Skip to main content

भाषांतराचे हक्क !

लेखक चिनार यांनी मंगळवार, 10/03/2015 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
The Nuclear Jihadist नावाची एक कादंबरी वाचनात आली होती. पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमाचे जनक डॉक्टर अब्दुल कादीर खान यांच्या आयुष्यावर आणि कार्यावर ही कादंबरी आहे. कादंबरीत सांगितलेल्या काही गोष्टी खरोखर धक्कादायक आहेत. मला कादंबरी आवडल्यामुळे त्याचे भाषांतर करण्याचा विचार सहज डोक्यात आला. मी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता कामाला सुरवात केली. काही दिवसांनी मी पुण्यातल्या मेहता प्रकाशन संस्थे कडे गेलो आणि माझे भाषांतराचे काम त्यांना दाखवले. पण या पुस्तकाचे भाषांतर आधीच झाले असून ते पुढील २-३ महिन्यात विक्रीसाठी येईल असे त्यांनी सांगितले. भाषांतराचे हक्क मेहता प्रकाशन सन्स्थेनॆच घेतलेले आहेत.

साईझ मॅटर्स

लेखक पॉइंट ब्लँक यांनी मंगळवार, 10/03/2015 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
डीएसलार घेवून फिरणारया माकडांच्या गँग मध्ये नुकताच सामील झालो होतो तेव्हाची गोष्ट. मोठा कॅमेरा हातात आला की आपण लई भारी फोटोग्राफर होणार अस उगाचा वाटायला लागते. पण मॅन्युअल मोड वापरताना सुरवातीला जो घाम फुटतो तो सगळी हवा काढून टाकतो. आणि मग उगाच खुन्नस खावून सराव चालू होतो. मिळेल तिथे, जे हाताला लागेल त्याचे फोटो काढणे. मध्येच कुणी "वर्तमानपत्रात काम करता का?" असे विचारून उगाच कुरवाळून जातो. असो. असाच एक सराव बेंगलोर मध्ये एका तळ्याकाठि चालला होता. तिथे एका वॉटर लिलीचे फोटो काढण्याचा प्रयत्न चालू होता. काहि केल्या मनासारखा फोटो येत नव्हता.

ट्रॅप आणि विषकन्या बद्दल आरोप

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 10/03/2015 04:32 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रॅप या कादंबरीवर झालेल्या आरोपांवरुन बुकगंगा वरुन विषकन्या ही कादंबरी विकत घेऊन मी वाचून काढली. ही कादंबरी ई-बुक स्वरुपात उपलब्ध आहे जी आयपॅड किंवा इतर कोणत्याही टॅबमध्ये डाऊनलोड केली जाऊ शकते. वाचताना मला स्वतःला मूळ संकल्पना आणि काही गोष्टींतील साधर्म्य जाणवलं, परंतु सगळी कादंबरीच चोरली आहे असा आरोप करणार्‍यांपैकी किती जणांनी विषकन्या वाचली आहे याबद्दल मला शंका येऊ लागली आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी अमेरीकेच्या फुल्टन या पाणबुडीसंदर्भात एक लेख वाचनात आला. ही पाणबुडी अमेरीकन सरकारच्या अधिकार्‍यांना पत्ता लागू न देता रशियात स्मगल करण्यात आली या संदर्भात तो लेख होता.

सोलार इंपल्स २ (Solar Impulse 2) : केवळ सौरउर्जेवर पृथ्वीप्रदक्षिणेस निघालेले विमान

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 10/03/2015 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
"सोलार इंपल्स" हा बर्ट्रांड पिकार्ड (मनोरोगतज्ज्ञ व अवकाशवीर) आणि आंद्रे बोर्षबेर्ग (व्यावसायिक) या स्विस जोडगोळीचा प्रकल्प आहे. "सोलार इंपल्स २" नावाचे केवळ सौरऊर्जेवर चालणारे (आणीबाणीकरताही इतर कोणत्याही प्रकारचे इंधन न वापरणारे; झिरो फ्युएल स्टेटस) विमान घेऊन ही जोडी पृथ्वीप्रदक्षिणा करायला निघाली आहे.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३३

