Skip to main content

बस -- शतशब्दकथा

लेखक आनन्दा यांनी बुधवार, 29/07/2015 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज क्युएचा शेवटचा दिवस. बरोबरचे सगळे अगोदरच इतर प्रोजेक्टवर गेलेले, हा एकटाच शेवटपर्यंत बसलेला. कोअर टीम मेंबर ना.. "हुश्श, हे दोन झाले की सुटलो, मग जरा क्युए सोबत बसलो के सगळे पूर्ण होईल. आज तरी ६ची बस पकडता येईल." तो मनातल्या मनात. तेव्हढ्यात फोन वाजला. "अरे तू आज लवकर येणारेस माहितेय ना?" "हो हो, निघतोच आता." त्याने भरभर ते दोन बग फिक्स केले, बिल्ड करून डीप्लॉय पण केले. पटपट निघून बसमधे गाणी ऐकत बसला. बरोबर सहा वाजता ड्रायव्हरने स्टार्टर मारला. बस प्रिमायसेसमधून बाहेर पडते तोवर फोन आलाच. "अरे बाबा निघालोय, पोचेन लवकरच". "मनीष मी विकास बोलतोय, बिल्डमधे मेजर इश्यू मिळालाय"

आमच्या आयुष्यातले कलाम

लेखक आकाश खोत यांनी बुधवार, 29/07/2015 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
अब्दुल कलाम यांच्या निधनाची बातमी काल व्हॉटस्‌ऍपवर समजली. आणि सगळ्या ग्रुप्सवर हीच चर्चा सुरु झाली. त्यांच्या निधनामुळे सगळ्यांनाच दुःख झाले. महान वैज्ञानिक, मिसाईल मॅन, प्रकल्प व्यवस्थापक, नेते, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, भारताचे माजी राष्ट्रपती, अशा त्यांच्या अनेक ओळखी आहेत.

( रेशनकार्ड )......शतशब्द-सम्मुच्चय

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 29/07/2015 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
३ वर्षे खच्चून पर्फोर्मंस दिल्यावर शेखरअण्णाने तीला सोलो पाठवायचं ठरवलं. घरवालीशी बोलून झालं, नगरसेवक काचीचं नाव निघालं. घरवालीला केवढा आनंद झाला, काचीबरोबरची रात्रीची "बैठक" छान झाली. "१८ वर्षांपेक्षा मोठी दिसायला लागली आता तु" असं काचीकडून उत्तर मिळाल्यावर खुश झाली. टोपाझची रात्र जवळ येवू लागली, खरेदी वैगेरे झाली. शेखरअण्णाने पारदर्शक डीपकट घालायला लावलं तीला. "कष्टमरको खुश रखेगी…. इदर जैसे डान्स किया, उससे अच्छा उदर करेगी" असं ऐकल्यावर त्याचं टेन्शन कमी झालं. आवश्यक सोपस्कार पार पडले. टोपाझमधे धंदेके टाइमवाला डान्सफ्लोर मिळाला.

सांख्य दर्शन

लेखक शरद यांनी मंगळवार, 28/07/2015 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
सांख्य दर्शन सांख्य हे सर्वाधिक प्राचीन दर्शन आहे. एक महत्वाची विचारधारा. साख्यांचा गौरव करतांना महाभारत म्हणते ज्ञानंच लोके यदिहास्ती किंचित् ! सांख्यांगतं तच्च मह्न्महात्मन् !! गार्बे लिहतो In Kapil"s doctrine, for the first time in the history of the world, the complete independence and freedom of human mind, its full confidence in its own power were exibited. It is the most significant system that India has produced. या दर्शनाने जे महत्वाचे सिद्धांत दिले, विचार दिले, त्यातील कांही ना कांही भाग पुढील दर्शनांनी उचलला.

उन्हाळी उद्योग ३

लेखक शेखरमोघे यांनी मंगळवार, 28/07/2015 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
छोटा मृदुल (microsoft) जसा दर एक दोन वर्षांत काही तरी नव - नवीन आकर्षणे देत रहातो, तसे काही तरी आमच्या उन्हाळी उद्योगांत करत राहावे लागणार हे आमच्या - म्हणजे मी आणि "सौ", किंवा आमच्या बालचमूच्या दृष्टीने "आबा" आणि "आजी" - कधीच लक्षात आले होते, पण ते प्रत्यक्षात आणण्याकरता हा उन्हाळा लागला.

