Skip to main content

अमेरीका...अमेरीका...अमेरीका...

लेखक आशु जोग यांनी बुधवार, 12/08/2015 01:51 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या एक नवी फॅशन आली आहे. काही झालं की अमेरीकेला दोष देवून मोकळं व्हायचं. इराण इराकशी भांडतो. तालिबानी स्वतःच्या देशाशीच भांडतात. यामधे सग्गळा दोष म्हणे अमेरीकेचा असतो. आयसिस बर्‍याच गमजा करते. यामागेही अमेरीकेचाच हात असतो. मानलं काही प्रमाणात असेलही पण....मनात येतं खिलजीच्या वेळी अमेरीका होती का ? औरंगझेब महाराष्ट्रात येऊन क्रौर्य दाखवत होता, हाल हाल करीत होता तेव्हाही अमेरीका होती का... आसामात दंगा होतो... तिथे अमेरीका असते का आझाद मैदानात ...

[शतशब्द्कथा स्पर्धा] पहाट

लेखक बोलघेवडा यांनी बुधवार, 12/08/2015 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
" मालक सोडा तिला, म्या हुवतर पाया पडते, पर लेकीला सोडा", तमासगीर कमळाक्कान हंबरडा फोडला. "आमी येकदा धरलं, का मंग सोडत नसतोय" "आमी काय म्हनल त्ये ध्यानी आलं न्हाई का? ह्या लोकास्नी वाड्यातून भाइर काडा, आन ह्या पोरीला वर माडीवर न्ह्या. आमी आलोच लगोलग" संभानं भेदरलेल्या नाजुकाला पकडण्यासाठी हात म्होर केला, त्योच, "तिच्या आंगाला हात लावशील तर, जित्ता गाडीन हितं" करकर वहान वाजवत धाकलं मालक वाड्यात दाखल झालं. त्यास्नी बघून खुद्द पाटील बी टरकला. धाकल्या मालकाच्या आडदांड हातातलं कडं मशालीच्या प्रकाशात लखलखत हुतं.

हरिद्वारची कावड यात्रा - एक उन्माद

लेखक दा विन्ची यांनी मंगळवार, 11/08/2015 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
आज घडीला आपल्या भारताची लोकसंख्या अंदाजे १२० कोटी आहे आणि त्यापैकी अंदाजे तीन कोटी हिंदू शिव भक्त १ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या बारा दिवस चालणाऱ्या कावड यात्रेसाठी देवभूमी उत्तराखंड मधील हरिद्वार मध्ये येवून गेले . एकूण लोकसंख्येच्या ३ टक्के लोक्स . आपल्या सगळ्यांना आपल्या आषाढी वारी आणि त्या गर्दीचे भारी कौतिक . यावर्षी बहुधा ५ ते ६ लाख लोक विठू माउलीच्या दर्शनासाठी आले असतील . हि तुलना फ़क़्त या यात्रेची भव्यता समजावी म्हणून पण मला एक फरक जाणवला. वारीमध्ये एक प्रकारचे पावित्र्य, शिस्त आणि भक्तिभाव सहज जाणवतो . या उलट कावड यात्रा म्हणजे एक गुर्मी , उन्माद , आक्रस्ताळेपणा.

मुपीवरील माझ्या निवडक प्रतिक्रिया

लेखक पगला गजोधर यांनी मंगळवार, 11/08/2015 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
मुपीवरील माझ्या निवडक प्रतिक्रिया १. मैत्री म्हणजे मैत्री असते, तुमची काय अन आमची काय...जवळपास सेमच असते. सिगारेट देऊन, तयार सबमिशन-फाईल घ्यायचं, साध सरळ बार्टर असतं, काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात? मैत्रीच्या दृष्टीने थिल्लर वाटतात? असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे ! तरीसुद्धा, मैत्री म्हणजे मैत्री असते, तुमची काय अन आमची काय...जवळपास सेमच असते.

[शतशब्द कथा] रुख - रुख

लेखक इडली डोसा यांनी मंगळवार, 11/08/2015 05:59 या दिवशी प्रकाशित केले.
गाडी सिग्नलला थांबली आणि काल डेब्राकडून आलेल्या ईमेलचा मथळा आठवला 'Thank you and good bye'. राहुनचं गेलं काल तिचं मेल वाचायचं. आता ती पुन्हा कधीच नाही भेटणार . तिच्या डेस्कजवळ थांबुन तिला शुभेच्छा तरी द्यायला हव्या होत्या. कितीवेळा म्हणाली होती कि तिला भारतीय जेवण आवडतं . राहिलचं तिच्यासाठी डबा आणायचं. एवढं वय झालं तरी बिचारी मुलीसाठी आणि नातवंडांसाठी अजून काम करत होती . चला बहुतेक मुलीला नोकरी लागलेली दिसते. आले एकदाचे सुखाचे दिवस आजीबाईंना . . . . . . . " डेब्रा???तू कशी काय इथे? काल शेवटचा दिवस होता ना तुझा? " " तुला पण मी सोडून चालले असं वाटलं का?