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 09/03/2015 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आणि मी मात्र रात्रिची जेवणं झाल्यानंतर..झोपताना काहि क्षण पुन्हा त्या देवळातल्या प्रसंगाच्या शेवटाला गेलो. मला भेटलेला देव नक्की कोण???..............असुरेश्वर? की तो धनगर??? पुढे चालू... ================================ त्या कार्यक्रमा नंतर घरी आलो खरा.पण खरा कुठे??? खरा तिकडेच राहिलो होतो. मन थार्‍यावर रहात नव्हतं. सरळ जाऊन आईला विचारावं,तर तिचा गैरसमज होइल की काय? ही भिती.

अनरीयल इस्टेट

लेखक पॉइंट ब्लँक यांनी सोमवार, 09/03/2015 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : इकोनोमिक्स आणि फायनान्सशी क्षेत्रातील कोणतीहि पदवी लेखकाकडे नाहि. काहि चूक झालि असेल तर दुरुस्ती सुचवावी. मी एक आकडेमोड केली आहे. बेंगलोरच्या जागेची किंमत ठरवण्यासठी. आकडेमोड सोपी जावी म्हणून थोडे अ‍ॅप्रोक्झिमेशन केले आहे. क्षेत्रफळ = ७४१ स्केवर किमी = ७४१ *१०००*१००० स्केअर मी. = ७४१*१०००*१०००*१० स्केवर फूट. हा जुना नंबर असावा. बीडीए वाले १२९१ सांगतात. http://www.bdabangalore.org/townplanning.html. असो आपण जुनाच नंबर वापरू. जागेची सरासरी किंमत = ५००० रू/स्केवर फूट (ही यशवंतपूर मध्ये आहे.

कथा-कॉलेज कट्टा भाग ४

लेखक चेतन677 यांनी सोमवार, 09/03/2015 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग...... कथा-कॉलेज कट्टा भाग १ कथा-कॉलेज कट्टा भाग 2 कथा-कॉलेज कट्टा भाग 3 वैष्णवी अभि शेजारी बसली.थोडा वेळ झाला मधेच नकळतपणे अभिचा हात वैष्णवीच्या हाताला लागला. " ओह सॉरी..." असं म्हणत अभि जरा बाजुला सरकला. त्यावर वैष्णवी गालातच हसली.कदाचित अभि हा खुपच लाजरा मुलगा आहे असे तिला वाटत होते. " हाय....वैष्णवी...काय गं ही काय वेळ आहे काय कॉलेजचा आज शेवटचा दिवस आणि तु आज चक्क कॉलेजला??

गोलमाल झेरॉक्स सेंटर आणि आपण

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी सोमवार, 09/03/2015 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
आज आलेला अत्यंत फसवा अनुभव. बाकीच्यांनीही सावध व्हावं म्हणुन लिहितोय. आज अचानक माझ्या एका कुप्रसिद्ध सरकारी बँकेत जायला लागलं. ८०'सी खाली गुंतवणुकीचा पुरावा म्हणुन एफ.डी. सर्टीफिकेट घ्यायचं होतं. आधी म्हणल्याप्रमाणे बँक कुप्रसिद्ध आणि सरकारी असल्याने एक जन्मकुंडली सोडुन सगळी डॉक्युमेंट्स साक्षांकित करुन दिलेलीचं होती. आणि बँकेच्या अत्यंत काळजीपुर्वक धोरणाला अनुसरुन पॅन कार्डची साक्षांकित प्रत हरवली गेली (पुढच्या वर्षीपासुन रिसिव्हड चा शिक्का मारुन घेणार). ऐन वेळेला हे लक्षात आल्यावर मला परत पॅन कार्डची छायाप्रत काढायसाठी बाहेर पळायला लागलं. आपल्याला हवा तेव्हा एक झेरॉक्सवाला सापडेल तर शपथ.