मोबाईल मोबाईल......

लेखक बाबा योगिराज यांनी मंगळवार, 28/07/2015 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रान्नो, मोबाईल घ्यायचा ठरवतोय, बजेट २० ते २५ हजार. दोन फोन आवड्ले होते.

[शतशब्दकथा स्पर्धा] ग्रीन कार्ड

लेखक तुडतुडी यांनी मंगळवार, 28/07/2015 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
३ वर्षे खचून performanse दिल्यावर कंपनीने त्याला ऑनसाईट पाठवायचं ठरवलं . अप्लिकेशन करून झालं . लॉटरी मध्ये नाव निघालं . त्याला केवढा आनंद झाला . इंटरव्ह्यू छान झाला . 'पारपत्रावर वर विसा चिकटवून कंपनीत पाठवला जाईल' असं एम्बसी कडून उत्तर मिळाल्यावर तो खुश झाला. उडण्याचा दिवस जवळ येवू लागला तसा त्याचा उत्साह वाढत होता. खरेदी वगेरे करून झाली . आई बाबांनी काय काय घ्यायला लावलं त्याला . अहो आई बाबा आता US मधलं सगळं काही तिकडे मिळतं . असं म्हणून ओझं कमी केलं . आवश्यक ते सोपस्कार पार पडले . बोर्डिंग पास मिळाला . विमानात बसल्या बसल्या तो विचार करू लागला . आत्ता ३ वर्षे validity आहे विसा ची .

साजरं ( शतशब्दकथा )

लेखक शि बि आय यांनी मंगळवार, 28/07/2015 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
तो दिशाहीन चालत होता. बेवड्या बापाने आज परत त्याला चोपले होते आणि मायने मध्ये पडून त्याला सोडवले होते. वाढते वय, वाढती भूक आणि ती भागवायला बापाचा मार आणि कधीतरी मिळणारे वडापावच्या गाडीवरचे काम. पक्याची गाडी उचल्यापासून ते काम पण बंद होते. शाळा बंद म्हणून खिचडी पण बंद... स्टेशनवर हमालीसाठी पण कोणी उभं करत नव्हतं. मनात नसतानाही तो स्मशानाच्या रस्त्याला लागला...

जडण- घडण : २४

लेखक माधुरी विनायक यांनी मंगळवार, 28/07/2015 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नाची नियोजित तारीख जवळ येत चाललेली. त्याच्याकडून काहीच संवाद नाही. मी सुद्धा स्वत:शीच कठोरपणे वागत संपर्क नाहीच केला पुन्हा. तेच उत्तर पुन्हा ऐकणं सहन नसतं झालं.. नियोजित नवऱ्याशी बोलणं सुरू. मैत्रीचा, विश्वासाचा एकमेव संवाद. जे त्याला कळत नव्हतं, आई-बाबांपर्यंत पोहोचत नव्हतं, ते याला कसं समजून घेता येतंय, याचं आश्चर्यही वाटत नव्हतं. बाकी सगळी कवाडं घट्ट मिटून घेतल्यासारखी. स्वत:ला शांत ठेवण्याचे प्रयत्न सुरूच होते. प्रत्येक रात्र तगमग करणारी, झरत्या डोळ्यांनी उशी भिजवणारी.

ती (शतशब्दकथा)

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 28/07/2015 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
"स्त्रीला कधीही नाही जमणार, भालाफेकीत किंवा तिरंदाजीत नीट नेम धरून शिकार टिपायला...... तुझं शरीराचं, तुला अडचणीच होईल त्यावेळी !" त्याचा मृतदेह पुरला, तरी डोक्यातले त्याचे शब्द तिला राहूनराहून छळत होते. 'त्याने शिकार करायची, अन तिने धारदार सुऱ्याने शिकारीची चामडी सोलून, छोटूकले तुकडे करून, शेकोटीवर भाजून, चिल्ल्यापिल्ल्यासकट सगळ्यांना खाऊ घालायचे', असा सरळसोट हिशोब राहिला नव्हता आता……त्याला गुहेजवळ पुराल्यानंतर.