Skip to main content

Bioscope

लेखक झंडुबाम यांनी शनिवार, 08/08/2015 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
Bioscope सर्वांगसुंदर चित्रपट , सर्वांगसुंदर अशासाठी कि कॅमेरा जितका प्रभावी आहे , तितकच पार्श्वसंगीत आणि चित्रपटातील गाणी . चार कविता आणि त्यावर आधारित चार कथा , चारही कथांचे दिग्दर्शक वेगळे ,प्लॉट वेगळा तरीहि पकड सुटत नाही शेवटपर्यंत . रवि जाधव , विजू माने , गजेंद्र अहिरे आणि गिरीश मोहिते . चारही ताकदीचे दिग्दर्शक आणि त्यांच्यावरची जबाबदारी तितक्याच सहजतेने पेलून जातात . एक वेगळाच अनुभव देऊन जातात , आणि आपण बाहेर येतो तेव्हा वेगळ्याच प्रभावाखाली असतो .

[शतशब्दकथा स्पर्धा] निकाल

लेखक मधुरा देशपांडे यांनी शनिवार, 08/08/2015 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
दहावीचा निकाल लागला. सगळीकडून कौतुक झालं. आमची एकच खोली, आईबापांचे हातावरचे पोट, पण बाईंनी कॉलेजची फी भरली. अशातच मामा आले घरी. "कुठे शिकवताय पोरीला, मी मुलगा बघितलाय, हुंड्याशिवाय लग्न होईल." मामा पैसावाले. बैठका झाल्या, लग्न पण लागले. तिकडे दिवसभर शेतात काम अन रात्रीचा मार. कामाचे काही नाही, परीक्षेत पण हंडे भरून आणायची सवय होती, पण तिकडे गुरासारखे राबवायचे. जीव नकोसा झालेला. मामाची पोरगी कॉप्या करून दवाखान्यात सिस्टर. अन मला धाडले नरकात. रोजच्या रडायचा पण वैताग आला एक दिवस अन ठरवलं. याचा निकाल लावायचाच. आता मागे फिरायचं नाही. निघाले तशीच. मंगळसूत्र मोडले. अन पळून आले इकडे बाईंच्या संस्थेत.

[शतशब्दकथा स्पर्धा] विश्वासघात !

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 08/08/2015 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
फोनच्या आवाजाने त्याने डोळे उघडले. केस विंचरणार्‍या रीमाची पाठमोरी सुडौल आकृती दिसली. हेरखात्यात आणि खाजगी आयुष्यात जोडीदार असण्याचे भाग्य फार कमी जणांना मिळते. फोनवरचा संदेश डीक्रिप्ट केला आणि त्याचा चेहरा ताठरला. उठून त्याने तिच्या खांद्यावर हात टेकले. लटक्या रागाने त्याला दूर ढकलत ती म्हणाली, "आटप लवकर. मोहिमेच्या शेवटच्या सभेसाठी जायचंय. सर्वतोपरी कर्तव्य !" "एक महत्त्वाचे काम बाकी आहे." तिला कवेत उचलून त्याने गिरकी घेतली, भिंतीला टेकून उभे करून तिचा चेहरा ओंजळीत घेतला. एक सुखद शिरशिरी तिच्या अंगभर लहरली... डोळे अर्धोन्मीलित... ओठांचा चंबू.

सावज

लेखक जगप्रवासी यांनी शनिवार, 08/08/2015 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळपासून नुसते गोड गोड लेख वाचून तो कंटाळला होता, कुठल्याच धाग्यावर काडी टाकता आली नव्हती की आग लावता आली नव्हती. या शतशब्द कथेच्या स्पर्धेमुळे सगळे सेंटी मेंटी लिहत असल्याने त्याला अतरंग गिरी करता येत नव्हती. अचानक त्याची नजर एका लेखावर गेली आणि त्याला आज च सावज सापडलं होत. आता त्यातल्या व्याकरणाच्या चुका, न पटलेली कल्पना अस करत तो त्या लेखाची चिरफाड करणार होता. हाताच्या बाह्या सरसावून त्याने सुरुवात केली……… नायतरी कार्ट तस थोड आगावू होत जगप्रवासी

(शतशब्दकथा स्पर्धा) समस

लेखक संजय पाटिल यांनी शनिवार, 08/08/2015 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारी २००८, नुकताच ऑफिसात येऊन जागेवर टेकलो होतो. आज महत्त्वाचं प्रेझेंटेशन बनवायचं होतं. पीसी वर काम सुरू केलं तोच मोबाइलवर संदेश झळकला! "Wife" बायकोचा होता. कॉन्टॅक्ट मध्ये आमची नावं Wife आणि Hubby अशी सेव्ह केलेली आहेत. उघडून वाचला- " Cant talk, forgot the ATM PIN. please SMS. Urgent." आयला वेंधळी कुठली, आणि आता एवढं अर्जंट काय आहे? जाऊदे, बोलू संध्याकाळी, असं म्हणत डायरी उघडून शोधून तिचा पीन मोबाइल वरून पाठवला. संध्याकाळी घरी पोहचून फ्रेश होत होतो तेवढ्यात बायको पण आली. आल्या आल्या बॉम्बं टाकला " अरे सकाळी ऑफिसला जाताना माझी पर्स हरवली.

