Skip to main content

बॉलीवूड, टीवी आणि स्टिरियोटाइप.

लेखक पद्मावति यांनी गुरुवार, 30/07/2015 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा माझी तामिळ मैत्रीण तावातावाने मला सुनवत होती होती...'यू नॉर्थ इंडियन पीपल'...हो, ती अशी हमरीतुमरी वर आली की मला नेहमी यू नॉर्थ इंडीयन्स वगैरे म्हणते न चुकता. आपल्याला कसं कमीतकमी चार दिशा माहीत असतात नं, तशा माझ्या या मैत्रिणीला दोनच दिशा माहिती आहेत. उत्तर आणि दक्षिण. तामीळनाडू, केरळ पासून वरती साधारणपणे हैदराबाद पर्यंत साऊथ इंडिया आणि हैदराबाद च्या वरती सगळा नॉर्थ इंडिया. बाकी महाराष्ट्र, गुजरात तिकडे बंगाल हे असले कॉंप्लिकेशन्स नकोच आपल्याला. असो. पण तिचा मुद्दा असा होता की आपल्या हिंदी चित्रपटांमधे दक्षिण भारतीय पात्रांना फारच विनोदी दाखवतात.

कट्टा........!!!!!!

लेखक एक एकटा एकटाच यांनी गुरुवार, 30/07/2015 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
कट्टा............. मित्रांच्या मैफिलीत होता तो ही रंगलेला हास्यविनोद अन टाळ्यांनी होता तो ही सजलेला तेथे जमणार्‍या सार्‍या अवलियांची तो "जान" होता येणार्‍या जाणार्‍यामध्ये त्याला कौतुकाचा "मान" होता टिंगल-टवाळी, शेरो-शायरी किस्स्यांचा तेथे बाजार होता राग, द्वेष, मत्सर, अविश्वासाला तेथे किंचितही थारा नव्हता हरएक पिकनीक ही त्यालाच विचारुन ठरवलेली प्रत्येक पार्टीची कुणकुण सर्वप्रथम त्यालाच कळलेली एरियामधली नवी आयटम ह्यानेच पहिली हेरलेली गुजरणारी हरएक बाला वहिनी नाहीतर भाभी ठरलेली आजवर जे कुणा सांगितले नाही ते इथे बोलायची मुभा होती सोल्युशन मिळायची गॆरेंटी नाही पण टेंशनगुलची हमी होती अश्या

रावणाचे उदाती कारण

लेखक पाटीलअमित यांनी गुरुवार, 30/07/2015 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्व प्रकाशित रावणाचे उदाती कारण शारुख खान च्या रा वन मध्ये एक वाक्य आहे "तुम लोग रावण को हर साल जलाते हो क्युंकी वोह कभी नाही मरता" आज आपल्या भारत देशा सारख्या संस्कृतीचे मिरवणार्या मध्ये हे काय चालले आहे १) कोणते हि वर्तामान पत्र बघा ,याकुब मेमोन च्या फाशीची बातमी कलाम यांच्या पेक्षा जास्त आहे २) जेव्हा माननीय ठाकरे साहेब यांचे देहावसान झाले तेवा पण कसाब ची चर्चा जास्त झाली ३) २ दिवसाआधी तर कहर झाला twitter वर कलाम हे trending असायला पाहिजे तर प्रतिभा पाटील ह्या दिसत होत्या आपले लोक का फुटकळ गोष्टीना एवेढे मह

बहर

लेखक चाणक्य यांनी गुरुवार, 30/07/2015 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस गारवा संध्याकाळ निवांतपणा गुलजार-बिलजार सगळं आहे . . . . कागद मात्र....कधीचा कोरा काही शब्द एखाद् दुसरी ओळ फार तर फार....बास्स तडफड थोडीशी भिती जमणार आहे की नाही? पेन टेकवायचं कागदाला नुसतंच...अनेकवेळा छ्या... तुला नाही तर त्या पारिजातकाला, विचारलंच पाहीजे एकदा कसं जमतं रोज बहरून येणं?
काव्यरस

यजमान

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 29/07/2015 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
बंडु:- यजमान म्हणजे काय रे? गणु:- ज्याच्यामुळे आपल्याला पैसे मिळतात ...तो! बंडु:- अस्सं! मग ग्राहक मंजे? गणु:- तेच! बंडु:- हो का? मग दुकानदार म्हणजे काय? गणु:- जो विकतो तो! बंडु:- हम्म्म! आणि धर्मपुरोहित मंजे? गणु:- जो विक्रयास बसतो तो! बंडु:- कशाच्या? गणु:- ............ बंडु:- सांग ना कशाच्या? गणु:- धर्माच्या बंडु:- अरे बाप रे! धर्महि विकतात? काय रेट असतो रे? गणु:- दर विक्रीस १ मन ..या दरानि! बंडु:- अच्छा! मग किती होतात ? विक्रय? मनाचे? एका पुरोहिताचे? गणु:- विकत जाण्याची शक्ति असेपर्यंत .. कितीही! बंडु:- हम्म्म! म्हणुन म्हणतात होय ,धर्माचं स्थान - मन...! गणु:- होय! मनच!

