दिल्लीत फेब्रुवारी महिना सुरु होताच वादळ आणि धुक्याचे राज्य संपते. सूर्याचे तेज जाणवू लागते. या मौसमात बाजारात भाज्याही भरपूर असतात. भाज्यांचे लोणचे घालण्यासाठी हा मौसम आदर्शाच. दरवर्षी सौ. या मौसमात भाज्याचे लोणचे एक- दोनदा तरी घालतेच. गेल्या रविवारी भाज्यांचे लोणचे घातले होते. त्याचीच कृती.
साहित्य:
भाज्या: फुलगोबी १किलो ,गाजर१/२किलो ,शलजम १/२किलो, अदरक १०० ग्रम, लहसून १०० ग्रम
मसाले : सौंप (बडीशेप) ( २ चमचे) , मेथी दाणे (१ चमचा), हिंग १/४ चमचे, मोहरीची डाळ १ वाटी, तिखट १/२ वाटी, हळद १/४ वाटी, काळी मिरी ५-६ दाणे, तेल १ वाटी, सिरका १ वाटी, गुड १/2 वाटी. मीठ आवश्यकतेनुसार.
कृती:
प्रथम गोबी,गाजर आणि शलजम या तिन्ही भाज्यांचे एकसारखे तुकडे करून घ्या.एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. एक उकळी आल्यावर पाण्यात १ चमचा हळद टाकून त्यात चिरलेल्या भाज्या टाकाव्यात. तीन ते चार मिनिटांनी गॅस बंद करून सर्व भाज्या एका मलमलच्या कपड्यावर किंवा साडीवर पसरून वाळायला घाला. तीन चार तासात भाज्या वाळतील (अर्थात ओलसरपणा निघून जाईल). अदरक किसून घ्या आणि लहसून बारीक वाटून घ्या.
आता कढई गॅस वर ठेवा. 1 चमचा तेलात सौंप आणि मेथी दाने परतून घ्या. मग पुन्हा २ चमचे तेल टाकून अदरक आणि लहसून परतून घ्या. त्या नंतर वाचलेले तेल कढईत टाकून तेल गरम झाल्यावर काळी मिरी टाका (तेल गरम झाले कि नाही कळण्यासाठी). नंतर गॅस बंद करा. एका भांड्यात सिरका व गुड घालून उकळायला ठेवा. गुड विरघळल्या वर गॅसबंद करा.
एका परातीत किंवा भांड्यात सर्व मसाला अर्थात - परतलेले अदरक, लहसून, सौंप (बडीशेप), मेथी दाणे व तिखट, हळद, मेथी दाणे, मीठ व्यवस्थित मिसळून घ्या. नंतर गरम तेल मसाल्यावर टाका. मिश्रण थंड झाल्यावर त्यात गुड आणि सिरक्याचे मिश्रण मिसला. मसाला थंड झाल्यावर सर्व वाळलेल्या भाज्या मिसळा.
हे लोणचे १०-१२ दिवस आरामात टिकते.

वाचने
16258
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त. आवडलं.
वाह! चटपटीत, छान दिसयेत लोणचे
स्वादिष्ट व आरोग्यपूर्ण पाकृ!
मस्त! थोड्या प्रमाणात करुन
बोले तो....एकदम झकास!
शलजम म्हणजे काय?
शलगम / शलजम = नवलकोल
In reply to शलजम म्हणजे काय? by रुस्तम
हा रेड रॅडीश म्हणजे लाल मुळा
In reply to शलगम / शलजम = नवलकोल by डॉ सुहास म्हात्रे
शलजम = टर्नप
In reply to शलजम म्हणजे काय? by रुस्तम
माझी आई असं मस्त लोणच करते,
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- O Ramji Bada Dukh Deena... { राम लखन }हो बरोबर
In reply to माझी आई असं मस्त लोणच करते, by मदनबाण
रेसिपी
In reply to हो बरोबर by सविता००१
रेसिपी देउ शकेन
In reply to रेसिपी by कपिलमुनी
चालेल
In reply to रेसिपी देउ शकेन by सविता००१
सरसों उर्फ़ मोहरी च्या तेलातले
In reply to चालेल by कपिलमुनी
मी
In reply to चालेल by कपिलमुनी
मस्तच
In reply to मी by सविता००१
ओके सर
In reply to मस्तच by कपिलमुनी
मस्त!
In reply to मी by सविता००१
उमा
In reply to मस्त! by उमा @ मिपा
भाज्यांचे लोणचे.
In reply to मी by सविता००१
सिरका म्हणजे काय?
व्हिनेगार
In reply to सिरका म्हणजे काय? by त्रिवेणी
पंचरंगा अचार म्हणुन जीटी रोड
नाही नाही
In reply to पंचरंगा अचार म्हणुन जीटी रोड by कैलासवासी सोन्याबापु
ओके!!, पण ते ही सरसों च्या
In reply to नाही नाही by स्पंदना
पाकृ आणि फोटो तोम्पासु!
एकदम टेम्प्टींग लोणचे..
चमचमीत !!!
मस्तच.
लोणचे मस्तच !
फ्रिजमधे रहातं छान
In reply to लोणचे मस्तच ! by खेडूत
कुठला ही पदार्थ एकटे खाण्यात
In reply to लोणचे मस्तच ! by खेडूत
2500 ग्रॅम्स / 12 म्हणजे
खुप छान! मी याच प्रकारे
सहीच... ह्या आठवड्यात करून