कांहीही ह श्री ! (गुळगुळीत वाक्प्रचार)

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 11/08/2015 05:41 या दिवशी प्रकाशित केले.
टीव्ही मालिकांमध्ये पात्रे खूपदा तीच ती वाक्ये म्हणत असतात . आधी मला वाटायचे, की पाणी टाकून वाढविण्याचाच तो एक प्रकार आहे. पण थोडे निरीक्षण केल्यावर लक्षात आले, की प्रत्यक्ष जीवनात देखील आपण तीच ती वाक्ये बोलत असतो. उदाहरण म्हणून कुठलेही कडाकडा वाजणारे भांडण ऐका. जिथे आपले म्हणणे दुसऱ्याला पटवून देण्याचा कोणी प्रयत्न करीत आहे. एक कारण जर पटले नाही, तर काही नवीन तर्क मांडावा की नाही?

.... आभास

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 11/08/2015 03:52 या दिवशी प्रकाशित केले.
केवळ शब्द भारलेले इकडून तिकडे वाहणारे तिकडून इकडे झरणारे...... कुणाकुणाचे संचित असते क्षणामनाला जाणिव देते प्रत्यक्षाहून, अमूर्त संपन्न! भास नसे हा खास तरीही आभासाच्या जगात फिरते गूज मनाचे मनास वदते. इतक्या रुतल्या गाठी रेशीम व्रणही वाटे जपून ठेवू नशिबाला मग कौलच लावू दिगंताला निघताना तरी, हात खराच हाती घेऊ!
काव्यरस

[शतशब्दकथा स्पर्धा] शयना

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 11/08/2015 02:17 या दिवशी प्रकाशित केले.
अज्जिब्बात येत नाही ती,पूर्वीसारखी! एक काळ होता... ती माझी वाट बघत असायची. कधी येतोस रे माझ्या बाहुपाशात? असे म्हणत ! माझाहि रुबाब काही कमी नव्हता तेंव्हा . पण तो असायचा काही क्षणांपुरता. नंतर मी कधी विरघळून जायचो तिच्यात ? कळायचंहि नाही मला! कारण तेंव्हा मुळातच ती होती शयना. आणि मी??? केवळ शयनी! पण आता मात्र काळंहि बदललाय ,आणि वेळंहि. आता येते ती,तशी केंव्हातरि..अधूनमधुन येते.जुन्या क्षणांचि सोबत घडतिये असं वाटलं...तर! पण एरवी? ढुंकुनहि पहात नाही . आणि झालीच सामील अर्ध्या रात्री..तर? रुपडे पार बदललेले असते तिचे . 'आधीना' झालेली असते ती ही. आणि मी ही हल्ली होतो मग तिचा.., आधीन!

[शतशब्दकथा स्पर्धा] गोची

लेखक किसन शिंदे यांनी मंगळवार, 11/08/2015 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी मी, बापलेकर, पालेकर थोडं लवकरंच शाळेत पोचलो. सकाळची शाळा सुटायला अजून अवकाश होता, म्हणून गेटवरच टिवल्या बावल्या करायला सुरूवात केली. नेहमीप्रमाणे चावताना च्युईंगम दोन बोटांनी बाहेर खेचणे, समोरच्या थियेटरवरचे 'तसल्या' सिनेमाचे पोस्टर न्याहाळणे इत्यादी टुकार उद्योग बापलेकरने सुरू केले होते. तेवढ्यात गेटमधून ज्युनिअर काॅलेजच्या गणवेषातली एक सुंदर मुलगी येताना दिसली. गोरीपान,काळेभोर डोळे!! "आयला! काय कडक माल आहे राव!." बापलेकर चवताळला. "बैला, तुझ्यापेक्षा मोठी दिसतेय ती." मी. "असूदे ना! मं काय झाला?

सिर सलामत तो ...(परदेशकथा)

लेखक मंदार कात्रे यांनी सोमवार, 10/08/2015 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
(** देशाचे नाव देणे हेतुपूर्वक टाळले आहे. ) शाहिद ने विमानातळावरून कराचीच्या विमानात बसल्यावर सर्वप्रथम अल्लाहतालाचे आभार मानले “या खुदा शुकर है तेरा की तूने जिंदा निकाला मुझे इस जहन्नम से! मै शुक्रगुजार हू तेरा!...........” बरोबर दोन वर्षापूर्वी तो इथे आला होता . पाकिस्तानमध्ये मॅट्रिकपर्यन्त शिक्षण कराचीजवळच्या एका छोट्याशा गावात झाले होते. शेजारचे अनेक मित्र आखाती देशात कामाला होते . मग स्वप्नाळू शाहिदलाही आखाती देशात जाण्याची स्वप्ने पडू लागली. मग अब्दुलचाचाच्या ट्रकवर क्लीनर म्हणून काम करू लागला आणि वर्षभरातच तो ट्रक चालवू लागला.