंबंधी बरच काही चांगल या फेब्रुवारी महिन्यात होत असतं. फेब्रुवारी महिन्याचा आणि मराठी भाषेचा निश्चीत काहीतरी ऋणानुबंध असला पाहीजे. भालचंद्र नेमांडेंच्या बद्दलच्या धागाचर्चेत आपण कृपया नेमाडेंच्या कादंबर्‍यांबद्दलची विकीपाने सुरू कराल का? एक कोसला सोडलं तर बाकीच्या कादंबर्‍यांबद्दल फारशी माहिती मराठी विकिपीडियावर उपलब्ध नाही.