Skip to main content

(शतशब्दकथा स्पर्धा) समस

लेखक संजय पाटिल यांनी शनिवार, 08/08/2015 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारी २००८, नुकताच ऑफिसात येऊन जागेवर टेकलो होतो. आज महत्त्वाचं प्रेझेंटेशन बनवायचं होतं. पीसी वर काम सुरू केलं तोच मोबाइलवर संदेश झळकला! "Wife" बायकोचा होता. कॉन्टॅक्ट मध्ये आमची नावं Wife आणि Hubby अशी सेव्ह केलेली आहेत. उघडून वाचला- " Cant talk, forgot the ATM PIN. please SMS. Urgent." आयला वेंधळी कुठली, आणि आता एवढं अर्जंट काय आहे? जाऊदे, बोलू संध्याकाळी, असं म्हणत डायरी उघडून शोधून तिचा पीन मोबाइल वरून पाठवला. संध्याकाळी घरी पोहचून फ्रेश होत होतो तेवढ्यात बायको पण आली. आल्या आल्या बॉम्बं टाकला " अरे सकाळी ऑफिसला जाताना माझी पर्स हरवली. पैसे काही जास्त नव्हते पण एटिएम आणि मोबाइल होते त्यातच."

वाचने 5158
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

पण हे संध्याकाळ पर्यंत बायको कळवणार नाही हे नाही पटलं...

In reply to by संजय पाटिल

मोबाईल आणि पर्स हरवली आहे हे बायको ताबडतोब नवर्‍याला दुसरीकडून फोन करून सांगणार नाही का? ह्या बाबतीत बायका रान उठवतात !

In reply to by माम्लेदारचा पन्खा

आयटी जॉब करणारं तरूण जोडपं आहे. त्याच्या द्रूष्टीनं या किरकोळ गोष्टी आहेत. फक्त तीच्या खात्यावर बॅलन्स किती असेल कल्पना करा. लै पीसं काढता ब्वा! +१ नायतर -१, हा.का.ना.का.

In reply to by संजय पाटिल

प्रश्न विचारल्यावर एकेक माहीती बाहेर येते आहे.... कुछ तो गडबड है दया..... या तुमच्या स्पष्टीकरणाचे बरेच अर्थ निघतात - १ आयटी वाल्यांना पैशाचा माज असतो..... २ आयटी वाल्यांची मालमत्ता खुल्या तिजोरी सारखी असते ३ आयटी वाले वैयक्तिक बाबतीत निष्काळजी असतात ४ आयटी वाल्यांना शर्विलकांनी हिसका दाखवला तर ते पकडले जात नाहीत ५ आयटीवाली बायको तिच्या प्रजातीच्या बायकांपेक्षा वेगळी असून तिला च्यवनप्राश द्यायची गरज असते संबंधितांनी हलके घ्यावे हेवेसांनल !

आपल्या घरच्यांचा नंबर वाईफ किंवा हसबंड असा मोबाईल मधे साठवू नये असा मध्यंतरी समस आला होता त्यावरून बेतलेली ही कथा आहे. +१ आवडली...!!

In reply to by योगी९००

राईट!!

+१ मस्तच! तुमच्या पाटल्या कुठैत?

In reply to by जडभरत

coming soon..

+१

एक मार्क झाकून ठेवा न्हायतर चोर न्हेइइल.

+१

+१

+१

+१

+१ कथेत (कथानकात) काही त्रुटी वाटताहेत. पण शैली आणि कलाटणी यासाठी +१

+१

+१

+१

आयटी जॉब करणारं तरूण जोडपं आहे. त्याच्या द्रूष्टीनं या किरकोळ गोष्टी आहेत.>>> काय अफवा पसरवता हो . ATM कार्ड हरवल्यावर बँकेत फोन करून ते ब्लॉक करायचं असतं हे शेंबड्या पोराला सुधा माहित आहे .४ डीजीट चा ATM पिन विसरतो ? आणि स्वतःचा ATM पिन नवर्याच्या डायरीत असतो ? कैच्या काई . कथा अजिबात पटली नै

आयटी आणि जॉब आणि ATM पिन विसरणे ? अशक्य अशक्य अशक्य !!!

+१

+१