सर्प दंश - दोन लघु कथा

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 29/07/2015 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
महाराज या विषारी नागाने आपल्या राज्यातल्या अनेक नागरिकांचे प्राण घेतले आहे. सैनिकानी त्याला पकडले आहे. महाराज आज्ञा करावी, विषारी नागाचे काय करायचे. राजाने आज्ञा दिली, यात विचार कसला, ठेचुन टाका त्याला. सैनिकानी तत्काल त्या नागाला ठेचुन ठार केले. दुसरी कथा: महाराज या विषारी नागाने आपल्या राज्यातल्या नागरिकांचे प्राण घेतले आहे. सैनिकानी त्याला पकडले आहे. महाराज आज्ञा करावी, विषारी नागाचे काय करायचे.

कोकोनट नानकटाई

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 29/07/2015 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः २५० ग्राम मैदा २०० ग्राम अनसॉल्टेड बटर किंवा तूप १७५ ग्राम साखर ५० ग्राम रवा ५० ग्राम बेसन ५० ग्राम डेसीकेटेड कोकोनट दीड टीस्पून वेलचीपूड २ टेस्पून पिस्तापूड . पाकृ: ओव्हन २०० डीग्री सेल्शियसवर प्री

गादी- ३

लेखक संजय पाटिल यांनी बुधवार, 29/07/2015 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व वाचकांचे मनापासून आभार. संपादक मंडळीने केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे पण आभार मागील दोन भाग प्रकाशीत केल्या नंतर थोडा विश्वास वाढला. पण अजून टंकलेखनाची सवय नसल्या मुळे एक वाक्य टंकायला दोन ते तीन मिनिटे लागतात. त्यामुळे ठरवून सुद्धा मोठा भाग टाकायला जमले नाही. त्याबद्दल क्षमस्व. आहे ते गोड मानूण घ्याल अशी अपेक्षा. ******************************************************************************** हे सगळं ऐकून कुणाला काय बोलावं तेच सुचेना. सर्व प्रथम प्रतिक्रिया बायकोची " अहो चार तोळ्यांच्या होत्या नं?" हे ऐकून आई पुन्हा रडायला लागली. सर्वप्रथम मी स्वतः ला सावरलं.

शंभर

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 29/07/2015 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालीय संस्थळावर अहमहमिका लागली होती शतशब्दकथा लिहायची ….सगळेजण शब्दांवर तुटून पडत होते.… तो मात्र येणारी प्रत्येक कथा वाचण्याआधी अधाशासारखे शब्द मोजत होता सोनारासारखा तोलूनमापून… ह्या प्रकारात कधी नव्हे ते शब्दांना किती मोल असते आणि शिवाय अर्थही …. त्याच्या मनात विचार चमकला अचानक …. बायकोला सुद्धा हीच अट घालायला हवी रोज… दिवसाला फक्त शंभरच शब्द …. बास …ह्या वाफेच्या किटलीमुळे त्याचे कान किटले होते…तिच्या तोंडातून निघणाऱ्या वाफेने रोज भाजून निघायचा हा खरपूस कोंबडीसारखा…. येता जाता फक्त आणि फक्त अवहेलना… मनाचा हिय्या करून उभा राहिला बायकोसमोर…. पण तोंडातून शब्दच फुटेना काही केल्या….

नुसतेच शब्द ओठी

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 29/07/2015 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा हा. नुसतेच शब्द ओठी रस्ता चुकून आले नुकतेच शब्द ओठी मी थोपवून धरले भलतेच शब्द ओठी मी आवरू न शकलो आवेग भावनेचा अन योग्य ते न सुचले, चुकलेच शब्द ओठी शून्यात पाहताना असतो मनात वणवा ठिणगीसमान विझती हलकेच शब्द ओठी एका दिशेस वळती माझे विचार सारे एकसारखेच होती सगळेच शब्द ओठी होते कधीतरी जे हरवून ऐकलेले नकळत तुझ्याही येती माझेच शब्द ओठी कानी पडू न शकले झुरलेच शब्द ओठी विरले तसेच तिकडे नुरलेच शब्द ओठी ऐकूनही न येती ऐकू इथे अपूर्व या भावहीन लोकी नुसतेच शब्द ओठी - अपूर्व ओक सर्व हक्क र
काव्यरस