ती वेळ

लेखक सिध्दार्थ यांनी शनिवार, 08/08/2015 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
ती वेळ मंद वाऱ्याची शब्द असे वितळावे दुरून परतीच्या माझ्या वाटेवर तुझे डोळे लागावे... तुझ्या नेत्रात सरोवरे का सखे दुष्काळ तिथे शोभे गडद अबोल सावळी झाडे सरणावर प्राण उगाच उभे.... ऊरला तुकडा नभाचा होते वादळ कधी तिथे मिटल्या सावल्या अंधाराच्या जसा सूर्य दूर मंद उगवे... अखंड घुमतो पाउस देवळापलीकडे नक्षत्रांची ओंजळ पदरात तुझ्या दु:खात तू सावित्री माझ्या अन तरी घालतेस देवास साकडे...
काव्यरस

निबंध मोठ्या मुलांचा – माजी बाईल

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 08/08/2015 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
माझी बाईल माझी खूप लाडकी आहे. इतकी, की तिच्याशिवाय जगणे देखील अशक्य वाटते! ती सारखी जवळ हवी असते. म्हणजे, शक्य असेल तर दिवसाचे चोवीस तास देखील. अगदी हातात हात धरून ठेवण्याचे शक्य झाले नाही तर जवळपासच असली पाहिजे, पाहिजे तेव्हा जवळ करता आली पाहिजे! तिचा सहवास इतका असून देखील कमीच भासतो! आणखी आणखी हवा असतो. त्यामुळे मी तिला लाडाने मो..बाईल, म्हणजे, गीव मी मोअर मोअर माय बाईल... किंवा संक्षिप्त मोबाईल पुकारतो. खरंच, आजकालचा जमानाच असा आहे. माझ्यासारखा. किंवा मी जमान्यासारखा आहे असे म्हणा! सगळेच पुरुष, बाया, मुले, मुली, आजी, आजोबां, अगदी लहान बाळे देखील!

[शतशब्दकथा स्पर्धा] मन्या

लेखक अद्द्या यांनी शनिवार, 08/08/2015 03:03 या दिवशी प्रकाशित केले.
१०-११ वर्षं अंगाखांद्यावर नाचून, बापाची गादी असल्यासारखं झोपलेलो असताना पोटावर बसून. गुदगुल्या करून , थंडीच्या दिवसात नको असतानाही कुशीत शिरून. सवय लावली हरामखोराने. गविंनी खरं म्हणलं होतं . मांजर जात असतेच नालायक, थंडी वाजते म्हणून पांघरुणात शिरलं,झोपेत मी खाली ढकललं म्हणून चुलीत जाऊन झोपायची गरज होती का , पावसाच्या दिवसात राखेखाली निखारे असतात . इतकी वर्ष घरात असून एवढं कळत नाही का. एका बाजूच्या मिश्या जळाल्या. मिशी गेली कि अंदाज चुकतो यांचा . तरी मस्ती गेली नाही. उंदराच्या मागे गेला पळत पळत. शेवटी मांजरंच ते. . पण आता मला खड्डा खणायला लागतोय त्यासाठी.

शाप भाग - २

लेखक माझिया मना यांनी शुक्रवार, 07/08/2015 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
"वहिनी सरकार" शारदेची हाक आली. चार पाच तरी हाका झाल्या असाव्यात. "काही होतंय का? दिवेलागणीला अशा का बसून राहिला आहात?" काय सांगणार तिला..काय होतंय माझे मलाच कळत नव्हते. मी जर मनातून हादरलेय हे उघड झाले तर वाड्यातले वातावरण बिघडायला वेळ लागणार नाही. अजिंक्यराजे अन् राजश्री नव्या प्रोजेक्टचे काम पहायला गेले आहेत. परत येईपर्यंत जीवात जीव नाही. पोर्चमध्ये गाडीचा आवाज आला तशी धावत गेले. कधी एकदा अजिंक्यला सुखरुप पाहते असं झालेय. ते दोघे हसत येताना पाहून हायसे वाटत आहे. इतका वेळ उलटसुलट विचार करणारे मन थोडे शांत झाले.