विशेष वागणूक
नुकतेच विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन मोठ्या दिमाखात झाले. जगभरातील १४ संघ स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत.
आपला भारतीय संघ अँडलेड येथे आपल्या होणा-या सामन्यासाठी उतरला आहे. या हॉटेलपासून ३००-४०० मी अंतरावरच अँडलेड ओव्हल स्टेडियम आहे. आपले खेळाडू विराट कोहली व अजिंक्य रहाणे हे स्टेडियम वर जाण्यासाठी चालतच निघाले. परंतु या दोघांकडे फारसे कोणीही लक्ष दिले नाही. हे दोघे रस्ता ओलांडत असतांना नेहमीप्रमाणे पादचा-यांसाठी काही क्षण मोटारी थांबत आणि लगेचच पुन्हा वेग घेत होते. या दोघांकडे एकाही नागरिकाने वळूनही पाहिले नाही.
मिसळपाव