Skip to main content

हवं तरी काय!

लेखक राशी यांनी मंगळवार, 24/02/2015 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
काय पाहिजे सुचत नाही.. सुचलं तर मिळवायच कसं कळत नाही.. जिवनातले काही अटळ पैलु का टळत नाही? ईच्छा असते तसं घडत नाही स्वप्नात घड्ते पण... पण मग वास्तवात पहायला का मिळत नाही? ज्याच्या कडुन हवे असते.. त्याच्या कडे मागता येत नाही.. पण मग तो मनातले ओळखुन का घेत नाही? म्हणतात की म्रुत्यु कुणाला सोडत नाही.. नाही सोडत तर... हवा तेव्हा का मिळत नाही?????

शूट यू बासटर्ड

लेखक अद्द्या यांनी मंगळवार, 24/02/2015 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
गेली तीन वर्ष सलग लीग च्या सेमीजपर्यंत धडक दिली होती . . पण प्रत्येक वेळी तिथून बाहेर पडलो होतो . . कधी वेळकाढू खेळ . . कधी ऐनवेळी केलेल्या चुका . कधी सामन्याच्या आदल्या दिवशी झालेली इंज्युरी . काहीना काही कारण . पण बाहेर पडलो होतो . . स्वस्तिक फुटबाल क्लब . हा आमचा क्लब . आम्ही ५-६ जणांनी सुरु केलेला . . रोज फुटबाल खेळायचो . . आणि सहज बोलता बोलता ठरलं कि लोकल लीग मध्ये पण टीम उतरवू . . ६ जण होतोच . आणखी ५-६ जण इकडून तिकडून मिळवले . . झाला क्लब सुरु . . यातले सहा जण म्हणजे . . म्हमद्या .

काही किस्सेमय वाक्प्रचार !

लेखक म्हया बिलंदर यांनी मंगळवार, 24/02/2015 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
मला नेहेमी वाटायचे कि प्रत्येक म्हणीमागे किंवा वाक्प्रचारामागे काहीतरी संदर्भ, कोणती तरी गोष्ट असणार नक्की. अशी काय घटना घडली कि "काखेत कळसा…" किंवा "वासरात लंगडी गाय…" जन्माला आले? तर अशाच दोन घटना माझ्या समोर घडल्या व ज्यावर तिथल्या तिथे काही वाक्प्रचार जन्माला आले. (खरेतर या आधी मी हे दोन्ही वाक्प्रचार ऐकले नसल्याने मला तरी विशेष त्या घडीलाच जन्मले असे वाटते.तसे नसल्यास भरचूक नो) गावात एकाने तिसरा टेम्पो विकत घेतला व त्यावर (तो नसताना)चर्चा चाललेली. पहिला :- आयला मस्त कमावतोय गडी. दुसरा :- मग न्हाय तर काय? आधीचीच देणी दिली न्हाईत आन तिसरा बी कर्ज काढूनच घ्येत्लाय.

घराचे व्हर्चुअल व्हर्जन!

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 24/02/2015 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
घराला, आईची मुळाक्षरे बापाच्या शिरोरेखा आज्जीची जोडाक्षरे आजोबांचे अनुस्वार! घराला, बहिणींची चन्द्रबिंदी भावड्याचा काना चुलत्यांचे रफार सावत्रांचे विसर्ग ! घराला, मुलाबाळांचे स्वल्पविराम भाच्यांचे अर्धविराम नवर्यांचे प्रश्न, अन बायकांच्या मात्रा! घराच्या पुस्तकाला आता आठवणींचे कव्हर! हार्डबाउंड पुस्तकाचे मग व्हर्चुअल व्हर्जन!
काव्यरस

मुर्गवाला साग

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 24/02/2015 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवसांनी पाकृ घेऊन येते आहे.मुर्गवाला साग अर्थात पालकातली कोंबडी..

गून्ता

लेखक राशी यांनी मंगळवार, 24/02/2015 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
जिवनाच्या व रेल्वेरूलाच्या नियमात थोडे साम्य सापड्ले दुरुन पाह्त राहील्यास गून्ता दिसतात परंतु एकदा का गाडी चालायला लागली की गून्ता आपोआप सुटतात. ता.क : माझा पहीला प्रयत्न आहे. चुकभूल माफ द्या.
काव्यरस

प्रेमाचिया वाटे

लेखक किरण कुमार यांनी मंगळवार, 24/02/2015 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
काढूनिया वेळ, घालूनिया मेळ खावयाची भेळ, सारस बागेची !! घेवूनिया गाडी, करु मजा थोडी असेल जरी जाडी, मैत्रिण आपूली !! कोण असे शत्रू, कशासाठी भित्रू पाळलेले कुत्रू, मैत्रिणीचा भाऊ !! सौदा करु सस्ता, सिंहगड रस्ता खावूनिया खस्ता, झुडूपाआड !! किती प्रेम मोठे, खर्चालाच तोटे आपटूनी डोके, आवरते घ्यावे !! घेवूनिया कात्री, बदलावी मैत्री दोन पॅक रात्री, घेवूनिया !! प्रेमाचिया वाटे, टोचतात काटे तरी जोश दाटे, उठल्यावरी !!

इतनीसी उमर मे ये शौक?

लेखक अत्रन्गि पाउस यांनी मंगळवार, 24/02/2015 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
इतनीसी उमरमे ये शौक? गल्ल्यावरचा बनियाने डोळे विस्फारून विचारले .... झाले असे होते कि छोटा वसंता लाहोरला आपल्या मामांकडे सुट्टीमध्ये म्हणून गेला होता. दिवसभर खेळणे वगैरे करता करता एक दिवस शोध लागला कि जवळच्या मशिदीत एक अवलिया गाण्याचा शौकीन होता आणि स्वत: चीजा बांधत असे ...मग काय वसंता रोज संध्याकाळी वही पेन्सिल घेऊन मशिदीत जाऊ लागला ... इतरांबरोबर तो हि त्या दिवसाची बंदिश लिहून घेई व आनंदाने परत येई ...पण थोड्याशा रितेपणाने .. एक दिवस संध्याकाळी परत आल्यावर मामांनी विचारले हम्म मग, काय वसंता काय म्हणताहेत तुमचे खांसाहेब ?

खुशबू (भाग ६)

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 24/02/2015 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ ५ वर्षापूर्वी सकाळच्यापारी मिरज जंक्शनमधे नेहमीप्रमाणे वर्दळ... रेल्वे कर्मचाऱ्यांची व विविध कामानिमित्त येणाऱ्या प्रवासी नागरिकांची गडबड...

खोपडी सटकली

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 24/02/2015 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
असाच एकदा कधीतरी प्रवासात होतो. गाडीत. मी चालकाच्या भूमिकेत नव्हतो. त्यामुळे अर्थातच अर्धं लक्ष चालकाकडे, रस्त्याकडे, चालवण्याकडे होतं. अचानक भयानक ट्रॅफिक लागला. थोडा वेळ गप्प बसण्याची औपचारिकता झाल्यावर चालकाने ठणाणा सुरू केला. मग हळू हळू ट्रॅफिकमधून बाहेर आलोही. पण ती धुसफूस आता ड्रायव्हिंगमधून बाहेर पडत होती. तेंव्हा सुचलेलं विडंबन. अगदी त्याच्या ड्रायव्हिंग इतकंच सेन्सलेस.